आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात. कर्म धर्म योग संयोगाने काहीवेळा सत्संगतीचा लाभ होतो. आणि मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र लाभ होतो. त्या महान सत्संगतीच्या लाभाने जरी मनुष्य या संसाररूपी जाळयात अडकुन आपल्या मुळ स्वरूपाला व कर्तव्य कर्माला जाणण्यास असमर्थ झाला किंवा मनुष्य जन्माला येऊन मानव म्हणून मानवाच्या कर्तव्य कर्माला विसरून, संसारात अनंत सुख दुःखाना जवळ ठेऊन आपले आयुष्य कंठीत असेल, अशावेळी त्याचे मन उद्दिग्न होऊन खऱ्या सुखाला पारखा होतो व हैराण झालेला असतो. कर्म, धर्म, योग संयोगाने त्याचे प्रारब्ध बलवत्तर असल्यामुळे त्याच्या कल्याणाची बहुमुल्य काळ आणि वेळ येताच, त्याची आणि संताची भेट होते. अशावेळी संत दर्शनाच्या लाभाने त्याच्या जीवनात आत्मकल्याणाची वेळ जवळ येऊन ठेपते. आजपर्यंत जो आनंद मिळाला नाही तो आनंद मिळाल्याने त्याच्या मनोबलाची ताकत वाढते व सत्य चिरायु सुखाच्या लाभाने त्याला सत्संगतीत खरे सुख असल्याची आत्मानुभुती येते. आता संसारापेक्षा परमार्थात काय आहे व संसारात काय आहे, संसार व परमार्थ या दोन्हीच्या मध्ये जो अंतर आहे त्याची जाणीव होते. गोड परमार्थ लागे कडु तोच आता कडु लागणारा परमार्थ गोड लागू लागतो व घर संसार ऐश्वर्य संसारी सुख हे तुच्छ व भासमान वाटू लागते. आणि याच काळात संताच्या कृपादृष्टीने व सत्संगतीच्या सहवासाने दिवसेंदिवस दया क्षमा शांती त्याच्या ठायी अखंड वास करू लागते. मन बुध्दी चित्त शांत होऊन सर्वाभुती सर्व जिवमात्रावर समभावाने आपले कर्तव्य करीत रहातो. परम पवित्र परमात्म स्वरूपाचा आनंद अंतःकरणात अनुभवास आल्यामुळे स्वात्मानुभवाची वाढ होते. अंतःकरण मृदु व मुलायम होते. परमानंदात सद्गुरू चरणी अनन्यभावे शरण जातो एव्हाना मन गुरूंच्या सत्संगात एकमेव स्थिरावते. यावेळी त्याला बाह्यात्कारी सुख दुःखाचा स्पर्शसुध्दा होत नाही. सदासर्वदा आनंदी आनंद परमानंदी लिन होतो. परमात्म स्वरूप आणि सद्गुरू स्वरूप या मधला जो दृष्टीचा अंतर आहे तो नाहीसा झालेला असतो. सद्गुरूनी दिलेले नाम हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे.याप्रमाणे मनाचा पक्का निर्णय झालेला असतो. आता साधक नामाच्या जपाने व ध्यासाने परिपक्व होतो. नामाये नामं नामस्य वरदं नामामृतं भोजनंम् नाम हेच अमृत भोजन असून या जीवाला वरदान आहे. जो भक्त गुरूनी दिलेले नामजप अखंड करतो. त्याला भुक तहान लागत नाही. ते गोड नाम घेत राहील्याने त्यातच मस्त रहातो. भुकेची तान्हेची आठवण सुध्दा होत नाही. त्याचे एकच कारण म्हणजे नाम हे गोड आहे. त्या गोडीची चव साधकाला लागलेली असते. जोपर्यंत साधकाला नामाची गोडी लागत नाही तोपर्यंत त्याला भुक, तहान, आळस, थकवा, निद्रा, शारीरीक व्याधी हे सतावत रहातात. एकदा का नामामृताचे पाण करण्याचा योग आला व साधक रात्र,रात्र एकाग्रतेप्रत जाऊन पोहंचला की थोडयाच दिवसात त्याला हे सर्व अनुभव येऊ लागतात. आणि साधक साधना मार्गात दिवसेंदिवस उन्नती पथावर रहातो हे साधन प्राप्त होण्यासाठी भक्ताने साधक व्हावे लागते. साधक आणि साधन.
श्री गुरू माउलीना अशा साधकाबद्दल अंतःकरणात जिव्हाळा निर्माण होतो. सद्गुरू त्याला परमशिष्य म्हणुन गुरूपुत्र समजून पुत्रवत प्रेम देतात व तत्वज्ञानाचा उपदेश करतात. त्याच्या अंतःकरणात गुरूविषयी जिव्हाळा निर्माण करतात व त्याला मृदु व मुलायम बनवितात.
मोठमोठी झाडे जाती परी लव्हाळे वाचती. अशावेळी जिव्हाळा प्राप्त झाल्याने तो साधक साधनेत साधना मार्गाने जिव्हाळयात गेला आणि लव्हाळा होऊन सर्व जिवमात्रात वाकत राहीला. तेंव्हाच त्याला ज्ञानाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ असणारे महान आत्मज्ञानाच्या सान्निध्य जाऊन पोहंचता येते. यालाच म्हणतात गुरूकृपा.
गुरू कृपेविन ज्ञान नाही गाती वेद पुराण. सद्गुरू हे समर्थ आहेत, चरित्र आहेत, सद्गुरू सच्चिदानंद स्वरूप आहेत, सद्गुरू ज्ञानरूपी खान आहेत, सद्गुरू तेजाचे तेज आहेत, सद्गुरू परमात्म स्वरूप आहेत, सद्गुरू भक्ताना पावन होतात, सद्गुरू मार्गदर्शक आहेत. सद्गुरू सर्वज्ञ आहेत, सद्गुरू सर्वाठायी व्याप्त आहेत. त्यासाठी भक्त आणि भगवंत यांच्या मधला अंतर म्हणजे सद्गुरू आहेत व सद्गुरू हे ज्ञानरूपी रत्नाची खान आहेत. अषा महान गुरू सद्गुरू माउलींच्या चरण कमली सर्वभावे शरण जाऊन त्यांच्या चरणारविंदी लिन व्हावे.
उत्तम पुजाताई, सर्व भक्तांना साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवा