एकेकाळची गोष्ट आहे..... ( श्रीमद्भागवत स्कंध १, अ १२/२० )
एक उशिनर नामक देशाचा राजा शिबी होता. शिबी राजाची दानशूर, धर्मात्मा, सत्यवादी न्यायी आणि यशस्वी म्हणुन किर्ती त्रिजगतात पसरली. शिबीच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती. त्याच्या राज्यात चोहीकडे धर्म कर्म चालु रहात असे. अन्याय अत्याचार हे राज्यात कुठेच पहायला मिळत नसे. शिबी अत्यंत धर्मज्ञ राजा होता त्याची दानशिलता, न्यायनिती इ. ची किर्ती सर्वत्र पसरली होती.
एकेकाळी राजा आपल्या दरबारात बसले होते. त्यावेळी त्यानी पाहीले की, एक शिकारी एका कबुतराचा बाण घेऊन पाठलाग करीत आहे त्याची शिकार करण्यासाठी तो मागे पळत आहे. ते बिचारे कबुतर भयभित होऊन धावत उडत आहे व शिकारी मागे पळत आहे. घाबरून पळत असलेला कबुतर राजा शिबीच्या खांद्यावर येऊन बसले व भितीने थरथर कापु लागले व व्याकुळ होऊन राजा शिबीला मनुष्यवाणीने म्हणाले,‘‘राजन मी खरोखरच निरपराध आहे हा शिकारी मला मारण्यासाठी आला आहे. कृपाकरून राजन मला माझ्या जिवास जिवदान द्या. तो मला मारून खाऊ इच्छितो. राजन आता मी आपल्या आश्रयाखाली आपल्या चरणी आलो आहे. आपण आश्रयदाते आहात. माझी रक्षा करावी राजन’’. ही कबुतराची करूण वाणी ऐकुन राजाने त्याची विनवणी मान्य केली आणि त्याला अभयदान देऊन राजा शिबी म्हणाले, ‘‘आता आपण माझ्या शरणमध्ये आश्रयाला आहात. आता आपण निश्चय पुर्वक शांत रहावे. आता तो शिकारी तुला स्पर्श करू शकत नाही. शांत रहा कबुतरा’’ इतक्यात शिकारी राजापर्यंत येऊन पोहचला व राजाला म्हणाला, ‘‘राजन मी फार भुकेला आहे हे कबुतर माझे शिकार आहे. व आजचे माझे भोजन तेच आहे. माझा आहार आहे. कृपा करावी राजन, माझा आजचा आहार मला मिळालाच पाहिजे. त्याला सोडुन द्या, मी भुकेने अत्यंत व्याकुळ आहे’’ हे शिकाऱ्याचे बोल ऐकुन शिबी राजा म्हणाले, हे कबुतर आता माझ्या आश्रयाखाली शरण आहे. काहीही असो आता मी याला सोडणार नाही. ऐक शिकारी सत्य हेच आहे की, शरणंगताची सेवा व रक्षा करणे हे मनुष्य धर्माचे परमपवित्र कर्तव्य आहे. शरणागताची उपेक्षा करणारा सदा सर्वदा अधोगतीला जातो. त्याला अत्यंत दुखः सहन करावे लागते हे राजाचे बोलणे ऐकुण शिकारी संतप्त होऊन राजाला म्हणाला, राजन हा कसला नियम आहे की, आपण माझ्या आहाराला लपवुन ठेवता. तेंव्हा शिकारी व कबुतर याची मनुष्यवाणी ऐकुन राजा क्षणभर स्तब्ध राहिला. व मनात निर्धार करू लागला की, आता हे कसले धर्म संकट विचित्र आहे. काय करावे हेच राजाला सुचेना. जर कबुतर सोडले तर शरणागताचे अहीत होते कारण दया धर्माचे पालन करणे हाच मनुष्य धर्म आहे. पण अधर्म होतो. कबुतराला नाही सोडले तर शिकारी उपाशी राहतो तोही अधर्मच आहे. क्षणभर राजाने विचार केला व शरणागताची रक्षा करणे हेच आपले सत्य धर्माचे इतःह कर्तव्य आहे असा विचार केला आणि राजा शिबी शिकाऱ्याला म्हणाले, यावेळी मी मोठया धर्म संकटात सापडलो आहे पण मी निश्चय केला आहे की, शरणागतांची रक्षा करणे माझे परम कर्तव्य आहे. तुझ्या आहाराचा विचार नाही. तु जे अन्य जे मांस मागतोस ते शिजवुन तु जिथे म्हणतोस तिथे तुला आणुन देतो.
हे राजाचे बोलणे ऐकुन शिकाऱ्याने उत्तर दिले. ‘‘राजन मी कुठल्याही अन्य जिवाचे मांस खात नाही.’’ ते ऐकुन राजानी शिकाऱ्याला निवेदन केले की, ‘‘मग आपणच दुसरा उपाय सांगावा. ज्या मांसाने आपली भुक क्षमण होईल, व माझ्या शरण अलेल्या कबुतराचा प्राण वाचावा व त्याची रक्षा व्हावी.’’ हे राजाचे बोलणे ऐकुन शिकाऱ्याने थोडा विचार केला व झटकन उत्तर दिले. राजन ऐका आपण जर या कबुतराची रक्षा करू इच्छिता तर ठिक आहे एक उपाय आहे. आपण आपल्या शरीराचे मांस आपण आपल्याच हाताने काढुन या कबुतराच्या वजनाबरोबर द्यावे. हा राजाने शरणागतांच्या रक्षणाचा उपाय जाणुन राजा शिबी प्रसन्न झाला. आणि लगेच तराजू व सुरी मागवून, तराजूच्या एका पारडयात कबुतर ठेवले व दुसऱ्या पारडयात आपल्या शरीराचे मांस कापुन ठेऊ लागले. राजा मांस कापुन वरचे वर ठेवित आहेत पण पारडे काही खाली येत नाही इकडे जेवढे मांस ठेवी तेवढेच गुढ कबुतराचे वजन वाढत जात आहे. पारडे खाली येण्यास मुळीच तयार नाही.
राजाने पुर्ण शरीराचे मांस कापुन पारडे भरले फक्त देहाचे हाडे शिल्लक राहिले तरी पण पारडे वरच राहिले हा सर्व प्रकार पाहुन राजा विस्मय चकित झाला व तो स्वंय ताडकण उठुन तराजुच्या पारडयात बसण्यास निघाला व प्रसन्न होऊन हसत हसत त्या पारडयात बसला आणि शरणांगताच्या रक्षणार्थ राजाने आपले शरीर अर्पण केले. एवढयात तो शिकारी राजाला म्हणाला: - राजा शिबीसाठी कसलेच आसाध्य नाही, व कबुतराची रक्षा झाली. शिकारी क्षणाधार्थ खरी रूपे प्रगट करून अंतर्धान झाले. (गुप्त झाले) तेंव्हा राजा कबुतराकडे पहात म्हणाला. हे कपोत, कबुतर राज तुम्ही तर इथले निवासी कबुतर म्हणुन समजत आहेत. परंतु हा शिकारी कोण होता इतर कुणीतरी महान जिवात्मा आहे. तेंव्हा कबुतर मनुष्यवाणीने म्हणाले, हे राजन राजा शिबीचा जय हो. आपण अघाद व महान आहात. आपला जय हो. राजन ऐका: - मी अग्निदेव आहे व तो शिकारी रूप धारण केलेला तो साक्षात स्वर्गाचा राजा इंद्रदेव होता. आपली सत्यता व पवित्र धर्माची किर्ती देवलोकात तुमच्या गुरूच्या कृपेने हां हां म्हणता पसरलेली आहे. देवलोकात आपले सत्य व धर्म दानाची परिक्षा घेण्याकरीता चर्चा चालु असे. त्यावरून तुमच्या आत्मपरिक्षेकरीता अग्निदेव व देवराज इंद्रदेव तयार झाले. यानीच आपली परीक्षा पहाण्यासाठी इथे आले. हे राजन आपण माझ्यासाठी स्वतःच्या शरीराचे मांस कापुन दिलात आपण तिन्ही राज्यात श्रेष्ठ ठरलात.
सिध्दांत - पुढील प्रकरणात.
कपोत (अग्निदेव) म्हणाले, आता तुमच्या दक्षिण बाहुतुन एक महान यशस्वी पुत्र होईल. तो कपोतरमा या नावाने विख्यात होईल. तो तुमच्या वंशाची किर्ती अक्षय ठेविल. व तो गुरूच्या कृपादृष्टीतुन (कृ.दृ) अखंड राहील. असे सांगुन कबुतर पण क्षणार्धात अंतर्धान (गुप्त) झाले. नंतर पुन्हा राजाचे शरीर तेजपुंज्य रत्नासारखे चकाकत एका निमिष्य मात्रात तयार झाले. त्रिलोकात प्रकाशमान झाले. हेच आहे शरणांगताच्या रक्षणाचे व सत्य धर्म पालनाचे परम कर्तव्य. (सत्य धर्माचे पावित्र्य)
सिध्दांत: - (गुरूशक्तीचे महान कार्य)
एकेदिवशी एक ब्राम्हण, राजाच्या दरबारात आला आणि राजाला म्हणाला, राजन मी अत्यंत भुकेने व्याकुळ आहे. तेंव्हा राजा म्हणाला, महाराज आज्ञा करावी, ब्राम्हणाने निसंकोच उत्तर दिले: - आपला ब्रहदगर्भ नावाचा पुत्र आहे त्याचे मांस शिजवुन मला खायला द्यावे. आभ्यांगताची सेवा करणाऱ्या राजाच्या मुखावर यत्कींचितही दुखःची छाया न दिसता राजा प्रसन्न वदनी झाला. व राजाने ब्राम्हणाची आज्ञा सहर्ष मान्य केली. आणि राजाने ब्राम्हणाची इच्छा पुर्ण करण्यासाठी आपल्या पुत्राला आपल्याच हातुत मारले व त्याचे मांस आपल्याच हातुन शिजवले. ते एका ताटात घेऊन स्वतः राजाने डोक्यावर घेऊन ब्राम्हणाच्याकडे गेले. त्यावेळी ब्राम्हण देवता घरी नव्हते असे दिसले. ते पाहुन राजा विस्मित झाला त्याच क्षणी एक मनुष्य म्हणाला, राजेसाहेब आपल्याला इथे येण्यास वेळ झाली म्हणुन तो ब्राम्हण क्रोधायमान झाला व अत्यंत रागाच्या भारात लाल होऊन निघुन गेला. व आपल्या राजवाडयातील महालाना शस्त्रागारांना, अश्वशाळेला, हस्तिशाळेला, कोषागाराला इ. ठिकाणी तो आग लाऊन भस्म करीत आहे. आपला राजवाडयाची अर्ध्याच्या वर जळुन राखरांगोळी झालेली आहे. ते राजाने शांतपणे ऐकुन घेतले व राजा सरळ ते मांसाचे अन्न घेऊन ब्राम्हणाच्या जवळ गेले. त्यांचे दुशकृत्य पाहुन राजाला थोडाही राग आला नाही. तेंव्हा राजा प्रेमाने विनम्र भावाने ब्राम्हणाला म्हणाला, भगवन् भोजन तयार आहे हे ऐकुन ब्राम्हण चकीत व थक्क झाला, व म्हणाला राजन प्रथम आपण मांसाचे भोजन घ्यावे. तेंव्हाच मी खाईन. ब्राम्हणाची इच्छा पुर्ण करण्यासाठी राजा मांस खाण्यास बसले व राजाने मांसाचा एक घास उचलला त्याक्षणी ब्राम्हणाने राजाचा हात धरला आणि अंतःकरणातुन डोळयातुन अश्रु गाळीत राजाला साष्टांग प्रणाम करून म्हणाला, धन्य धन्य आहात राजन, ब्राम्हणाला काय पाहीजे ते देण्यास समर्थ आहात राजन. ही तुमची सत्व परिक्षा होती ती आपण पुर्ण केली राजन. मी साक्षात भगवान विष्णु आहे. आणि तुमच्या धैर्याची व शरणागताची परिक्षा घेतली, व एवढयासाठीच आलो. यानंतर भगवान विष्णुने राजा शिबीला दर्शन दिले व क्षणार्धात अंतर्धान पावले. यानंतर क्षणार्धात राजाचा पुत्र ब्रहदगर्भ स्वर्णालंकाराने व दिव्य वस्त्र परिधान करून राजाच्या समोर उभा आहे. राजाने भगवान प्रभुला प्रणाम केला व प्रेमाने आपल्या पुत्राला कुशीत घेऊन कुरवाळु लागला. धन्य धन्य आहे ही भारतमाता की जिच्या ज्या भुमातेच्या उदरी असे महान तत्वनिष्ठ व सत्वनिष्ठ महान युगपुरूषाला जन्म देऊन कृतार्थ करते. तिच ही भारतीयांची महान व पवित्रम भारतभुमी अशा महान राजाना जन्म देऊन, ज्यांच्या अक्षय किर्तीने हा भारत व भारताची भुमी उजळुन निघाली. सद्गुरू काशिनाथ महाराज हेच सांगतात बाबानो, शरण = आणि = शरणांगती == शरण जाणे व शरणांगती पत्करणे आणि शरणार्थीला प्रेमाने स्थान देऊन, त्यांचे रक्षण करणे हिच गुरू भक्तीची प्रथम पायरी आहे. आणि याच प्रथम पायरीवर माझे भक्त गुरूपुत्र अक्षय स्थित व्हावेत व साधनेचा, नामजपाचा सुख सोहळा अखंड प्रक्षालन करावा. इथेच सत्य गुरू भक्तीचे दृष्य लोपलेले आहे.
( इ.सन १९५६ मध्ये. महाराजानी नारायण पेठ येथे केलेले प्रवचनावरून.)
हे गुरू माउली
उपमा, रहीत = निराकार = निराभास = निरामय = निष्प्रपंच्छ = निष्कग्ड = निद्वंव्द = निसंग्ड = निर्मल = गतिशून्य = नित्यरूप = नित्य = वैभवसंपन्न = अनुपम = ऐश्वर्ययुक्त = आधारयुक्त = नित्य = शुध्द = बुध्द = परिपुर्ण = सच्चिदानंद = घन = अद्वितीय = परमशांत = प्रकाशमय = तेजस्वरूप अशा महान अलौकिक महान तेजपुंज महाशक्ती अशा सद्गुरू माउलीना सर्वांगभावे साष्टांग गतप्राण समर्पण ।।
जगदगुरो नमस्तुभ्यं शिवाय शिवदायच ।।
योगींद्राण चः योग्रींद्र गुरूणां गुरवे नमः ।।
।। ॐ श्री काशिनाथाय नमोः नमः ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा