२२. योग.

    योग व प्राणायाम ही विद्या जीवन निरोगी ठेवणारी व आत्मशक्ती वाढविणारी एक महान शक्ती आहे. आजारचे मुळ म्हणजे अनियमितपणा. योगाभ्यासाने अनियमितपणा नाहीसा होतो व प्रकृतीला व्यायाम मिळाल्याने प्रकृती निकोप रहाते. अन्न पचनक्रिया सुरळीत चालु रहाते, दिवसेंदिवस भुक वाढत रहाते, पचन शक्तीची वृध्दी होते. योग साधना नियमितपणे करीत राहील्याने योगात व प्राणायामात उन्नती होत रहाते. मनुष्य २/२ तास योगसाधनेत सहज बसू शकतो. उजवी मांडी वर घेऊन सरळ रेषेत मांडी घालुन ताठपणे बसावे, हाताचा पंजा सरळ रेषेत ठेवावा. नेत्र बंद करून इच्छित देवतेची प्रतिमा समोर पहावी. (कल्पनेने) ओठातून श्वास हळुवारपणे ॐ ओम च्या स्वरात आतल्या आत घेत रहावा व तितक्याच हळुवारपणे श्वास बाहेर सोडावा. असे सतत १/२ तास सहजासनात बसण्याचा प्रयत्न करीत रहावा. रोज ५/५ मिनिटाने वेळ वाढवीत जावी व मन शांत ठेऊन नित्य नैमित्तिक हा अभ्यास करत रहावा. ४/५ तास भोजनाच्या अगोदर पोट मोकळे असताना ही साधना करावी. सहजासनावर बसुन बिजमंत्राचा जप करीत रहावा. दोन्ही नेत्र बंद करून अंतरदृष्टी भ्रुकुटी स्थानी दोन्ही भुवयाच्या मध्यभागी स्थिर करावी. दोन्ही हात गुडघ्यावर सरळ रेषेत मनगटे ठेवावीत व सरळ ताठपणे बसावे आणि गुरूंनी प्रदान केलेल्या बीजमंत्राचा जप आतल्या आत चालू ठेवावा. ध्यान त्रिकुटस्थानी म्हणजे भ्रुकुटी स्थिर करावे. मनाला इतरत्र न जाऊ देता दोन्ही भुवयाच्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करावा. काही दिवस जप सतत नियमाने करीत राहील्यास हळु हळु मन एकाग्र होत राहील व शांतीचा अनुभव येत राहील. पायात कळा येऊन आळस थकवा मांडया अवघडने इत्यादी व्याधी होत राहतील. तरीपण निश्चय करून बैठक स्थिर ठेवावी व हालचाल न करता शांतीच्या अनुभवाकडे चित्त् स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. हात पाय न हलवता अंतरदृष्टीने आतच पहावे नामस्मरण शांत श्वासाच्या गतीसोबत चालु ठेवावे. सावकाश श्वास घेत रहाणे व श्वासासोबत नाम घेणे व परत तितक्याच सावकाशपणे श्वास बाहेर सोडावा. १ ते २ तास साधनेत बसण्याची सवय ठेवण्याचा प्रयत्न करावा. ४/६ महिने होताच ही क्रिया सहजपणे करता येते. त्यावेळी मनाचे विचार शुध्द व पवित्र होऊन मन शांतीचा लाभ होतो. 


टिप्पण्या

  1. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय
    पूजा च्या हातून खूप महान कार्य होत आहे तुझ्यामुळे आम्हाला ऐकायला वाचायला मिळत आहे खूप छान पूजा तुझी सेवा श्री महाराजा पर्यंत पोहोचत आहे
    जय सद्गुरू

    उत्तर द्याहटवा
  2. सद्गुरू शब्द हे प्रमाण आहेत. योग उपदेश अनुकरण केल्यास आरोग्य उत्तम राहते. यामुळे नामस्मरण करण्यास चैतन्य मिळते, विचार शुद्ध होतात व वाणी पवित्र होते.
    संतांचे शब्द अभंग आहेत. उपदेश पालन करण्याकरिता अखंड सत्संगात राहिल्यास सद्बुद्धी मिळतेच. जय सद्गुरू.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा