32. गुरूभक्ती फार खोल आहे.

        श्री परमपुज्य महाराज म्हणाले. गुरूभक्ती ही फार खोल आहे, महाभयंकर खोल आहे, तीचा अंत लागणे फार कठीण आहे. त्या खोलीचा अंत ॐ स्वः नेच मोजावा लागतो. कारण भक्ती उथळ नाही, अतीखोल आहे. सद्गुरू आणि शिष्य दोघाचे हृदय एक झाले पाहिजे. सद्गुरूची प्रतीमा अंतःकरणात अहर्निश स्थीर झाली पाहीजे. गुरू माउलीना साष्टांग घालून त्यांची पायधूळी मस्तकी धारण केली पाहीजे. गुरूनी दिलेल्या नामाचे नामस्मरण अखंड चालले पाहीजे. शिष्याचे जिवन नाममय झाले पाहीजे, प्रत्येक श्वास नामातच चालावा लागतो. नामस्मरणाने प्राणशक्ती प्रबळ होते. प्राणायाम योग सतत करण्याचा आग्रह चालु रहातो. साधकाने नित्य नैमित्तिक योग व प्राणायाम काराच्या श्वाच्छोश्वासासोबत करावाच्या स्वरात प्राणायाम करण्याचा सराव करून न चुकता प्रातःकाळी पाच ते सहा पर्यंत व सायंकाळी सात ते आठ पर्यंत मध्यरात्री एक ते दोन पर्यंत याप्रमाणे चोवीस तासातून तीन तास तरी प्राणायाम करण्याचा संकल्प करावा. प्राणायामाने शरीर अंतर बाह्य शुध्द होऊन शरीर प्रकृती निरोगी होते, देहातील असणारे लहान मोठे रोग समुळ नाहीसे होतात व परत कसलेही रोग न होता पिंड बळकट बनते. प्राणायामाने जपाची संख्या वाढत रहाते अंतर शुध्दीने अंतरात्मा प्रसन्न रहातो. मन - प्राण - एकवटून प्राणायाम करीत रहावे व सोबतच मुखातून आतल्या आतचा जप  असा चालु ठेवावा. या आभ्यासाला चार ते सहा महिने लोटताच प्रकृतीला सवय होते व पुढील काळात सहजासहजी प्राणयाम चालु रहातो. महाराज एकेकाळी म्हणाले: -‘‘शरीर माध्यं खुलु धर्म साधनम्’’ योग याग जप तप करण्यासाठी प्रकृती स्वास्थ्य असणे फार महत्वाचे आहे. स्वास्थ्याशिवाय प्राणायाम करणे कठीण जाते. नित्य नैमित्तिक प्रणायामाने आसाध्य ते साध्य होते. नामस्मरणाने  काराच्या महाप्रभावाने मनुष्य सर्वज्ञ बनतो. प्राणायामाचे दहा ते पंधरा प्रकार महत्वाचे आहेत तेवढे जरी केले तरी प्राण शक्ती आपले कार्य पुर्ण करते व प्राणायामाचा इष्ट परिणाम चार ते सहा महिन्यातच दिसुन येतो. येवढयात प्रकृतीला वळण पडते प्राणायामाने पंचप्राणाची कार्यशक्ती वाढते.अपाण - व्याण - समाण - उदाण व प्राण सुरळीत कार्यरत रहातात.  प्रकृती आणि विकृती शरीर   प्रकृतीला विकृती ही वेळोवेळी छळ करीतच असते प्राणयामाच्या आभ्यासाने विकृतीला टाळता येते.

।।।।

टिप्पण्या