३४. आगमा निगमासी न ठावे ते आम्हासी पुसावे. (तत्वज्ञान ).


    आगम - निगम = उगम या विश्वब्रम्हांडाच्या पुर्वी हिरण्यगर्भातुन तत्वमसी महावाक्य. (मुळबिज) पृथ्वी उत्पत्तीच्या पुर्वी  (आदि बिज एकले) उदा:- वटवृक्ष व त्याचे फळ व त्या फळातील बिज लहानात लहान बिज असे त्या लहानशा फळात सुक्ष्म एकबिज असे हजारो बिज एका फळात सामावलेले असतात. त्यातील एक सुक्ष्म बिज (कल्पना करा की) त्या एका बिजातुन अणु रेणु परमाणु पेक्षाही हजारोपटीने लहान सुक्ष्म न दिसणारे बिज त्या बिजाच्या तुलनेत अंती सुक्ष्म  ॐ हे मुळबीज आहे. ओंकार रूपातुन परिवर्तीत म्हणजे आगमन (आगम) नंतर रोपटे तयार होऊन भल्या मोठया वृक्षात रूपांतर होणे औक्षोहिनी फळाचा बहार येऊन फळे पक्व होऊन अग्नित परिपक्व बिजांची उत्पत्ती होऊन बहारला जातो. मुळ बीजातुन हे विश्व ब्रम्हांड ते हे भुमंडळ, अशी अनंत भुमंडळे व विश्व ब्रम्हांड म्हणजे एक सुक्ष्म बिज. महाराज म्हणतातः- (आदि बिज एकले) हिरण्यगर्भ तत्वमसी महावाक्य व ब्रम्हांडाचे रूप ब्रहद ब्रहदारण्य पर = आणि = आपर परत्पर पर आत्मा (परमात्मा) पर - बिज = आपर = ( मा.त) आत्मतत्व  (परमात्मा तत्व) अ.उ.म. अर्ध तन्मात्रा ० शुन्य अकारातुन = उगम = पावते व उकारातुन  तयार होते. अर्ध तन्मात्रा शुन्यात लय पावते. मुळ बीज परिवर्तीत होते. अ. हं. अहं ब्रम्हास्मी. हिरण्यगर्भ तत्वात एकरूप होते. परत्पर भावात लय पावते. (आदि बिज एकले) शुध्द बिज मुळबीज. (बीजमंत्र) एकाक्षरी सुर्य उदय होतो व सुर्य आस्त होतो. सकाळ = संध्याकाळ दोन्हीच्या (संध्या) बीजमंत्राचे उच्चारण ॐ चे गुणगाण निगम नित्य अविनाशी  = अखंड अक्षय निर्गुण निराकार (० शुन्य) मुळबीजमंत्र पाचव्या वेद प्रणवोवाच्य (गुढ रूप) स.त.ग.र.ल.उ. (षडाक्षर) (सद्गुरूमुख) मुखातुन प्रस्तुत पंचमवेद. म्हणजेच प्रणवोवाच्य आहे.

तात्पर्य:- पाचवा वेद सद्गुरूंच्या मुखातुन बाहेर पडणारा ध्वनी म्हणजे प्रणव अधिक उवाच. प्रणवोवाच्य हा गुप्त आहे. पुर्ण स्वरूप अक्षय जीवात्मा पर (परमात्मा) हेच मुळबीज महा ॐ तत्व, तत्वमसी महावाक्य हिरण्यगर्भ या तत्वज्ञानाचा उदय = आणि उपास्य = हे केवळ महान योगी तत्ववेत्ते सत्पुरूषच प्रत्यक्ष मानवी रूपातुन सांगू शकतात. जे की आगमा निगमाशी  न ठावे ते आम्हासी पुसावे.

     श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज.

    सर्व दुःखाच्या पलीकडे ब्रम्हानंद आहे. सर्व जिवात्म्याच्या ठायी हृदयारविंदी भगवंताचे स्वरूपाचे वास्तव्य आहे.अहंब्रम्हास्मीच्या तत्वज्ञानाची अनुभुती होते त्याना परम पवित्र भगवंताचे दर्शन होते.

                                                            पंचप्राण.

    प्राण = अपाण = व्याण = उदाण = समाण = यापैकी प्राण हा देहात चोहीकडे फिरत रहातो व सर्व प्रकारची शारिरीक कार्ये तो प्राणच करीत असतो.

    जेंव्हाः- वात - पित्त - कफ समान राहत नाहीत, मन = बुध्दी  वर परिणाम होतो, तर समान वायुला = समान ठेवणे हे फार महत्वाचे आहे. पंचप्राणामध्ये समान वायु मुळ आहे तो सदैव जागृत व निकोप ठेवावा लागतो. शुषुम्ना = इडा = पिंगळा = यांचा मिलाप त्रिकुटीच्या स्थानी होत असतो त्यावेळी महान सत्पुरूष त्यात समरस होतात. अशा महान सत्पुरूषाला भगवंताचे दर्शन होते व त्यांना पुन्हा जन्म नाही. कार्यानुरूप प्रगट होऊन जग कल्याणाचे कार्य करीत रहातात. सुषुम्ना नाडी महान आहे व अतीउष्ण आहे. जठराग्नी व सुषुम्ना फार प्रखर आहेत. ही सर्व क्रिया यौगी अभ्यासाने साध्य करतात.


टिप्पण्या

  1. जय सद्गुरू
    खुपच छान माहिती सद्गुरु राया ने दिलेले ज्ञान पूजा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे
    खूप छान कार्य हाती घेतलेले आहे पूजा
    धन्यवाद पूजा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा