प्रकाशन
तेजस वैजिनाथ घावलकर मलंग गल्ली सुहाना अपार्ट्मेंट लातूर.
प्रकाशन तिथी
वैशाख अक्षय तृतीया (१३-०५-२०१३)
लेखक
डॉ. शंकरराव बचाटे (गुरव)
सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन.
पुष्प आठवे
श्री सदगुरु काशिनाथ महाराज सत साहित्य प्रकाशन मुरुड
ता .व जि लातूर पिन ४१३५१०. श्री दत्त मंदिर व गुरुमंदिर मुरुड
संकलन
श्री महेश्वर शिवाजीराव बचाटे (गुरव)
सराफ चौक मुरुड पिन नं ४१३५१०
श्री महेश - दूरध्वनी क्र : ९९६००७१४५६
श्री गोकुळ - दूरध्वनी कृ : ९८९०५८१९००
अमृतवाणी
अमृतवाणी प्रवचनाची उपयुक्त
ॐ
ॐ नमः शिवाय नमः शिवाय
ॐ श्री समर्थ परम पूज्य
सद्गुरू काशिनाथ महाराज,
मठ संस्थान गंगाखेड जिल्हा - परभणी यांचे
महान विचार अमृतबोल
दिव्या वाणी
सरळ व सध्या भाषेत दिली आहे
सदगुरूंनी दिलेले नाम फार महान आहे
-: लेखकाचे मनोगत :-
प्रस्तुत ग्रंथात दिलेला सर्व विषय सदगुरु काशिनाथ महाराज यांनी वेळोवेळी केलेले उपदेश व त्यांचे महान विचार प्रवचन, कीर्तन , भजन गुरुमाऊलींच्या मुख कमळातून प्रस्तुत झालेले विषय, सर्व एकत्र करून लेखकाने ग्रंथ रूपाने प्रसिद्ध केला आहे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भावी भक्त व शिष्यवृंद या सर्वाना हा ग्रंथ बहुमूल्य व उपयुक्त आहे महाराजांचे सखोल ज्ञानाचे भांडार, या ग्रंथात सामावलेले आहे भक्तांना या ग्रंथाच्या आधारे अनेक विषयानुसार दृष्टांत व सिद्धांत दिले आहेत. अध्यात्मिक साध्या व सोप्या विषयावरून पायरी पायरीने तत्वज्ञाना पर्यंत बरचसे विषय यामध्ये सामावलेले आहेत सामान्य स्त्री पुरुष भक्तांना गुरुभक्ती मार्गाने ज्ञान सहज प्राप्त होते . गुरु भक्तीने मार्गाने या मायावी संसाराच्या संवेदनेतून सहजपणे ज्ञान मार्गाने जाऊन सुख दुःखाच्या अनेक आपत्तींना धर्याने तोंड देऊन जीवनमुक्त होण्यासाठी अनेक मंत्र व जप नामस्मरण = प्राणायाम वगैरे प्राकृतिक उपाय या ग्रंथात दिले आहेत.
इ. सन. १९५२ पासून महाराजांच्या सत्संगतीत राहून, संग्रह केलेले महाराजांचे महान विचार भक्तांच्या कल्याणार्थ प्रगत करण्याची प्रेरणा हि लेखकाला गुरु माउलींनी प्रदान केली. महाराजांची महान कृपा अंतकरणात प्रवेशून पदरात घेऊन वेळोवेळी या अज्ञान पामराला अंतरध्वनीद्वारे सांगत राहिले. इथे मात्र लेखक निमित्तमात्र असून गुरु माऊलीच्या चरणी एक सूक्ष्म अनु रेणूवत सूक्ष्म कण आहे. तरी वाचक व शिष्य वृंद यांनी या ग्रंथाचे श्रावण पठाण करावे व ज्ञानाच्या सानिध्यात जाऊन पोहचावे व महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या नरदेहाचे कल्याण करून घ्यावे. गुरु भक्ती मार्गाने आत्मनिश्चयात जाऊन पोहचावे इथेच सर्व सामान्य भाविक भक्तांनी संकल्प करावा. हेच गुरु भक्तीचे मूळ आहे. जिवाच्या आत्मकल्याणाच्या महान मार्गाने वाटचाल करीत राहावे महान मार्ग म्हणजेच गुरु भक्तियोग, याच मार्गाने मार्गक्रमण करीत राहून सद्गुरुंचे अंतिम ध्येय पूर्ण करावे हीच सत्य व निष्काम गुरु भक्ती आहे.
जय गुरुदेव
अखंडमंडलाकारमं व्याप्त येन चराचरम l
तत्पदम दर्षितम येन तस्मै श्री गुरुवे नमः ll
ll ॐ कल्याणमस्तुः ll
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा