सद्गुरू काशिनाथ महाराज एकेकाळी त्यांचे पणजेगुरू श्री समर्थ पुज्यनिय शरणुशंकरलिंग महाराज बंथनाळ यांच्या दर्शनासाठी काही भक्ताना समवेत घेऊन गेले असताना श्री शरणुशंकरलिंग महाराजांच्या समाधीस १ पुष्प वाहून दर्शनोपरांत क्षणभर शांत व स्तब्ध हात जोडून समाधीपुढे बसले. थोडयाच वेळात उठुन श्री स्वामी महाराजांच्या चरणावर साष्टांग करून हात जोडून स्वामी महाराजाना म्हणाले, स्वामीजी आजचा दिवस महान आहे. आज माघ शुध्द १० दशमी गुरूवार आहे. आजचा दिवस पुण्यपावन आहे. संत तुकाराम महाराजांचा अंगीकार केलेला शुभ दिवस आहे. ही स्मृती आज माझ्या प्रत्ययास आली. शरणुशंकरलिंग महाराजानी याच मिथीला याच वारी श्री सिध्दलिंग प्रभुना पदरात घेतले. तेच शरणुशंकरलिंग महाराज माझे पणजे गुरू आहेत. अहो स्वामीजी, शरणुशंकरलिंग महाराज हे महान यौगी तपोनिधी होते.एकेकाळी ते एका भक्ताच्या घरी आमंत्रण स्विकारून, भक्ताच्या विंनतीला मान देऊन गेले. तेथे एक चमत्कार करून दाखविला, तो म्हणजे एक वांझ गाय त्याच्या दारात उभी होती. तिला पाहुन शरणुशंकरलिंग महाराज म्हणाले, अरे तायाप्पा ती पहा गोमाता आली आहे. अरे तिचे दुध काढुन आण. महाराजांचे शब्द ऐकुन भक्त तायाप्पा थक्क झाला व विचार करू लागला ही गाय तर वांझ आहे, आणि दुध कशी देणार. तरीपण तायाप्पा हा तत्वनिष्ठ, आत्मनिष्ठ व गुरूभक्त गुरूंच्या शब्दावर विश्वासू असल्याने त्याने विचार केला गुरू आज्ञेचे पालन केलेच पाहीजे हा निर्धार केला आणि एक ४/५ लिटरची चरवी घेऊन गायीच्या जवळ जाऊन गोमातेस नमस्कार केला आणि म्हणाला, हे माते आज्ञा गुरूकी, कृपा माताकी, असे म्हणुन गायीच्या पाठीवर एक थाप मारली व चरवी कासाला धरून बसले हात घालुन दुध काढु लागताच गायीने पान्हा घातला आणि क्षणार्धात ४/५ लिटरची कॅटली दुधाने भरली. तो चमत्कार पाहुन जवळचे सर्व लोक थक्क झाले आणि श्री शरणुशंकरलिंग महाराजांच्या चरणारविंदी लोटांगण घेऊन प्रभु प्रभु म्हणुन पुन्हा पुन्हा दर्शन घेत राहीले. तेंव्हा भक्त तायाप्पाला महाराज म्हणाले, अरे आशिर्वाद माझ्या खिरानंद महाराजांचा त्यांची कृपा रे, प्रभु खिरानंदाची कृपा आशीर्वाद ५ व्या पिढीपर्यंत आहे रे, तोपर्यंत प्रभुचा परीपुर्ण आशीर्वाद रहाणार आहे.
प्रभु खिरानंद महाराजांचे गुरू, सिध्दारूढ महास्वामी यांचाच हा महाप्रसाद आहे. सिध्दारूढ महास्वामीनी श्री खिरानंद महाराजाना आशिर्वाद देऊन कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात रायचुर येथे भक्तांच्या संरक्षणार्थ जाण्याची आज्ञा केली. आणि श्री खिरानंद महाराजानी श्री शरणुशंकरलिंग महाराजाना आशिर्वाद देऊन कर्नाटक बंथनाळ गावी भक्ताच्या कल्याणार्थ जाण्याची आज्ञा केली व आशिर्वाद दिला. श्री शरणुशंकरलिंग महाराजानी श्री सिध्दलिंग महाराजाना आशिर्वाद देऊन जनकल्याणार्थ कर्नाटक प्रांतात लच्चाण येथे आश्रमात पाठवून आशिर्वाद दिला आणि श्री सिध्द पंथाच्या उध्दारार्थ श्री सिध्दलिंग महाप्रभुनी श्री पुज्यनिय यल्लालिंग प्रभु महाराजाना आशिर्वाद देऊन भक्तांच्या सेवेत कर्नाटक प्रांतात मुगळखोड येथे जाण्याची आज्ञा दिली. श्री प्रभु यल्लालिंगानी श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशिनाथ महाराजाना आशिर्वाद देऊन १२ वर्षाच्या पद यात्रेत आपण संचार करून मुगळखोड येथे येण्यास दृष्टांत दिला व सिध्दलिंगाच्या व यल्लालिंगाच्या सिध्दपंथाच्या पताका महाराष्ट्र व मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश असे मुगुळखोड ते काशीपर्यंत सिध्दार्थ पताका पोहचविण्याचा आशिर्वाद देऊन महाराष्ट्रात रामवाडी नाम ग्रामी जाण्याची आज्ञा केली. जाता जाता प्रभु यल्लालिंग महाराज काशिनाथ महाराजाना (आपल्या लाडक्या चेल्यास) म्हणाले, अहो काशिनाथ महाराज, आम्हाला कानडीशिवाय मराठी भाषा येत नाही हो, आपण सर्व भाषा जाणता आपले संस्थान गंगाखेड नामक ग्रामी गोदावरीच्या तटी असावे. याप्रकारे श्री शरणुशंकरलिंग महाराज बंथनाळ यांनी सिध्दाच्या पताका आपल्या पंरपंरेतुन वंश परंपंरेतुन पुढे चालविण्याचा आशिर्वाद देऊन कृतार्थ केले. असे बोलता बोलता श्री सद्गुरू काशिनाथ महाराज थोडा वेळ दोन्ही नेत्र बंद करून निशब्द स्थितप्रज्ञ झाले आणि शांतचित्त होऊन म्हणाले, अरे आपण कोठे गेलो होतो हेच काही कळेना. नाही माझे यल्लालिंग, माझे सिध्दलिंग फार मोठे होते रे.
एकवेळा सिध्दलिंग महाराज म्हणाले, बाबानो आता माझे कार्य संपले आहे आता मला प्रभुचे बोलावणे आले आहे. प्रभु आज्ञा पाळणे इतहः कर्तव्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या लडिवाळ बाळानो ऐका, तुम्ही कितीही लांब असलात तरी वर्षानुवर्षे एक वेळ तरी गुरू भेटीला येण्यास विसरू नका. नाही तर वर्षाच्या पुण्यतिथीला (पुण्यकाळात) तरी भेट द्या व त्या एका भेटीतुन आत्मकल्याण करून घ्या.
ही सिध्दलिंगाची वाणी श्री सद्गुरू काशिनाथ महाराजानी लच्चाण येथे पुण्य काळात प्रत्येक्ष मुख कमलातुन बोलून दाखविले हे भक्तानी स्मरणात घ्यावे. श्री सिध्दलिंग महाराज निजानंदी जाण्याच्यापुर्वी एक तास अगोदर स्वःमुखातुन बोलुन गेले. श्री सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणाले, अहो स्वामी महाराज, श्री यल्लालिंग महाप्रभु हेच सांगत असत.
‘संतनकी बात न्यारी परीवारको तारी’.
संत महात्मे हे जगाच्या कल्याणासाठी आपले देह कष्टवित असतात भाव आणि भक्तीरसात डुबुन तळासी जाऊन भक्ताच्या सुख दुःखाचे प्रक्षालन करून भाविकांना दुःखाच्या संवेदनेतून बाहेर काढून सुखासनी आरूढ करतात भक्ती रसामृताचे पाण करून भक्तांच्या मनोभावना पुर्ण करणे हेच संताचे अंतिम उद्दिष्ट असते.
‘संत तारी त्याला कोण मारी’
ज्याला संताचा आशिर्वाद मिळतो त्याला परमात्मा सुध्दा मारू शकत नाही त्याला संतच तारतात. ज्याला मारण्यास घेऊन जाण्यास यमाची स्वारी येते त्याला संत तारू शकतात. संत महात्मे महापुरूष हे तारक आहेत मनुष्य जीवनाचा उध्दार करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा अवतार घेतात व पृथ्वीतलावर अवतीर्ण होऊन मानवी रूपात जग कल्याणाचे कार्य ईश्वरी सत्तेप्रमाणे युगानुयुगे संतच करीत आले आहेत. आजसुध्दा महापुरूषांच्या साधु संताच्या कृपेने आपण जीवन जगत आहोत. संतकृपा फळा आली या सर्व गोष्टीचा विचार केला तर अंती हेच लक्षात येते की, सद्गुरूकृपा हीच फार मोठी व महान कृपा आहे. संजिवनी कृपा वल्ली आहे.
महाराजानी बंथनाळ मठात केलेले निरूपन.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय
उत्तर द्याहटवासद्गुरु काशिनाथ महाराज यांनी स्व मुखातून सांगितलेले निरूपण ऐकायला मिळाले
वर्षातून एकदातरी पुण्यतिथीला सद्गुरु देवांचे समाधीचे दर्शन घ्यावे समाधी ही .समाधी नसून प्रत्यक्ष श्री सद्गुरू आहेत सर्व भक्तांनी हा आदेश पाळल्यास जन्माचे कल्याण होणारआहे श्री महाराजांचा हा आदेश आहे खूप छान पूजा तुझ्यामुळे हे आम्हाला ऐकायला मिळाले वाचायला मिळाले खूप छान धन्यवाद
जय सदगुरू,
उत्तर द्याहटवासिद्धारुढ स्वामी, खिरानंद स्वामी, शरनोशंकरलिंग महाराज, सिद्धलिंग महाराज, यल्लालिंग महाराज, श्री समर्थ सद्गुरु काशिनाथ महाराज ही आपली गुरुपरंपरा या उपदेशात दिलेली असून सद्गुरू चमत्कार आणि कार्याची थोडक्यात माहिती उत्तम अशी डॉक्टर शंकरराव अण्णा यांनी दिलेली आहे. आखिल भक्तांवर लेखकांचे उपकार आहेत.