एकेकाळची गोष्ट आहे. गुरू पुष्यामृत योग असल्यामुळे काही भक्त गुरू दर्शनास रामवाडी आश्रमात एकत्र आले होते. महाराजाना पुष्पहार घालुन प्रसाद वाटुन कृतार्थ झाले. तेंव्हा महाराज भक्तांच्या समुदायास म्हणाले, अरे आज गुरू पुष्यामृत योग आहे, गुरूपुष्यामृत योग म्हणजे या शुभ दिनी सोने खरेदी करतात व समाधान मानतात. पण तुमचे गुरू काही सोने देत नाहीत व सोने खरेदीही करीत नाहीत, अरे आम्हा साधूंना सोने हे मृत्तिका समान आहे. पुष्यामृत म्हणजे शिव शंकराची भस्माची पुडी आहे, पुष्प नक्षत्राच्या समयी अनिष्टांचे दोष हरण होतात. तो दिवस अनुकुल समजला जातो व फलदायी असतो. सर्व सिध्दि प्राप्त करून देणारा गुरूपुष्यामृत योग आहे, त्यामुळे पुष्प नक्षत्र लाभदायक सिध्दिदायक आहे. हा दिवस धनप्राप्ती, पुत्रप्राप्तीसाठी उत्तम दिन आहे. फार पुरातन काळी याच गुरूपुष्यामृत योग असताना श्री अष्विनीकुमार महर्षी आश्रमवासी भक्ताना म्हणाले, अरे आज गुरू पुष्यामृत योग आहे. या शुभ योगादी जो भक्त पुर्ण मुहुर्ती ध्यानधारना करतो त्याला सर्व सिध्दि प्राप्त होतात आणि सिध्दाना तर लगेच या गोष्टी प्राप्त होतात. हे गुरू अश्विनीकुमार (आचार्याचे बोल ऐकून) एक सर्वसामान्य भक्त अशिक्षित असलेला लगेच गुरू आज्ञा म्हणुन साधनेस बसला. पुर्ण दिवस अन्न पाणी न घेता योग साधनेत गढून गेला. रात्रीचे तीन वाजले तरी पण उठत नाही हे पाहुन काही भक्तानी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला तरी पण तो न हलता योग साधनेत एकाग्र झालेला होता. पद्मासनावर ताठपणे बसून सन्मुख मुद्रेत आत्मा ब्रम्हांडी नेऊन अहंब्रम्हास्मीच्या ध्वनीत एकाग्र झालेला होता. ही वार्ता गुरूदेवाना कळताच त्यानी योगबळावर पुर्वाश्रमी घेऊन आले. (मुद्रेतुन सावध केले) अरे बाळ किती वेळ कोठे गेला होतास, हे गुरूंचे शब्द ऐकताच तो म्हणाला, गुरूदेव मी तुमच्या चरणी मिठी मारून डोके चरणावर ठेवले व शांतपणे नाम घेत राहीलो, थोडयाच वेळात माझे कान बहिरे झाले, आवाज बंद झाला व अंधारातुन एक सुक्ष्म शुन्य चकाकत समोर आले व त्यातच माझे मन एकलय झाले, मग मला सर्व विस्मरण झाले व गुरू प्रतिबिंब दिसत राहिले. त्या अवस्थेत मला कसलेही भान राहिले नाही व महालख्ख प्रकाशात मी अधांतरी तरंगत राहीलो. तेंव्हा तुम्ही माझ्या हाताला धरून एका दरवाज्यातुन आत घेऊन गेलात, अशी अनुक्रमे 21 दरवाज्यातून घेऊन गेलात तेंव्हा एकेविसाव्या दरवाज्यातून आत जाताच एका भव्य सिंहासनावर तेज पुंज प्रकाशात सिंहासनारूढ ॐ चे दर्शन झाले. व त्यातच गुरू चरण प्रकाशमान झाले, त्यावेळी आपल्या चरणाचे दर्शन झाले. आता मी व तुम्ही एकच आहोत असा भास झाला.
गुरुदेव प्रत्यक्ष आपण परमपिता परमात्मा आहात हे आज कळले.
जय सदगुरू, सदगुरू हे परमपिता परमात्मा आहेत. असे सदगुरू लाभणे महदभाग्य आहे.
उत्तर द्याहटवा