३८. एकाग्रता. (भगवंत दर्शन .)

    श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशिनाथ महाराज सांगत असत. नाम जप अखंड करणे हे प्रत्येक साधकाचे इतःह कर्तव्य आहे. साधक आणि साधना. साधक म्हणजे भक्त अहर्निश नामस्मरणात रहातो. भक्ती मार्गाने शुध्द भावनेने आपले नित्य कर्म करीत रहातो. अखंड सत्संगात रहातो. चोवीस तासातून ठराविक वेळेप्रमाणे नामस्मरण व प्राणायाम करीत असतो. गुरू आज्ञा सिरसावंद्य माणुन गुरू सेवा अंतःकरणातुन वेळच्या वेळी करीत रहातो. प्रत्येक जिवात्म्याला प्रेम देऊन त्यांच्या आत्म्याला यत्किंचितसुध्दा दुःख होणार नाही असे वागतो, सत्य वचनाला धरून गुरू सेवा व ईश्वर सेवा आणि प्रत्येक सेवा आणि प्रत्येक जिवमात्राना प्रेम देऊन नित्य कर्मे ईश्वरार्पण समजुन कर्म करीत रहातो त्याला साधक म्हणतात. आणि जो शिष्य साधकाप्रमाणे आपले गुणधर्म निर्माण करून जप - तप - अनुष्ठान करीत असतो तो त्याच्या कर्तव्याप्रमाणे दिवसेंदिवस उन्नतीपथावर रहातो. याप्रमाणे त्याची जपाची संख्या रोजच्या रोज वाढत जाऊन दररोज चोवीस तासात तो हजारोंच्या संख्येने जप करीत रहातो. आणि याच काळात त्याचे मन क्षणाक्षणात शांत होत रहाते, तो जेंव्हा ध्यानस्थ स्थितीत आसनावर स्थिर होताच त्याला जांभया  (जांभळया) क्षणोक्षणाला येत रहातात व दोन्ही नेत्रातुन जलबिंदु थेंब थेंब येत रहातात. जसजशी जपाची वेळ वाढत जाते त्याप्रमाणे जांभळया आधिकाधिक वाढत रहातात. शेवटी गालाच्या खालचा भाग जभडा जांभळयाच्या तणावाने जाभाड जड पडुन दुखत रहाते त्यावेळी नेत्रातील जलबिंदुचे थेंब थेंब वाढत जाऊन गालावरून ओघळतात आणि अशा वेळी तो एकाग्रतेप्रत जात असतो. हे जी जपामध्ये येणारे मानसिक तणावाचे, आळसाचे व प्रभुच्या नामस्मरणाचे मुळ लक्षणे असतात. आणि या लक्षणानी युक्त जपानेच साधक व भगवंत यांच्यामधले जे सुक्ष्म सुत्र आहे ते दिवसेंदिवस बळकट होत असते. काही काळ जाताच ते सुत्र परिपक्व व बळकट होते त्यावेळी साधकाचे लक्ष आणि मन सद्गुरू चरणी एकविंद्य होते. तो क्षण निमिष्य मात्रात त्या सुक्ष्म सुत्राद्वारे साधकाचा नामाचा सुक्ष्म भगवंताला ऐकु जातो. महाराज सांगतात अरे, ‘‘मुंगीके पाॅंवमे घुंगरू बांधे वो भी अल्ला सुनता है.’’ याच साधनांच्या काळात त्याला जांभळया येणे, आळस, थकवा कोठेतरी खाज येणे, पाय अवघडणे, छाती भरून येणे, हात अवघडणे, मन एका वस्तुवरून अंनत वस्तुकडे धाव घेणे, मनाला बेचैन वाटणे, पायातुन पिंडरीतून मांडीतून जांघेतुन बेडकी/गाठ उठुन हळु हळु सरकत शेवटी जांघेत स्थिर होणे, त्यावेळी पुर्ण प्रकृतीत भयंकर वेदना होऊन साधक बेचैन होणे, इत्यादी होणाऱ्या अपत्तीला न भिता सयंम ठेऊन शांतपणे प्रसन्न होऊन सहन करणे. त्याचवेळी जांघेत थांबलेली बेडकी हळु हळु सरकत परावाणीच्या स्थानी जाऊन स्थिरावते, तेंव्हा हळु हळु सर्व काया देहाचा चमडा उष्ण होऊन अंगात १०३ ते १०४ डिग्री तापमान वाढले जाते. त्याच काळात साधक त्या भयंकर उष्णतेने होरपळुन निघतो, एवढेच नव्हे तर त्याच्या शरीराचे उष्णतामान आणखी वाढतच रहाते कांही दिवसात ते उष्णतामान १०७ ते १०८ डिग्रीपर्यंत वाढले जाते तेंव्हा मात्र देह मृतवत होऊन नाडीची गती मंदावते अशावेळी बेडकी परावाणीतुन हळुवारपणे पशयंता वाणीत जाऊन स्थिर होते. त्याच क्षणी स्थिर होताच इडा - पिंगळा - सुषुम्णा या तीन नाडयापैकी दोन म्हणजे इडा व पिंगळा या दोन इडा व पिंगळा मेरूदंडाद्वारे हळुवारपणे अती सुक्ष्म गतीने (पाठीच्या मनक्यातुन) वर सरकत रहातात. आणि त्याचवेळी साधक सुक्ष्म तत्वात जाऊन शांत चित्त होऊन हे सर्व अनुभवीत असतो. मेरूदंडाच्या (पाठीच्या मनक्यातुन) मध्यस्थानी इडा व पिंगळा येताच थोडया शांत होतात व सुक्ष्म गतीने त्याशेवटी ब्रम्हरन्ध्री (अकरावे द्वारी) जाऊन स्थिर होतात. अशावेळी याच अवस्थेत साधकाचा साधक भाव प्रबळ व शक्ती संपन्न होऊन योग्यांचे अवस्थेत रूपांतर होते. आणि अहं ब्रम्हास्मीचे सुक्ष्मध्वनी आतल्या आत घुमत रहातात अहंब्रम्हास्मी = अहंब्रम्हास्मी अहंब्रम्हास्मी या प्रकारे ध्वनी नाद ऐकायला येतो. (सुक्ष्म स्वरात) त्याच काळात काही वर्ष महीने लोटताच. इडा पिंगळा या दोन्ही नाडया ब्रम्हरन्ध्रस्थानी दोन्ही बाजूस दोन शांती निवास करीत असतात. त्याच काळात त्या दोन्ही इडा व पिंगळा गरळ ओकायला लागतात, तसतसे त्या यौग्याचे लक्ष आणि मन, अंतःकरण याना शीत संवेदना होऊ लागतात त्या त्या प्रमाणे दिवसेंदिवस आत्मा ब्रम्हरन्ध्रापासून हळु हळु पुर्व पदावर येऊन पोहंचतो तो यौगी पूर्व पदावर येऊन स्थिरावतो. याच काळात त्याला सच्चिदानंद होतो व अंतर बाह्य शुध्द होऊन शांतीपर्वात त्याचे रूपांतर होते.

    एवढयासाठीच गुरू माउली म्हणतात - भक्त (शिष्य ) जेंव्हा बिजमंत्राचे जप अनुष्ठान करतो त्या प्रथमावस्थेत प्रथम काळात जप करीत असताना किंवा अनुष्ठान करीत असताना किंवा गुरूंचे किंवा परमेश्वराचे नाम घेत असता जांभळया येतात. त्या शुभ योगाचे प्रतिक आहेत. डोळयातुन थेंब थेंब पाणी  थेंब गळणे, आळस येणे, थकवा येणे, हातपाय अवघडणे ही सर्व लक्षणे शुभ आहेत. किंवा नामात जपात आसनावर बसताच समोर अंधार दिसणे, कधीकाळी प्रकाश तर कधी काळी गोल गोल चांदणे, सुर्य, चंद्रम, रेशमी कव्हरचे आवरण महद्प्रकाश तर कधी काळे गोल टिंब तर कधी पर्वत पहाड, हिरवळ अंनत प्रकारचे चिट चमकी कपडयाचे आर्णव तर कधी गोल गोल शुभ्र 0 तर कधी प्रभु दर्शन तर कधी गुरूदर्शन चंद्रमा वगैरे अनंत प्रकाराचे मन मोहक प्रलोभणे आहेत. इत्यादी अवस्थेतूनच साधक अंतीम अवस्थेत म्हणजे अहंब्रम्हास्मीत जाऊ लागतो पण प्रथमावस्था तशी फार निराळीच असते. कारण मनुष्य मात्राच्या मुख्य तीन वृत्ती आहेत व तीन गुण आहेत.

तीनवृत्तीः-  कर्पुरवृत्ती, चेतनवृत्ती व अचेतनवृत्ती.

तीनगुण:- सत्वगुण, रजोगुण व तमोगुण.

    या सहातुन  सत्वगुण व कर्पुरवृत्ती ज्यांची आहे त्यांनाच म्हणजे त्याच साधकाला व सांगीतलेल्या गुरूवचनाप्रमाणे जप, तप, साधन, साधना नामस्मरण व अनुष्ठान गुरूकृपेशिवाय साध्य होत नाही. इथे सद्गुरूंचीच कृपा लागते. शिष्य असो वा साधक असो वा योगी असो वा भक्त असो इथे गुरूकृपाच पाहिजे व तो सिध्दाचा सिध्दच पाहीजे.

 सिध्द कुळीचा राजा असे तो ऋणानुबंधाचा. गुरूशिष्याचा ऋणानुबंध पाहिजे.

आणि सिध्दकुळीमध्ये खरोखरच गुरू शिष्यांचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध आहे.

आज या जन्मात सिध्द माझे जे गुरू आहेत ।।

तेच गेल्या जन्मात सुध्दा तेच माझे गुरू होते ।।

          व पुढील जन्मी सुध्दा हेच मला गुरू मिळतील.।।

    असे माझे व माझ्या सद्गुरूंचे असे कितीतरी वर्षे गेले, जन्मोजन्मीचे सिध्दांचे जन्म गेले व आणखी ही महाप्रलया पावेतो ही परंपरा चालणारच हे ब्रम्हलिखित त्रिवार सत्य समजावे. एवढयासाठीच संत शिरोमनी तुकाराम महाराज म्हणतात-  

                    तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे.

येथे सिध्दाचे सिध्द ।। सिध्दयोग ।। सिध्द कुळी ।। सिध्दाचे ते सिध्द सिध्दलिंगे ।। साधिले ते लिंग यल्लालिंगे ।। यल्लालिंग कृपे साधियेले सिध्द ।। काशिलिंग रूपे गंगातिरी ।। पावण ते केले सिध्दरामेश्वरा ।। आशिर्वाद दिधला काशिलिंगे ।। सद्गुरूकृपा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा