२४. श्रीक्षेत्र रामवाडी आश्रमात इ.सन १९७२

     श्री परम पुज्य सद्गुरू काशिनाथ महाराज रामवाडी आश्रमात असताना श्री गुरूंच्या दर्शनास दिवसेंदिवस जास्तच भक्तांची गर्दी वाढु लागली. श्री महाराजांची सर्वत्र पसरलेली किर्ती ऐकुन महाराजांच्या दर्शनासाठी १०० ते २०० किलोमीटर वरून भक्तवृंद स्त्रिया, मुले, पुरूष, गरीब, श्रीमंत या सर्वानी आश्रम फूलून जायचा. जे ते भक्त महाराजाना म्हणत असत, अहो महाराज दुष्काळ फार मोठा भयानक आहे, खाण्यास धान्य नाही, पैसा पण दुुर्मिळ झाला आहे. दिवसभर खडी फोडून ५ ते १० रू मिळतात. कुटुंबाला रोज १ शेर धान्य मिळते. त्यामुळे गोर गरीब जनता उपासपोटी रहात आहेत. खडी फोडता फोडता आमची हाडे कुट झाली आहेत. महाराज फार मोठा वाईट प्रसंग आला आहे. अक्षरशः गरीब जनता ४/४ दिवस अर्ध्या भाकरीवर पोट भागवत आहेत.

    असे येणारे प्रत्येक भक्त कळवळुन महाराजांना सांगत असत, तेंव्हा भक्तांचा व जनतेचा कळवळा पाहून महाराज म्हणाले, बाबानो हा सर्व खेळ प्रभुचा आहे, याला आपला काय विलाज आहे, आपणच नाही सर्व भारतभर हीच परिस्थिती आहे, त्यालाही आनंदाने तोंड द्यावे लागेल. दुष्काळ म्हणजे ही परीक्षाच आहे, परिक्षेत आपल्याला पास व्हावे लागणार आहे. त्यासाठी मुखाने हरीनाम घ्या, हाताने जे दिसेल ते काम करा, शुध्द भावाने दयाधर्म करा, भुकेल्या तान्हेल्यांची सेवा करा, आपल्याकडे जे काही आहे ते सर्वचजन झेपेल त्याप्रमाणे अन्नदानात अर्पण करा यातच आपल्या सर्वांचा पुरूषार्थ आहे. श्री महाराज येणाऱ्या सर्वाना उपदेश  करीत असत.

    याच काळात श्री महाराज एक कलई (मोठी) १००/२००  किलो धान्याची भरड शिजवून तर कधी खीर करून येणाऱ्या जनतेला दररोज ५०० ते ६०० लोकाना अन्नदान करीत असत. सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत लोकांच्या जेवणासाठी पंक्ती चालूच रहात असत व जातेेवेळी सर्वांना एकवेळच्या घुगऱ्या बांधून देत असत. याप्रमाणे रामवाडी आश्रमात सतत दुष्काळी काळात महाराजानी स्वतः पंक्तीत फिरून भोजन वाढ करीत असत. बाबानो शांतपणे प्रभुचे नाम घेत पोटभर जेवन करा असे सांगत असत. रोज हजारो गोरगरीब जनता दिवसभर आश्रमात राहून मठावरील सर्व काम करीत असायचे सेवाधर्म म्हणून हातोहात काम करायचे. याच काळात महाराजांच्या आश्रमात ३०/४० पोते ज्वारी, १०/१२ पोते हरबरा व शेंगा ३०/४० पोते, मिरची २/३ पोते, करडी ५ पोते एवढे धान्य आश्रमात शिल्लक होते.

    परंतु प्रभुची करणी पहा, एकेवेळी रामलिंगआप्पा मुरूडकर महाराजांचा परम भक्त याला महाराज त्या दोन्ही कणगीचा लिपण काढण्यास सांगितले. त्या ४/६ पोते मावणाऱ्या कणगीचे लिपण आप्पानी काढताच त्यात गव्हाने काटोकाट भरलेली व दुसरी तांदळाने काटोकाट भरलेली पहाताच भक्त रामलिंगला आनंद झाला व धावतच महाराजांच्याकडे जाऊन म्हणाला, महाराज संपला दुष्काळ! अहो, अहो महाराज सर्व लोकाना पुरेल एवढे धान्य आपल्याकडे आहे. दुष्काळ आहे तोपर्यंत आपल्या मठातून कोणीही उपाशीपोटी जाणार नाही एवढया कणगी भरलेल्या आहेत. हे ऐकुण महाराज म्हणाले थांब वेडया बडबड करू नकोस शांत रहा. ही महाराजांची लिला कोणालाही कळणारी नाही, पण या दुष्काळाच्या एक वर्षाच्या काळात दररोज हजारो गरीबाना अन्नदान करूनही शेवटी अर्ध्याच्यावर धान्य आश्रमात शिल्लक राहीले. अन्नाविना एक जीवसुध्दा परत गेला नाही, ही सर्व महान लिला सद्गुरूनाथाची पाहून येणारे सर्व भक्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन चरणाचे दर्शन घेत असत.याचकाळात १०० ते १५० संन्याशांची एक पदयात्रा १०/२० घोडे एक हत्ती अचानक आश्रमात येऊन दाखल झाले. अंगावर भगवी वस्त्र परीधान केलेले, हातात दंडा व कमंडलु, काखेत वस्त्रप्रावरणाचे बोचके व एक आसनपट्टी अशा रितीने आश्रमात येऊन दाखल झाले. महाराजाना प्रणाम करून आश्रमात एका जागेत एक रहोटी ठोकून मुक्कामास थांबले. त्या सर्व सांधूची व्यवस्था करून आदरातिथ्याने त्यांचा सत्कार केला व त्याना महाराज म्हणाले,  

 बोलिए महात्मन आपकी इच्छा जो भी है वह प्रगट करना महात्माजी।

    हे महाराजांचे बोल ऐकून साधू मंडळी म्हणाले, महात्माजी हमे आज शिरापुरी का भोजन चाहीए. त्यांचे म्हणणे ऐकून महाराजानी जोराची टाळी वाजवून म्हणाले अरे डाॅक्टर, रामभाऊ! त्या रामलिंगला घेऊन तुम्ही त्या साधुना भोजनासाठी सिधा सामुग्री द्या. अशी आज्ञा देऊन ५ शेर तुप, १५ किलो कणीक, ५ शेर गरा, १० किलो तांदुळ व साखर तेल वगैरे. स्वयंपाकाचे सामान दिले. महाराज म्हणाले, त्यांचा तेच स्वयंपाक करतात रे, महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सर्व साहित्य त्याना दिले. त्याप्रमाणे साधू मंडळीनी स्वयंपाक तयार करून महाराजांचा जय करून यथासांग भोजन केले. थोडाफार स्वयंपाक शिल्लक राहिला तेंव्हा साधू म्हणाले, महात्मन भोजन तो यथासांग हो गया बाकी रसोई शेष है. आपके लोगोंको भोजन पा लेना. ते ऐकुन महाराज म्हणाले, अरे शंकर डाॅक्टर त्यांचा स्वयंपाक शिल्लक आहे आपले घुगरी वाटप बंद करा व त्यांना ते वाढून टाका असे म्हणत महाराजानी आलेल्या लोकाना भोजनास बसविले व २०० ते ३०० लोकांच्या पंक्तीत वाढ चालु केली. ५ ते ६ पंक्ती एका रांगेत बसल्या, अंदाजे एक हजार ते दिड हजार लोक जेवन केले तरी पण स्वयंपाक शिल्लकच राहीला. अरे डाॅक्टर तु जेवण आणुन दे व बाकी लोक वाढतील. महाराज जेवण वाढणाऱ्यांना म्हणाले, अरे सर्वाना पोटभर वाढा, पण पात्रावर शिल्लक राहु नये, लागेल तसे वाढा हं. महाराज हातात एक किलो तुपाची कॅटली घेऊन दिगंबर मास्तरना म्हणाले, मास्तर तुम्ही तुप वाढा, असे म्हणुन त्या राहीलेल्या स्वयंपाकावर एक नवे वस्त्र पांढरे शुभ्र झाकुन थोडे पाणी घेऊन त्यावर शिंपडले व बकेट मध्ये मुठभर भात काढून टाकला व म्हणाले, अरे डाॅक्टर पंक्ती उठेपर्यंत हे वस्त्र काढू नकोस तु फक्त काय पाहीजे ते देत रहा. बाकीचे लोक वाढणारे आहेत वाढ पुर्ण झाली व मास्तरच्या हातातील तुपाची कॅटली महाराजानी हातात घेऊन पंक्तीत तुपाची धार भातावर वाढीत राहीले. ती तुपाची धार बंद न करता सारखी ओतीत राहीले. सर्व पंक्तीत तुपाची वाढ होताच महाराजानी श्री शरणुशंकरलिंग महाराज की जय, सिध्दलिंग महाराज की जय, श्री यल्लालिंग महाराज की जय असा दिर्घ स्वरात जयजयकार करून भोजनास प्रारंभ केला. तेंव्हा पुर्ण पंक्ती जेवण करून तृप्त झाले. मग महाराज म्हणाले, अरे शंकर दहा किलो पोत्यातले हरबरे घेऊन ये व पाच ते सहा पातेले किंवा टोपले घेऊन त्यात ते चने समान ठेव व त्या साधुंच्या बरोबर घोडे आहेत ना त्याना पण जेवन घाल. हे महाराजांचे बोलणे ऐकुन डाॅक्टरनी त्या घोडयाना शेर शेर हरबरे ठेऊन भोजन घातले. हा सर्व प्रकार पाहून एक भक्त भगवानराव पाटोळे स्टेशनमास्तर धावत जाऊन महाराजांच्या चरणावर पहुडला. दोन्ही हातानी चरण घट्ट धरून रडत रडत म्हणाला, महाराज आपण महाराज नसून साक्षात परमेश्वर आहात. धन्य, धन्य आहात महाराज आम्ही अज्ञानी आहोत, आपल्या रूपाला आम्ही ओळखू शकलो नाहीत. आपण स्वयं परम परमात्मा आहात क्षमा करा महाराज देवा, देवा. देवा, आपली भेट होऊन आम्हाला पदरात घेऊन कृतार्थ केलेत. रडता, रडता मास्तरची अती आनंदाने दातखीळी बसली तेेंव्हा पटकन महाराजानी मास्तरचे डोके हाताने बाजुला सारून मस्तकावर जोराचा दाब दिला व थोडे पाणी मास्तरच्या मस्तकावर षिंपडताच ते खाडकन् क्षणार्धात सावध झाले. याप्रमाणे सद्गुरू काशिनाथ महाराज इ.सन. १९७२ च्या दुष्काळात एक वर्ष पावेतो गरीबाना अन्नदान करून अनाथांची सेवा करून त्याना अध्यात्मज्ञानाचा व भक्ती मार्गाचा उपदेश करत असत. 

    मुखी नाम व हाती काम हाच उपदेश करून, सर्वाना अखंड नाम व अखंड काम हाच मार्ग जगाला दाखवून दिला. बाबानो नाम घ्या नामच तारणारे आहे. अरे असे हजारो दुष्काळ जरी पडले तरी नामाच्या शक्तीने व प्रभुच्या कृपेने तुम्हाला ग्रासणार नाहीत. सुखी जिवनाची महान गुरूकिल्ली ही नामातच आहे. या नामरूपी चावीने आज्ञान रूपी अंधकारातुन लागलेली कुलुपे सहज उघडतात. तेंव्हाच ज्ञानाचा महाप्रकाश  पडतो. आणि याच ज्ञानाच्या प्रकाशात ईश्वरी शक्तीचे अस्तित्व प्रगट होते. आणि हा मानव देह अंतीम ध्येयाप्रत जाऊन पोहचतो. गुरूसेवेच्या लाभाने निष्काम भावभक्तीने भक्त परिपुर्ण होताच त्याला हे सर्व सौख्य सहज प्राप्त होते. अरे हे लक्षात घ्या, सुख दुःख हे दोघे बंधु आहेत ते सोबत रहातात पण अज्ञानामुळे.

    सुख पहावे जवा येवढे = दुःख पर्वता येवढे. असे भासतात. पण ज्ञानाच्या प्रकाशात जाऊन पोहचल्यावर सुखही नाही व दुःखही नाही. हे सर्व भासमान आहे. आपण जसे मानतो तसे सुख दुःख आहे.  

    सद्गुरू महाराजानी जनतेला महान उपदेश करून ज्ञान देत राहीले. आणि गरीबापासुन ते श्रीमंतापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना , समानतेची वर्तणूक देऊन सर्व जातीधर्माच्या लोकाना भेदभाव न करता एकाच पंक्तीत घेऊन भोजन करीत. भोजनामध्ये सर्वांसाठी एकच स्वयंपाक रहात असे.  बेरड गरीब जोडप्याचा प्रसंग. एकेकाळची गोष्ट आहे. एक बेरड जातीचे जोडपे पती पत्नीसह भिक मागत रामवाडी आश्रमात आले. ते अत्यंत गरीब अंगावर पुरेसे वस्त्र नसलेले त्याच्या पत्नीच्या अंगावर एका फाटक्या साडीचा एक तुकडा दोन हात कसा तरी गुंडाळलेला त्याना महाराजानी पहाताच महाराज जेवता जेवता उठले व रामभाऊ माळीना म्हणाले, अरे रामभाऊ उठ जेवण थांबव जरा, त्या गरीब महिलेच्या अंगावर वस्त्र नाही रे, त्या बोचक्यातले एक लुगडे काढून आण व त्या महिलेला चांगले लुगडे पाहून नेसण्यास दे. अरे तसेच धोती व एक पांढरे शर्टपण आण त्या दोघानाही वस्त्र नाहीत. महाराजानी त्या गरीब बेरड पती पत्नीस नवे वस्त्र परिधान केले. भोजनास बसविले व नंतर महाराज भोजनास बसले. त्या दोघानाही परमानंद झाला व आनंदाच्या भारात दाळ, भाकरी, ताक, भाजी यथोचित्त पोटभर भोजन करून ढेकर दिली आणि हात धुवुन ते दोघेही महाराजांच्या चरणावर लोटांगण घेत म्हणाले, ‘‘बाबा तुम्ही आम्हा गरीबाला आज देव भेटलात आता आम्हाला इथेच काय तरी काम द्या. आम्ही लई दिवस इथच रहाणार आता परत नाय जायचा’’ हे त्या दोघांचे बोल ऐकून महाराजानी त्याना एक पर्णकुटीत गोठयात रहावयास जागा दिली आणि ते दोघे पती पत्नी रांत्रदिवस काम करून उदरभरण करीत. आता एखाद्या श्रीमंतासारखे डोलत हसत शेतीवरील सर्व काम करीत राहीले. चार सहा वर्षाच्या काळात त्याना एक मुलगा व मुलगी झाली ती आवळेजावळे दोन अपत्ये ते सुध्दा लहान मोठी कामे करीत असत. मुलाचे नाव महादु व मुलीचे नाव पेना याप्रमाणे ते बेरड जातीचे कुटुंब सुखात संसार करू लागले याच काळात महाराजानी त्या चौघांना उपदेश गुरूमंत्र मंत्रदिक्षा देवून शिष्य म्हणुन पदरात घेतले. त्यांच्यापैकी मुलगा महादू हा १२ ते १३ वर्षाचा झाला महाराजांचे गुरे राखू लागला. गुरे राखत राखत मुखाने  नमः शिवाय मंत्राचा स्वर लावून नाम जप करीत असे आणि गुरे परत गोठयात बांधुन आल्यानंतर महाराजांच्या सेवेत राहुन सर्व कामे करीत असे. महादू बेरड अवघड व अवजड काम करण्यात पटाईत असे म्हणुन महाराज त्याला पटाईत म्हणुन म्हणत असत. खरोखरच त्याने महाराजांच्या उपदेशाप्रमाणे. 

    हाती काम मुखी नाम . हे त्याच्या अंगवळणी पडले होते. रात्र दिवस महादू कामात व नामात गर्क असे. महाराजांच्या आश्रमात इ. सन. १९५१ ते १९७२ पर्यंत त्यानी आयुष्य व्यथीत केले. यात त्यांचे पाहुणे आले व त्या मुलीसह दोघाना घेऊन गेले. त्याच काळी महाराजांनी महादू बेरडचे लग्न करून दिले व त्या दोघांचा संसार उभा केला.

    प्रथम प्राधान्याने अनाथ, दिनदुबळे या सर्वांची सेवा महाराज सेवाभाव म्हणून करीत असत. या सर्वाना आध्यात्माचा उपदेश करून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करीत. धन हे गरीबांचे रक्त आहे असे श्रीमंतानी समजून वागले पाहीजे. महाराज भेदभाव न बाळगता सर्वाना एकत्र सामावून घेत असत. दया, धर्म भावनेने अनाथाची सेवा करीत महाराज नेहमी सांगत असायचे -

    ‘दया धर्म का मुल है पाप मुल है अभिमान’ दया हेच धर्माचे मुळ आहे आणि पापाचे मुळ अभिमान आहे. दया - क्षमा - शांती ही सर्वात महान व सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याचे इतःह कर्तव्य आहे की, अंगात क्षमता व मनात दया असावी. तोच मानव सर्वश्रेष्ठ आहे तसेच परोपकारी असावा तोच ईश्वर भक्त समजावा. तोच इह लोकीचे कर्तव्य चोख पार पाडतो. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराज अमृतवाणीने जगाला हाच उपदेश करतात. जन्माला येऊन जिवाचे सार्थक करावे असे जर वाटत असेल तर त्यानी परोपकाराचे हत्यार जवळ बाळगावे. परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही. दुसऱ्यांवर दया धर्म या भावनेने वर्तणूक ठेवावी. या भुमंडळात जेवढे काही जीवमात्र विलसत आहेत ते सर्व अणु - रेणु - परमाणु पासुन ते सर्व मात्र हे ईश्वररूप आहेत. जगात जे काही दिसते ते सर्व परमात्म स्वरूप आहे. एकमेकावर प्रेम करणे हेच प्रत्येक जिवाचे कर्तव्य आहे. मनुष्य जन्माला येतो आणि त्याचे कार्य संपताच तो या जगातुन निघुन जातो.येण्याच्या व जाण्याच्या मधला जो अंतर/वेळ आहे तो परमात्म सेवेत प्रभुच्या नामात किर्तनात दया धर्माच्या कार्यात नामस्मरणात संसारात उद्योगात व गुरूच्या सेवेत कर्मरत राहुन ॐ काराच्या ध्वनी लहरीत नाममय होऊन जावे. म्हणजे

    ‘‘असोनी संसारी चित्त त्या परमार्थी’’ याप्रमाणे कार्यरत रहावे. देहाचे आत्मकल्याण होणारे आहे एवढयासाठीच साधुसंत ऋषीमुनी जगाला हाच उपदेश करून गेले व आजही हेच सांगत आहेत. श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यौग्याचे यौगी, तपस्वी, ज्ञानाचे महासागर अथांग भरलेले प्रेमरूपी व नामामृताचे सिंचन करणारे, दयाद्र वृत्तीने भरून उरलेले, प्रेम दृष्टीने एक चालते बोलते एक महामानव म्हणजे, एक परम पवित्र भव्य दिव्य परमात्माच होत. अशा महान परमात्म शक्तीने केलेला महान उपदेश जगाला तारून नेणारा एकमेव राजमार्ग आहे. सद्गुरूनाथानी केलेला अमृतमयी अमृतातील कुंभातुन पाझरणारा अमृतोपदेश आहे. हाच महान उपदेश लेखकाने जो संग्रह करून ठेवला व पुस्तक रूपाने जनकल्याणार्थ भक्तांच्या संरक्षणार्थ व जगाच्या कल्याणार्थ छापून घेण्याचा जो संकल्प केला तो माझे परमप्रिय गुरूबंधु व अन्य भक्तवृंद या गुरूज्ञानाचा प्रचार व प्रसार माझ्या म्हणजे लेखकाच्या देहांतानंतरसुध्दा गुरू ज्ञानाचा पुस्तक रूपात छापुन घेऊन गुरू सेवेचा महाप्रसाद ग्रहन करतील असा माझा माझ्या अंतरीचा अंतरंगाच्या अंतरात्म्यात लेखकाने प्रतींबिंबित करून ठेवला आहे. श्री सद्गुरूनाथ भक्तांच्या अंतरंगात जाऊन वरील उपदेश भक्ताना देऊन, कृपाआशिर्वाद देऊन हे भविष्यकाळाचे कार्य करून घेतील. असा माझा आत्मवि९वास गुरूचरणी आहे.  ओम शांती शांती शांती. लेखक.

    सत्पुरूषांच्या मुखातुन बाहेर पडलेले अमृतमयी ज्ञान जगकल्याणासाठी बाहेर पडले, ही सर्व कृपा व संतलिला त्या पुज्यनिय गुरूमाउलींची आहे. त्यांच्याच कृपेने लेखकाला शब्द ना शब्द लिहुन ठेवण्याची स्मृती लाभली, वरचेवर गुरू कृपा होत राहीली, लेखक लिहित राहिला व गुरूदेव सांगत राहीले. हे लेखकाच्या पुर्वजन्मीच्या संचिताने सद्गुरूनाथानी पदरात घेतले व स्मरण करून सांगत राहीले. क्षमस्व.लेखक.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा