३३. प्राणायाम.


    सर्व प्राणायाम करतेवेळी बैठक सरळ रेषेत ठेवावी. उजवी मांडी वर घेऊन सरळ सहजासनात बसावे.

१) ।। चंद्रस्वर (डावा) = सुर्यस्वर (उजवा) प्राणायाम ।।

    या प्राणायामात सर्वप्रथम दोन्ही नाकपुडयातून श्वास बाहेर काढावा. यानंतर उजव्या हाताच्या अंगठयाने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीतुन सुखवर्धक श्वास  शांतपणे आतल्या आत ॐकाराच्या स्वरात आत घ्यावा. श्वास पुर्णपणे यथाशक्ती कोंडून ठेवावा. नंतर अनामिका बोटाने डावी नाकपुडी बंद करून आत कोंडलेला  श्वास उजव्या नाकपुडीतुन सावकाशपणे बाहेर सोडावा. व दोन्ही नाकपुडया बंद करून श्वास बाहेरच सुखपुर्वक रोखून ठेवावा. आता पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि थोडावेळ रोखून डाव्या नाकपुडीने श्वास हळुहळु सोडावा. पुर्ण श्वास बाहेर काढुन टाकल्यानंतर काही वेळपर्यंत रोखुन ठेवावा. हा एक प्राणायाम पुर्ण झाला. शांत राहुन पुन्हा पुन्हा हा प्राणायाम १५ ते २० वेळा करावा. हा झाला चंद्रसुर्य स्वर प्राणायाम नंतर दोन तीन मिनिट शांत राहून त्यानंतर दुसरा प्राणायाम करावा.

2) रेचक - पुरक - कुंभक प्राणायाम.

दोन तीन मिनिटे शांत राहील्यानंतर -

१. रेचक:- म्हणजे अर्थात श्वास बाहेर सोडणे.

२. पुरक:- म्हणजे अर्थात श्वास आत घेणे.

३. कुंभक:- म्हणजे अर्थात श्वास राखुन ठेवणे.

बाह्यकुंभकः- श्वास बाहेर रोखण्याच्या क्रियेला बाह्यकुंभक असे म्हणतात. म्हणतात.

आंतरकुंभकः- श्वास आतमध्ये रोखण्याच्या क्रियेला आंतरकुंभक असे म्हणतात .

कुंभक - पुरक - रेचक हा प्राणायाम अंतरकुंभक व बाह्यकुंभक दोन ते तीन वेळा करावा हा झाला एक प्राणायाम. 

३) भस्त्रीका प्राणायाम.

    हा प्राणायाम करतेवेळी बैठक सरळ रेषेत ठेवावी. उजवी मांडी वर घेऊन सरळ सहजासनात बसावे आणि भस्त्रीका प्राणायाम करावा. दोन्ही हाताच्या अंगठयाने दोन्ही कान बंद करावे (ऐकु येणार नाही एवढे बंद करावे) अंगठयाजवळचे दोन्ही हाताचे बोटे (तर्जनी) कपाळावर ठेऊन बाकीचे तीन बोटे दोन्ही मिळून ६ बोटे डोक्याच्या नाकाच्या कोनात अलगदपणे ठेवावे. जेणे करून डोळयाच्या बुबळावर दाब पडू नये असे अलगदपणे ठेवावे आणि मुखातुन आत ऐकू येईल एवढया हळुवारपणे ऊं.................असा स्वर काढावा तो स्वर बाहेर ऐकु येत नाही असा आतच घुमत रहावा व तो स्वतःला ऐकु यावा. दम जेवढा कोंडता येईल तेवढा (जास्तीत जास्त वेळ) स्वर काढावा व आत डोक्यात ॐला पहावे. याप्रमाणे ऊं. चे चारवेळा स्वर बाहेर काढावे हा झाला भस्त्रीका प्राणायाम.

४)  सन्मुख मुद्रा प्राणायाम.

    या प्राणायामात सरळ रेषेत बसून दोन्ही हाताच्या दोन्ही अंगठयाने दोन्ही कान बंद करावे बाहेरचे ऐकु येऊ नये व करंगळी जवळच्या दोन्ही हाताच्या बोटाने नाकाच्या जवळचा भाग दोन्ही डोळे बंद करून डोळयावर अलगदपणे बोटाने झाकावे आणि मुखातुन हळुवारपणे बाहेर आवाज न ऐकता आतच आवाज ऐकु यावा याप्रमाणे ॐचा आवाज काढावा. दम मावेतो पर्यंत आवाज काढावा व दम मावत नाही तेंव्हा ॐ.............म. ॐ...........म. ॐ स्वर काढत शेवटी म. च्या उच्चारात बाहेर सोडावा याप्रमाणे तीन ते पाच वेळा प्राणायाम करावे हा झाला सन्मुख मुद्रा प्राणायाम.

५) मुळबंध प्राणायाम.

    उजवी मांडी वर घेऊन सरळ रेषेत बसावे. दोन्ही हाताचे मनगटे गुडघ्यावर टेकावे व हाताचे पंजे पुढे सरळ ठेवावे आणि गुद्द्वारातुन हवा वर खींचन (ओढावी) करावे. गुद्द्वाराला वर पोटाकडे आत घेऊन ताणावे. पोट पाठीकडे ताण मारून न्यावे जेवढे नेता येईल तेवढे पाठीकडे न्यावे. अवघडताच परत बाहेर सोडावे. याप्रमाणे ११ वेळा मुळबंध करावा. हा झाला मुळबंध प्राणायाम.

६) उडीयानबंध प्राणायाम.

    उजवी मांडी वर घेऊन सरळ रेषेत बसावे. दोन्ही हाताचे मनगटे गुडघ्यावर टेकावे व हाताचे पंजे पुढे सरळ ठेवावे. आता फक्त नाभीचा भाग नाभीसह पुर्ण पोट पाठीकडे ओढावे, नेता येईल तेवढे हळु हळु ओढावे व बाहेर सोडावे याप्रमाणे पुन्हा पुन्हा आत बाहेर गती घ्यावी. ११ वेळा उडीयान बंध प्राणायाम करावा. याला उडीयान बंध प्राणायाम म्हणतात.

७) जालंदर बंध प्राणायाम.

    उजवी मांडी वर घेऊन सरळ रेषेत बसावे. दोन्ही हाताचे मनगटे गुडघ्यावर टेकावे व हाताचे पंजे पुढे सरळ ठेवावे. या प्राणायामात पोट पुर्ण आत बाहेर करीत रहावे. नाभीचा व पोटाचा भाग आत ओढणे व बाहेर सोडणे व हनुवटी प्रत्येकवेळी कंठकुपात दाबावी (गळयाच्या गाठीच्या खालचा जो खडा आहे तो कंठकुप जाणावा) याप्रमाणे ११ वेळा जालंदर बंध प्राणायाम करावा. याला जालंदर बंध प्राणायाम म्हणतात.

सुचना:- प्रातःकाळी उठताच प्रथम दोन ग्लास पाणी पिणे व नंतर सौचविधी व मुखमार्जन स्नान करावे. वरील सर्व १ ते ७ प्राणायाम खालीपोटी/उपासपोटी करावेत. नंतर एक ते दोन तासानी भोजन घ्यावे. वेळ सकाळी पाच ते सहा, सांयकाळी सहा ते सात प्राणायाम करावेत.

टिपः - मध्यरात्री एक ते दोन यावेळी सुध्दा प्राणायाम करता येतो.

८)  ॐध्वनी उच्चार प्राणायाम पहिला प्रकार.

    पद्मासनावर बसून म्हणजे दोन्ही पायाचे तळवे पायावर पाय प्रथम डावा व नंतर वर उजवा पाय वर ठेऊन पायाचे तळवे क्राॅस वर करावे. पाय जांघेपर्यंत न्यावे व दोन्ही हाताची मनगटे गुडघ्यावर ठेवावे व ताट उभे रेषेत बसुन नेत्र बंद ठेवावे व आतल्या आत ॐचा गुंजारव/ उच्चार हळु स्वरात दिर्घ घ्यावा. किमान  १० ते ११ वेळा करावा. 

९) ॐध्वनी उच्चार प्राणायाम दुसरा प्रकार.

पद्मासनावर बसुन म्हणजे दोन्ही पायाचे तळवे पायावर पाय प्रथम डावा व नंतर वर उजवा पाय वर ठेऊन पायाचे तळवे क्राॅस वर करावे. पाय जांघेपर्यंत न्यावे व दोन्ही हाताची मनगटे गुडघ्यावर ठेवावे व ताट उभे रेषेत बसुन नेत्र बंद ठेवावे. ॐचा गुंजारव मोठया स्वरात करावा ओ ॐ----म. ओ---- म्हणत शेवटी म----- म्हणुन सोडावा. १० ते ११ वेळा दिर्घ स्वर परंतु मोठया आवाजात शांतपणे घेता येईल तेवढा लांब उच्चार करावा. दम मावेनासा झाल्यास तेवढयाच धीरे श्वास सोडावा.

१०) आंतरकुंभक बहिर्रकुंभक.

    सहजासनात आसन टाकून बसावे व नाकपुडीतून श्वास आत हळुवारपणे घ्यावा व श्वास पुर्ण भरला की, पटकन उजव्या हाताच्या मध्यमा अंगुलीने डावी नाकपुडी बंद करावी व अंगठयाने उजवी नाकपूडी बंद करावी,  दोन्ही नाकपूडया बंद ठेऊन श्वास आत रोकावा. दम मावत नाही त्यावेळी उजवी नाकपूडी अंगठा काढून खुली करावी  व हवा सावकाशपणे बाहेर सोडावी. नंतर १ ते  २ मिनिटाने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकाने श्वास आत घ्यावा व नंतर डाव्या नाकपुडीतून बाहेर सोडावा.याला अंतर व बहिर्रकुंभक प्राणायाम म्हणतात हा प्राणायाम ५ ते ६ वेळा करावा.

११) बिज मंत्राचे नामस्मरण.

    एक स्वच्छ कापडी आसन ठेवावे व उत्तराभिमुख अथवा पुर्वाभिमुख करून सहजासनावर बसावे व दोन नेत्र बंद ठेऊन अंतरदृष्टी भुमध्य किंवा नक्षकाग्र येथे ठेवावी व गुरूनी दिलेल्या बिजमंत्राचा जप चालु ठेवावा. याला वेळेचे बंधन नाही व आंतरलक्ष भ्रुकुटीमध्ये ठेऊन त्यात कल्पनेने ॐ  पहावा. जप आतल्या आत करावा १/२, २/३, ३/४ तासापर्यंत सुध्दा सहजासनावर जप करता येतो. मन शांतचित्त भ्रुकुट ॐच्या मध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आठ ते दहा महिन्याच्या सरावाने जपात प्राविण्य मिळते. सर्वाेत्तम साधा सोपा सुलभ राजमार्ग म्हणजे बीजमंत्राचा आजपाजप व अखंड नामस्मरण हाच सर्व सत्य व सुलभ भक्तीयोग आहे.

१२) मानसपुजा.

    आसनावार शांत बसून गुरूमुर्ती कल्पनेने व पुजा साहित्य कल्पनेने समोर ठेऊन जी पुजा केली जाते ती मानसपुजा होय. (ही मानसपुजा 5 मिनिटे ते तीन  तासापर्यंत पुर्ण होऊ शकते. )

                                                    ॐ

    सदरचे बारा प्राणायाम साधकासाठी सर्वोत्तम साधन आहेत. सद्गुरू काशिनाथ महाराजानी हे १२ प्राणायाम स्वःमुखातुन आपल्या परमभक्ताना शिष्यांच्या कल्याणार्थ सांगितले आहेत. त्याचा फायदा शिष्यवृंदानी व अन्य सर्व भक्तानी घ्यावा व आपले आरोग्य निकोप ठेऊन योगयोग जप तप सर्व साधनांचा लाभ घेऊन आपले जिवन सुखी करावे व गुरूभक्तीयौग आपल्याला साध्य व्हावा व या जन्माचे गुरूकृपेने सार्थक करून घ्यावे याच उद्देशाप्रत जाऊन श्री गुरूमाउलीनी हा महाप्रसाद आपल्या साठी देऊन उपकृत केले आहे. तेवढयासाठी हे १२ प्राणायाम वरदान आहेत.

    महाराज निक्षुण सांगतात, प्राणायामा सोबत ॐचा गुंजारव सतत ठेवावा. प्राणायामाच्या अभ्यासाने मनुष्य सर्व रोगातून मुक्त होतो व पुन्हा त्याला कोणताही रोग होणार नाही. प्राणायामाने श्वासाची बचत होते व आयुष्य वाढते वातविकार, ब्लडप्रेशर, उदररोग, कॅन्सर सारखे रोगसूध्दा प्राणशक्तीने समुळ नाहीसे होतात. ॐच्या महाशक्तीने जपाची संख्या वाढली जाते व साधक ज्ञानप्राप्तीच्या सान्निध्यात जाऊन पोहचतो हा प्राणायाम ब्रम्ह - सुत्र ग्रंथात महर्षी व्यासानी भक्ताच्या कल्याणार्थ ब्रम्हसुत्र ग्रंथात तयार केला आहे. तो व्यासप्रणित ग्रंथ महर्षी पतंजलीनी पाहीला आणि व्यासाना शुभाशिर्वाद देऊन प्रणाम केला व म्हणाले, अविनाशी असे अजर अमर राहण्याचे जे सुक्ष्म सुत्र केले ते व्यासकृत ब्रम्हसुत्र होय. महर्षी सद्गुरू काशिनाथ महाराज यौग्याचे महान योगी यांच्याच मुखकमलातुन बाहेर पडलेले प्राण रक्षणरूपी अमृतरूपी थेंब शिष्याच्या प्राशनार्थ प्राप्त करून ठेवले आहेत, हे महाराजांच्या शिष्यांचे महद्भाग्य आहे. याप्रमाणे व्यासकृत ब्रम्हसुत्र या विषयी थोडा खुलासा करणे हे लेखकाचे कर्तव्य असल्यामुळे येथे थोडे पुरातन काळातलेे महाराजांचे विचार येथे नमुद करीत आहे.

लेखक.

याच ग्रंथात मागे एका विषयात सद्गुरू काशिनाथ महाराज आणि व्यास महर्षी यांचा विषय वाराणसी व रामनगर (व्यासकाशी) येथे, व्यासानी स्थापन केलेले त्रिलिंग म्हणजे गंगामाईच्या तिरी (व्यासकाशी) शिवालय होय, काशिराजे नरेश त्यांचे वंशज आजतागायत पुजाविधी करत आहेत. व्यास महर्षी हे प्रथम ९ खंड पृथ्वी व दहावा खंड काशि असे १० खंड पाडले. तोच काशिखंड ग्रंथ श्री सद्गुरू काशिनाथ महाराजानी हजारे वर्षापुर्वी त्या त्या काळात व त्या त्या अवतारात व्यास महर्षी व सद्गुरू काशिनाथ महाराज त्या अवतारात व्यास काशि श्री क्षेत्र गंगामाईच्या पवित्र तिरी, शंभो शिवशंकराच्या पवीत्र स्पर्षाने शुध्द झालेल्या भुमीत काशिखंड ब्रम्हसुत्र व्यासाच्या व काशिनाथाच्या पुर्वावतारात निर्माण झाले. ते ज्ञान आज आपल्या गुरूदेवानी आपल्या भक्ताना प्रगट केले हे आपल्या सर्वांचे व प्रजेचे सद्भाग्य समजावे. अविनाषी असे अजर अमर रहाण्याचे सुत्र तयार केले ते व्यासकृत ब्रम्हसुत्र पुढीलप्रमाणेः- तरीपण माझे परमभक्त जे आहेत त्यानी आत्मविश्वास  ठेऊन या गुरूवचनामृताचा लाभ घेऊन इह जन्माचे सार्थक करून घ्यावे. हीच सत्य गुरू भक्ती आहे. आत्मकल्याण करून देणारी गुरूकिल्ली आहे. भवरोगाची व आत्मकल्याणाची एक महान शक्ती सामावलेली आहे. अमृत वल्ली आहे.

  ।। ॐ ।। स्वः।। ॐ ।। स्वः ।। ॐ ।। स्वः ।।

क्षमस्व. लेखक.


                                श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज, गंगाखेड,

                           ता. गंगाखेड, जि. परभणी.

                                                                    दत्तात्रयमुर्ती

                            सद्गुरू काशिनाथ महाराज मठ संस्थान. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा