श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज गंगाखेडकर.
माघ शुध्द ११ एकादशी इ.सन. १९७८ या दिवशी महाराज गंगाखेड येथे आले आणि विजय माणीक कुबदे यांच्या लादनीवर निवासास थांबले. माघ शुध्द १२ रोजी प्रातःकाली श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे शंभो महादेवाची पुजा व अभिषेक करून तिर्थ प्रसाद घेतला. माघ शुध्द १३ त्रयोदशी इ.सन १९७८ रोजी प्रातःकाळी गंगास्नान करून दत्तमंदिर व मठाच्या निर्माण कार्यासाठी ब्राम्हीमुहुर्ती भूमिपूजन केले. मंदिर व मठाच्या बांधकामाचा शुभारंभ केला आणि २२ वर्षाच्या कालावधीत इ.सन २००० साली मठाचे निर्माण कार्य पुर्ण करून घेतले. म्हणुन माघ मास हा श्री महाराजांचा गंगाखेड ग्रामी संतजनाबाईच्या चरण कमलाने पुणीत झालेल्या भुमीत पदार्पण केलेला मास माघ आहे. महाराजानी दत्त प्रभुच्या यात्रा महोत्सवाची तिथी माघ शुध्द १५ पौर्णिमा म्हणजे नवान्न पौर्णिमा/नव्याची पुणव घोषीत करून दत्त यात्रा महोत्सवास प्रारंभ केला. सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने आज तागायत यात्रा महोत्सव साजरा होत आहे. भक्तांच्या माहीतीस्तव.
लेखक.
जय सद्गुरू, उत्तम
उत्तर द्याहटवा