. *दुसरा अभंग*
गीतकार आणि रचनाकार.
परमभक्त सुधमती नाडे मुरुड
श्री समर्था सदगुरू नाथा सच्चीदानंदा I
शरण शरण गुरुदेवा II
तुझ्या स्वरुपी लीन होऊन I
प्राण कंठी आले माझ्या I
जीवा शिवाच्या या भेटीला वेळ नको आता II01II
शांत स्वरुपी काशिनाथा I
अनाथ बंधू भक्त वत्सला I
तू कृपाळू अनंत रूपा ध्यास तुझा रे आता II 02II
एका जनार्दनी दत्त I
पूर्ण करती मनोरथ I
अनंत कोटी प्रणाम तुमच्या चरणी वाहू या II 03II
खूप उत्तम रचना आणि गायन
उत्तर द्याहटवाअतिशय छान
उत्तर द्याहटवाखूप छान रचना आणि गीत गायन आनंद वाटला सुधामती ताई
उत्तर द्याहटवा