।। मनाचे काम अखंड नाम. ।।
श्री गणेशाय नमः श्री मातृ पितृ गुरूर देवोभ्यों नमः
‘‘श्री’’गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णु । गुरूर देवो महेश्वराः ।
गुरूर साक्षात परंब्रम्ह । तस्मै श्री गुरूवे नमः ।।
स्तवन
-ः बिजातित:-
वन्देहं सच्चिदानंदम् भावातीतं सोःहं ब्रम्हः
नित्यं पुर्ण निराकारं निर्गुण स्वात्मसुखंम्
दमानिकरंम् प्रसन्न सोःहं स्वरूपंम बोधरूपं
यौगीन्द्रं माध्यं भव रोग वैद्यं
श्री सद्गुरू नित्यमंह नमामी.
ॐ नमः शिवाय नमः शिवाय.
नही ज्ञाणेन सदृषंम ।। पवित्र मिह विदमहे।।
जगात ज्ञानासारखी सर्वाेत्तम व पवित्र श्रेष्ठ अशी कोणतीही शक्ती नाही की, ज्या ज्ञानाच्या प्राप्तीने मानव देहाचा उध्दार होतो. अज्ञानाच्या पलीकडे असणारे जे महान शक्तीसंपन्न ज्ञान आहे तेच मानवी जिवाला परमेश्वरी शक्तीची ओळख करून देणारे ज्ञानच एकमेव साधन आहे. ज्ञान प्राप्ती शिवाय मनुष्याला या जगात असुन नसल्यासारखे आहे. ज्ञानाविन जिवन म्हणजे अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडत रहाणे होय. मी कोण आहे, मी म्हणजे कोण, कोठुन आलो व जाणार कोठे? या सृष्टीवर मला कोण घेऊन आला आणि घेऊन येण्याचे प्रयोजन काय, रहातो कुठे, खातो काय व अन्न पाणी कोण देतो, या सर्वांचा मालक कोण आहे, हे घर कोणाचे आहे, आणि या घरात रहाणारा मी म्हणजे एक मानव जिवात्मा हा कोणाचा आहे. इत्यादी गोष्टीचे ज्ञान मानव प्राण्याला होते. म्हणजेच ज्ञान पण आज अशी परस्थिती आहे की, प्रत्येक मनुष्य प्राणी या मुळ ज्ञानापासून अलिप्त आहे. आज्ञानाच्या वाटेने माझे माझे म्हणत चालला आहे. अरे तुझे काय आहे तु आयुष्याच्या या घरात रहावयास आला आहेस, तुझे घर म्हणजे हा देह या पिंड देहात कांही दिवसासाठी रहाण्यास आला आहेस, हा देह सुध्दा तुझा नाही आयुष्य संपताच तुला तो सोडून जावे लागते. हा मनुष्य प्राणी भगवंताच्या घटनेप्रमाणे भगवंतानी सृष्टी निर्माण केली, त्या त्यांच्या घटनेप्रमाणे आपण हे कार्य करत असतो पण आज्ञानामुळे माझे घर, माझे शेत सर्व कांही माझे माझे म्हणून संसाराचा गाडा हाकत असतो, हा सर्व भास आहे. सत्य पाहु गेले असता आज्ञानातुन जागे होऊन जागृतीचे सत्य स्वप्न ते वेगळेच आहे, ते न पहाता उगाच क्षणीक सुखाच्या मागे धावत राहून स्वप्नात अनुभवलेल्या प्रलोभनाला सत्य समजून क्षणीक सुख अनुभवतो व जागृत होताच निराश होतो. याचाच अर्थ आज्ञानपण. पवित्र व सर्वश्रेष्ठ असणारे जे ज्ञान आहे ते कांही वेगळेच आहे श्री भगवंत सांगतात.
नही ज्ञाणेण सदृषं । पवित्र मिह विदमहे ।। याही पलिकडची अवस्था म्हणजे ज्ञान हेच एकमेव सर्वश्रेष्ठ आहे. सत्य स्वरूपाची व परमात्म स्वरूपाची देहरूपी जिवात्म्याची ओळख करून देणारी जी मानवी अवस्था आहे, ते ज्ञान भगवंत भक्त अर्जुनाला उपदेश देत असताना आज्ञानाच्या पलीकडे असणारे जे ज्ञान ते कोणते आहे हे सांगतात. आत्मज्ञानं विना पार्थः । सर्व कर्म निरर्थकं । भगवंत म्हणतात, हे पार्था! तुला जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जे जे कर्म करतोस ते सर्व निरर्थक समज.
ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरू काशिनाथ महाराज सांगतात, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. नामेची तरिले, नामेची उध्दरीले, कोटयानकोटी. सद्गुरूनी केलेला उपदेश (मंत्रोपदेश) गुरू जे नाम देतात ते नाम अखंड गोड समजून नामाचे नामस्मरण काया वाचा मने खंड न पडता अखंड सतत नामस्मरण चालले पाहीजे. सद्गुरूंच्या वाक्यावर अंतःकरणातुन विश्वास ठेवा. सद्गुरूनी दिलेले नाम मनुष्य प्राण्याला तारक आहे. नामातच ज्ञानरूपी प्रकाश सामावलेला आहे. नाम हे आज्ञानाला मुळासह काढुन टाकते व ज्ञानाच्या महाप्रकाशात अलगदपणे नेऊन पोहंचवते. ज्ञानाच्या प्राप्तीने या देहाचे आत्मकल्याण होऊन जिव ब्रम्हस्वरूपाला एकरूप होतो आणि मनुष्याला अंतःकरणात अनुभव येतो. जीव हाच ब्रम्हस्वरूप आहे. (अहंब्रम्हास्मी) चा आत्मानुभव येतो. एवढी महानशक्ती गुरूवाक्यात गुरूनी दिलेल्या नामात सामावलेली असल्यामुळे नामाच्या उच्चाराने (नामस्मरणाने) हे ज्ञान प्राप्त होते. सद्गुरूनाथ सांगतात-
नाम नाम नाव विठोबा नाम तुझे सार
आदि मध्य अंती निज बिज ओंकार.
हे विट्ठला तुझे नाम हे सार नसून नाम हेच सार आहे. नामेची तरिले कोटयानकोटी असे महाराज अविनाशी अजर अमर नित्य स्वयंसिध्द निजबीज विश्वव्यापक आहेत. आदि - मध्य - अंती जे शिल्लक रहाते, ते बिज पृथ्वी उत्पत्तीच्या पुर्वी, पृथ्वी उत्पन्न झाल्यावर व पृथ्वीचा नाष झाल्यावर (महाप्रलयांती) जे शिल्लक रहाते तेच ओंकार (निजबिज ओंकार) हेच नामाचे आहे. नाम हे ज्ञानाचे पण बिज आहे. नामरूपी बिज सद्गुरू देतात भक्ताच्या देहरूपी क्षेत्रात मंत्रदिक्षा देऊन बिजारोपन करतात. व अखंड नामस्मरण करण्याची आज्ञा देतात गुरूनी दिलेले नाम हे सर्वनामात श्रेष्ठ नाम आहे, त्वरीत फलदायी आहे, नामच भक्ताना वरदान आहे, नाम हेच गुरू पुत्राचे अमृत भोजन आहे, अध्यात्मरूपी क्षुधेचे क्षमन होते. जोपर्यंत नामाची गोडवी लागत नाही तोपर्यंत षिष्याला एकाग्रता लाभत नाही. बिजाला अंकुर फुटून सुंदर रोपटे उगवते. आता मात्र त्या रोपटयाचे संगोपण काटेकोरपणे करणे जरूर असते. त्याला अखंड जलवृष्टी करावी लागते नाहीतर पाणी न मिळाल्यास ते सुकून जाते. या रोपटयाचे कालांतराने एका महान वृक्षात रूपांतर होते, हजारो फळ व पुष्पानी वृक्ष बहारला जातो. असे नामात सामावलेले गुप्त धन प्राप्त होते व भक्त सुखी होतो. इथेच त्याला सत्य सुखाची जाणीव होते व नामाची गोडी चाखीत राहतो. त्यावेळी त्याला बाह्यात्कारी गोष्टी क्षणीक वाटतात. मनुष्य जिवनाचे जे अंतिम ध्येय असते त्या ध्येयाप्रत जाऊन ज्ञान मार्गाने नित्यकर्मे करीत रहातो. याच स्थितीत त्याच्या ठायी जागृती होते. सर्व जिवमात्रात परमात्मा स्वरूपाला पहात रहातो. मन बुध्दी चित्त अहंकार शांत व स्थिर होतात व बुध्दीच्या साह्याने अहंकाराला तिलांजली मिळते. अशा अवस्थेत प्रधान बुध्दीच्या साह्याने सर्व कर्मे बम्हार्पणम् म्हणुन कर्मे करीत रहातो. जग हे मिथ्या समजून ब्रम्हच सत्य आहे याची जाणीव होते, त्यावेळी मन एकच काम करीत रहाते ते म्हणजे. नाम - नाम - नाम - अखंड नाम.
।। गंगाखेड येथे भुमीपुजन ।।
श्री क्षेत्र गंगाखेड येथे तीन एकर भुमी ०३/१२/१९७०. ला खरेदी घेतली व ०४/१२/१९७० ला रजिस्ट्रेशन केले. याच काळात गंगाखेड येथे दि ०३/१२/१९७० रोजी महाराज म्हणाले, अरे माझा जन्मपण याच दिवशी झाला आहे आणि याच दिवशी शेतीच्या वाटाघाटी होऊन जाणार यात शंकाच नाही. माझा जन्म मार्गशिर्ष शुध्द ५ पंचमी गुरूवार हा जन्म दिवस आहे.
गंगाखेड येथे भुमीपुजन प्रातःकाळी सहा वाजता गुरूवार मार्गशिर्ष शुध्द १२ द्वादशी तारीख १०/१२/१९७० (गंगापुजन व भुमीपुजन) केेले. मुरूड दत्त देवस्थान केंद्र मुरूड येथे मिथी श्रावण शुध्द १५ गुरूवार तारीख २४/०८/१९७२ रोजी औदुंबर वृक्षारोपण केले.
जय सद्गुरू पूजा तुझे कार्य खूपच अवर्णनीय आहे ज्याचे कार्याचे वर्णन करता येत नाही असे नामाचे साधन महत्व
उत्तर द्याहटवातुझ्या मार्फत भक्ता पर्यंत येत आहे सद्गुरु परिवारामध्ये पोहोचत आहे धन्यवाद
खूप छान गुरूनाम माहिती आहे. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाKhup khup sundar 👌👌
उत्तर द्याहटवाAvdhut chintan shree Gurudev Datta🙏🙏🙏