३०. महाराज म्हणतात.सर्व दुःखांच्या पलीकडे ब्रम्हानंद आहे.

सर्व जीवाच्या ठिकाणी पेश्यंता वाणीच्या ठायी भगवंताच्या स्वरूपाचे वास्तव्य आहे. अहंब्रम्हास्मीच्या अनुभूतीतून तत्वमसी महावाक्यात अहंब्रम्हास्मीचा भ्रमर नाद ऐकु येत असेल तर परम पवित्र परमात्म्याचे  दर्शन होते. विचार संहिता व आचार संहिता हे साधकाना पाळाव्याच लागतात. तरच तो आत्मानंदी निमग्न रहातो.

महत्वाचे प्राणायाम अकरा खालीलप्रमाणे आहेत.

    1. चंद्र सुर्य प्राणायाम (शिवस्वरोदय)

    2. नामजप. आजपाजप. 

    3. कुंभक - पुरक - रेचक (प्राणायाम)

    4. माणसपुजा. (काल्पनिक गुरूपुजा) 

    5. प्रणवध्वनी (उच्चार) स्वर लहरीत.

    6. चरण प्रदक्षीणा. (योग)

    7. हस्त प्रदक्षीणा. (योग)            

    8. भुमी स्पर्श दर्शन. (योग)

    9. पद्मासन व सिध्दासन कुंभक -पुरक- रेचक. 

   10.सन्मुख मुद्रा. सन्मुखासन व मुळ बंध,उडियाणबंध, जालींदरबंध.

   11.सामुदायीक (जप) ॐ चा गुंजारव भस्त्रिका (अ.उ.म) स्वर आतल्या आत.

­­­­

1) ॐ चैतन्यं शास्वतंम्। शांतं योमातितं निरंजंम् ।

     नदबिंदु कलातिंतं । तस्मै श्री गुरूवेन नमः ।।


2) ब्रम्हानंदं परमसुखदं । केवलं ज्ञाण मुर्ती ।

        द्वंदातितं गगनसदृशं । तत्व मस्यादी लक्ष्यं ।।

एकं नित्यं विमल मचलं। सर्वाधी साक्षीभुतं ।

भावातितं त्रिगुण रहितम । सद्गुरू त्वं नमामी ।।


3)   अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया ।

चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्री गुरूवे नमः ।।

अखंड मंडलाकारं । व्याप्तं येन चराचरम् ।

तत्पदं दर्शित येन । तस्मै श्री गुरूवेन नमः ।।


4) गुरू शिष्य परंपरेनेच वेदाचे रक्षण होते।

येवढया साठीच गुरू शिष्य परंपरा जपली पाहिजे ।।

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा