श्री समर्था सदगुरू नाथा

.          *दुसरा अभंग*
गीतकार आणि रचनाकार.
परमभक्त सुधमती नाडे मुरुड

श्री समर्था सदगुरू नाथा सच्चीदानंदा I
शरण शरण गुरुदेवा II

तुझ्या स्वरुपी लीन होऊन I
 प्राण कंठी आले माझ्या I
जीवा शिवाच्या या भेटीला वेळ नको आता II01II


शांत स्वरुपी काशिनाथा I
 अनाथ बंधू भक्त वत्सला I
तू कृपाळू अनंत रूपा ध्यास तुझा रे आता II 02II

एका जनार्दनी दत्त I
पूर्ण करती मनोरथ I
अनंत कोटी प्रणाम तुमच्या चरणी वाहू या II 03II

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा