२१. गुरूलिला.

    श्री पुज्यनिय सद्गुरू काशिनाथ महाराज इ.सन. १९७३ साली श्री क्षेत्र काशिविश्वनाथ यात्रेला प्रयाण केले. रामवाडी आश्रमातुन एका बैलगाडीत सोबत २/३ भक्ताना घेऊन मुरूड ग्रामी आले. मुरूड येथील भक्त डाॅ. शंकरराव नामदेव बचाटे याना सोबत घेऊन यात्रेस प्रयाण केले. मुरूड ते पुर्णा स्टेशन एस. टी ने प्रवास करून पुर्णा ते खांडवा मार्गे रेल्वेने प्रवास चालु झाला. बा.अकोला ओलांडताच पुढे थोडया अंतरावर तापी नदीच्या ब्रिजवरून रेल्वे चालु असताना पुज्यनिय महाराज म्हणाले, अरे डाॅक्टर! ही तापी नदी आली पहा, भक्त दिगंबर गायकवाड एस.टी. ड्रायव्हर उस्मानाबाद याना लगेच म्हणाले, अरे दिगंबर! तुझी तापी आली बघ. अरे तुझा गेल्या जन्मी याच तापीच्या काठी असलेल्या एका गावात जन्म झाला होता, इथेच तु लहानाचा मोठा झालास, तु रोज तापीमध्ये स्नान करीत होता, अरे वेडया ही तापी तुझी आहे. पुढेसुध्दा तुझा पुढील जन्मसुध्दा तापीच्या काठीच आहे बर का! लक्षात ठेव. येवढे बोलता बोलता प्रसन्न वदनाने महाराज म्हणाले, अरे! आता आपला प्रवास रेल्वेचा चालु आहे. डाॅक्टरला उद्देशून तापी नदीचे महात्म्य उपदेश केले.

    तापी नदी महात्म्य.

    तापी नदी अग्निरस महर्षी यांच्या स्पर्शाने तेजस्वी व तप्त झालेली आहे. ही पवित्र तिर्थधारा म्हणुन प्रसिध्द आहे. हे पहा नदीच्या पलीकडे दिसणारी जी डोंगराची रांग आहे. तो सातपुडा नावाचा डोंगर आहे. फार वर्षापुर्वी तापीच्या काठीच सातपुडयाच्या डोंगरात एका अंधःकार असलेल्या गुहेत अग्निरस महर्षी तपश्चर्येला बसले होते. महर्षीनी याच गुहेत २१ वर्षे तपोनुष्ठान केले. वायुमय प्राण ठेऊन तप साधना करीत असत. त्यांच्या नित्य नियम असे की, पहाटे चार वाजता आसनावरून उठत व कमंडलु हातात घेऊन धुनीतुन अग्निचा रसरसीत लाल कोळसा कमंडलु भरून घेत आणि जवळच असणाऱ्या तापी तिर्थाचे पुजन करीत. कमंडलुतील अग्नि तापीमाईच्या प्रवाहात अर्पण करीत. कमंडलु भरून तापीचे तिर्थ (जल) गुहेतील प्रज्वलीत धुनीत पुजा करून ते तिर्थ सोडत असत. याप्रमाणे महर्षींचा नित्य नियम असे. त्रिकाळ तापीचे स्नान व पुजा हा नित्य नियम असे. दुपारी मध्यांन्नी बारा वाजता अग्निरस महर्षी धुनीतील रसरसीत लाल अग्नि दोन्ही हातात घेऊन जोराने दाबून कमंडलुमध्ये पिळताच त्या अग्निचा रस होऊन कमंडलु अग्निरसाने भरत असे. तेंव्हा १२ वाजुन ३० मिनीटानी ते अग्निरसाचे कमंडलुतील तिर्थ (अग्नितिर्थ) म्हणुन ३ वेळा ॐकाराच्या प्रणवध्वनीत तीनवेळा आचमन करीत असत. याप्रमाणे महर्षींचा नित्यक्रम असे. असे २१ वर्षाच्या तपोनुष्ठानात तपश्चर्या करीत राहीले. तेंव्हा पासुन तापीमाईचे तिर्थजल इतर नद्याच्या तुलनेत अखंड पाण्याचा प्रवाह उष्ण पाणी होऊन प्रवाह चालु झाला.

    महाराज म्हणतातः- तापीच्या तिर्थात स्नान करताच असाध्य रोगसुध्दा बरे व्हायचे. तेंव्हापासुन बरीच लोकवस्ती तापीच्या काठाने वाढत गेली व लोक रोगमुक्त होऊन सुखी जीवन जगत राहीले. थंड पाणी असणारी तापीमाता उष्ण होऊन अग्निरस महर्षीच्या तपोबलाने तापीचा परिसर पवित्र झाला. हजारो मानव प्राण्यांच्या व्याधी नष्ट झाल्या. त्या काळात तापीला (तृप्ती माई) म्हणुन लोक संबोधीत असत. तृप्ती या शब्दाचा अपभ्रंष होऊन आज आपण तापी म्हणून ओळखतो. अग्निरस ऋषींच्या भेटीस याच काळात श्री समर्थ प्रभु दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तृतिय अवतारात आळंदी ते शिरपुर राममंदिरी निवास करून तृप्तीमाईच्या प्रवाहातुन शांतपणे तृप्तीमाईना वस्त्र परिधान करून प्रणवाच्या ध्वनिलहरीत तृप्ती पार करून सातपुडयाच्या डोंगर रांगेतून संचार करीत अग्निरस महर्षींच्या आश्रमात पोहचले आणि महर्षीना आशीर्वाद प्रदान करून एका डोंगर शिळेवर ११ वर्षे अनुष्ठान करीत राहीले. अंदाजे तीनशे ते चारशे वर्षापुर्वी प्रभु दत्तात्रयाच्या पवित्र पाद्यकमलानी ही भुमी शुध्दतम व पवित्रम झालेली आहे. 

    परमेश्वराची लिला पहा कशी अघटीत आहे. अग्निरस महर्षींच्या पावन स्पर्शाने व तपोबलाने तृप्ती नदी थंड पाणी उष्ण होऊन भक्त रक्षणार्थ प्रवाहीत राहीली. हीच प्रभुची अघाद लिला आहे. परमात्मा कसा खेळतो व जिवात्म्याला कसा खेळवितो ही त्याची लिला आहे. या लिलेचा अंत तोच जाणतो याप्रमाणे श्री गुरू प्रभु देवानी तापीचे महत्व सांगता सांगता एकदम शांत झाले.

    पुढील प्रवासात माणिकपुर रेल्वे स्टेशन येताच आम्ही सर्व भक्त उतरून थोडीफार विश्रांती घेताच वाहनाची सोय नसल्यामुळे माणिकपुर ते चित्रकुटधाम महाराजांच्या समवेत सर्व भक्त १५/१८ किलोमिटर चित्रकुटला पदयात्रेने प्रवास चालु केला. १० ते १२ किलोमिटर जाताच डोंगराळ प्रदेश व घनदाट आरण्य लागले पर्वताच्या रांगेतुन पाऊल वाटेने प्रवास चालु झाला तेंव्हा महाराज म्हणाले, अरे ही भक्तीची पाऊलवाट आहे. भगवंताकडे जाण्याचा हा राजमार्ग आहे. प्रभुच्या मिलनाचा मार्ग आहे. भक्तीची पाऊलवाटच असते पण हे लक्षात ठेवा ही पाऊलवाट आहे खरी, पण ती अवघड असते, खडतर असते, अनेक काटे बोचतात, अनेक महाभयंकर संकटाना आनंदाने तोंड  देऊन वेळ काढावी लागते. पण ही वाट सोडता कामा नये. एकदा का मार्गाला लागलो की संकल्प करूनच रस्ता धरावा लागतो. तरच पाऊल वाटेची भेट होते व काही अंतरावर तो जग नियंता महाप्रभु वाट पहातच बसलेला असतो. बहु प्रयत्नांती अनेक अपत्तीना सहन करूनच त्या परमात्म्याची भेट होते. याप्रमाणे महाराज ज्ञानाचा बोध करीत पायी पायी चालत असताना समोरच एक जोराचा ध्वनी आला.

जय सियाराम जय सियाराम जय श्री राम. एवढयात भक्त पुढे पहातात तो काय २/४ नागडे भिल्ल वस्त्राऐवजी कमरेभोवती वृ़क्षाच्या वेळी गुंडाळलेल्या, काळेभोर वर्णाचे, शरीरयष्टी धिप्पाड होती. त्याना पहाताच सर्व भक्त घाबरले. पण ते बिचारे जय सियाराम म्हणत महाराजांच्या जवळ येऊन श्री गुरूचरणावर साष्टांग करून महाराजाना विनंती करू लागले.

     महात्मण आप भक्तोंके साथ हमे शुभ दर्शन दिया। श्रीरामकृपासे हमे बडी प्रसन्नता हुई। आप ऐसे बडीया प्रभु महात्मन का पदस्पर्श हुआ। यह हम बडीया दैवशाली है। महात्मन यंहासे करीब १०० पाँवपर हमारी कुटीया है। हम आपके चरणोंके दास हैं । विनम्रतासे मांग करते हैं। आप एैसे श्री रामप्रभु के चरण हमारी कुटीयामे लगवा देवे यह हमारी प्रार्थना है ।

    हे त्या भिल्लाचे शब्द ऐकून महाराजानी आनंदीत होऊन त्याना म्हणाले, हां भक्तराज चलीए! प्रभु रामचंद्रजीका आदेश है. याप्रमाणे महाराज त्या भिल्लांच्या १०/१५ झोपडया असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचताच त्या भिल्लाचे ३०/४० पुरूष, बायका व मुले हे सर्व ‘जय सियाराम जय महात्मन’ असा जयघोष करत जय सियाराम म्हणुन सर्वानी दर्शन घेतले. आणि महाराजाना एका भस्माच्या (राखेच्या) ढिगाऱ्यावर सफाई करून त्यावर भक्ताना बसविले व महाराजाना एका वेगळया राखेच्या ठिकाणी आसन करून बसविले.  थंड पाणी व एक एक लिटरचे मडके भरून दुध पिण्यास दिले. महाराजानी दुध पिताच ती भिल्ल मंडळी सर्व आनंदाने महाराजांच्या भोवती फेऱ्या मारू लागले, नाचू लागले, टाळया वाजवून महाराजांच्या भोवती नृत्य केले व म्हणायला लागले.

    ‘पियोरे पियोरे जय सियाराम दुध पियोरे’ असे म्हणत नाचत महाराजांना प्रदक्षिणा केल्या. शेवटी श्रीचरणाचे दर्शन घेऊन सर्वानी निरोप दिला. तेंव्हा महाराज हे पाहुन आनंदमय वृत्तीने चालता चालता म्हणाले, पहा प्रभुचा खेळ काही वेगळाच असतो. तो कधी काय करेल हे कळणे महाकठीन आहे. तो महाप्रभु अनंतरूपानी अनंतलिला करून स्वतःचे मनोरंजन स्वतःच करून घेतो. काय कमाल आहे त्याला निर्गुण निराकार म्हणावे तर सगुण साकार रूपातून अवतीर्ण होऊन नानावीध रूपातून तोच कार्य करीत असतो. कार्य करविता तोच आहे आपण मात्र निमित्तमात्र आहोत. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याचेच तर अस्तित्व आहे. परमात्मा एक आहे. अकार -उकार- मकार  अर्ध मात्रा शुन्य एकून साडेतीन मात्रेत तोच सामावलेला आहे.

     तोच निर्गुण- निराकार- असुन सगुण- साकार पण आहे. अशा त्या महान शक्तीला या मानवी देहाच्या सुक्ष्म (अल्प) दृष्टीने पाहणे महद् कठीण आहे. अरे शंकर डाॅक्टर! हे चित्रकुट धाम आहे, याच पावनभुमीत आपण चालत आहोत, याच चित्रकुट भुमीत ३०/३५ किलेामिटरच्या परिसरात प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असताना चौदा वर्षाच्या काळात ११ वर्षे सहा महीने प्रभुनी याच भुमीत निवास व संचार केला. श्री रामचंद्र प्रभुच्या तपोबलाने भगवान शिवशंकर त्या समोरच्या पर्वतातून प्रगट झाले व रामचंद्र प्रभुला आशिर्वाद दिला. त्या पर्वताला आज कामदगिरी पर्वत म्हणून ओळखतात. त्याचवेळी प्रभु रामचंद्रानी भगवान शिवशंकर प्रगट होताच, पर्वताच्या भोवती पाच किलोमिटर बाहेरून प्रदक्षिणा घालुन प्रभु शिवभगवानांचे दर्शन घेतले. याच चित्रकुट धामामध्ये पवित्र परिसरात अत्रीमुनी व अनुसयाचे वास्तव्य होते. भगवान हनुमंतजी श्री रामचंद्र प्रभुंच्या सेवेत याच भुमीत वास्तव्यास हजर असत. त्यांच्यासाठी हनुमानधारा म्हणून शुध्द जलधारा निर्माण केल्या आणि सहस्त्र जलधारा श्री प्रभु रामचंद्रजी व आत्रिमहर्षींच्या तपोबलाने पर्वत रांगेतून प्रवाहीत झाल्या व त्या सहस्त्र जलधारा प्रवाहीत होऊन मंदाकिनी तिर्थ झाले. गोदामाई पर्वताच्या रांगेतून जलधारा बाहेर सोडून प्रवाहीत झाल्या व इथेच गुप्त झाल्या अशा पवित्र भुमीत आज आपण सर्वजन पदयात्रेने संचार करीत आहोत.याप्रमाणे महाराज बोलत बोलत एकदम शांत झाले व त्यांच्या मुखकमलावर आंनदमय प्रखर तेज चकाकू लागले. हसत मुखाने थोडावेळ काही न बोलता शांतच राहीले इतक्यात एक निमिष्यमात्रात श्री महाराजांच्या जटेतुन एक सुक्ष्म जलधारा प्रवाहीत होऊन नेत्रातुन पाण्याचे थेंब पटपट खाली पडू लागले. हे दृष्य क्षणमात्र सर्व भक्तांना दिसताक्षणीच एकदम बंद झाले व महाराजांच्या डोळयाभोवती एक सुवर्णमय पिवळया रंगात अर्ध गोलार्ध पट्टा दिसु लागला. तोच महाराजानी एकदम नेत्र उघडून पाहीले व म्हणाले, अरे अरे कुठे गेलो होतात. बर असु दे इच्छा त्या यल्लालिंगाची. अरे ते प्रभु यल्लालिंग महाराज माझे गुरू ते फार मोठे आहेत रे, त्यांच्याच शक्तीचा हा खेळ आहे. एकेकाळी सिध्दलिंग महाराज म्हणत असत, अहो! यल्लालिंग महाराज काशीविश्वेश्वर विश्ववनाथ व काशिनाथ हे सर्व एक, पण हे जग डोळयाने आंधळे आहे, ना धड दिसत नाही ना धड ऐकु येत नाही, मग मी तरी काय करू असे महाराज बोलता बोलता एकदम शांत झाले.

वाराणसी बनारस येथे मुक्काम. 

    या काळात महाराजांचा मुक्काम वाराणसी बनारस येथे श्री शेठ लच्छिराम धर्मशाळेत दुसऱ्या मजल्यावर चार नंबरच्या हाॅलमध्ये होता. तारीख इ. सन. १९७३. साली लच्छिराम धर्मशाळेचे मॅनेजर गुडालिया शेठ होते. ते अचानक वरच्या मजल्यावर येऊन सरळ महाराज थांबलेल्या हाॅलमध्ये आले आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन नेत्रातून पाणी गाळत महाराजाना म्हणाले, महात्मन मुझपर कृपा करे, मैं अज्ञान अंधःकारसे आपको नही पहचान सका, यही मेरा दुर्भाग्य है। आप ऐसे परमात्मा गत तीन दिनसे यंहा रहकर भी मै आपके तरफ देखा भी नही यह मेरी बडिया गलती हुई। महाराज आज मुझे परमात्मनका दर्शन हुआ यह भी मेरा बडा भाग्य है। महाराज मै पुनीत होकर आपके चरणोमें शरण लेना चाहता हुं। आपके चरणोकी सेवा का आशिर्वाद मिल जाए तो मै भाग्यशाली बन सकुं यही मेरी चरणोंपर प्रार्थना  है। 

    त्या धर्मशाळेच्या मॅनेजरची विनवणी ऐकुन श्री महाराज त्याना म्हणाले, अहो मॅनेजरसाहेब एकदम तुम्हाला हे वैराग्य झाले कसे. महाराजांचे शब्द बोल ऐकून मॅनेजर म्हणाले, महात्मन मै रातमें चार बजकर तीस मिनीट बजे निंदमे शांतीसे डुब गया था। उसी समय सपनेमे आप ऐसा महापुरूष मेरे सामने एक दंडा हातमे लेकर खडा रहा। तब मै पुछा महात्मन आप कंहासे आए हो इस समय आप कंहा जाओगे। तब ओ मुझे कहने लगे भाईसाहब मै कर्नाटक प्रांतसे आपके लिए आया हूं ऐसा कहकर मेरे सामने पुजा सामग्री एक बर्तनमे लेकर बैठे मुझे बोले, अरे भाई आसन लगाकर सामने बैठो। आज्ञाके अनुसार मै आसन लगाकर बैठा रहा तब मुझे आंख मुछनेका आदेश दिया क्षणमात्र मे एकाग्रतामे डुब गया। तब मुझे आंख बंद होकर भी एक त्रैमुर्ती भगवानका दर्शन हुआ और आप एैसे भगवा वस्त्र परिधान किया हुआ एक आपके एैसा महापुरूष सामने आकर मेरे मस्तक पर हात रखा। और बोले ॐ शांती शांती शांती। यह पुरा चमत्कार दिखानेवाले आप ही परम भगवान है। असे सांगून मॅनेजरने महाराजांचे दर्शन घेतले.  

    हे ऐकताच महाराज म्हणाले, डाॅक्टर एक तांब्या भरून पाणी आण व आसन टाकून पुजेचे सामान ठेव. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे एक आसन घालून समोर पुजेची तयारी करताच महाराजानी मॅनेजरला आसनावर बसण्यास सांगितले व त्याना बीजमंत्र उपदेश देऊन शिष्य करून घेतले नाममंत्राचा उपदेश देऊन काही निवासी भक्तांचे दृष्टांतातुन मनोरथ पुर्ण केले यालाच म्हणतात योगायोग.

    श्री महाराज भक्ताना वेळोवेळी हेच सांगतात अरे, कुठल्याही कार्यासाठी काळ आणि वेळ यावी लागते. काळ आणि वेळ येण्यासाठी वाट पहावी लागते. योगायोगानेच काळ व वेळ येते व काळाप्रमाणे क्षणसुध्दा लागत नाही अरे तो भक्त आपल्या ऋणानुंबधातला असल्यामुळे बहुजन्माचा आपलाच असल्यामुळे त्याचा आज योग आला व त्याच्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट पुर्ण झाले. भक्त भागुबाई व भक्त काशिबाई या भक्ताना माई लोकांना महाराज उद्देशून म्हणाले, अरे डाॅक्टर कसा खेळ आहे पहा, काशी भागीरथी तर आपल्याच बरोबर आहेत हे काशिक्षेत्र आणि ही भागीरथी तिर्थ हे तर महान परमपावन तिर्थ आहे. हीला वाराणसी म्हणतात. हे पहा नऊ खंड पृथ्वी व दहावा खंड काशी आहे म्हणे, तेवढयासाठीच काशिखंड नावाचा एक फार मोठा ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे का? आणि कसा? खंड पडतो त्याचा उलघडा करून घेतला पाहीजे. पण का -  म्हणजे काशि, कसा ही काशी - नऊ खंड पृथ्वी म्हणजे खंड न पडू देता भागीरथी नदी गंगामाई अखंड वाहत असते तीचा कधीही खंड पडत नाही. सांगण्याचा सारांश निट लक्षात घ्या. लक्ष व मन हे दोघे भाऊ म्हणजे लक्ष्मण, या लक्ष आणि मनाला लक्ष्मणाला प्रथम ओळखा. गुरू भक्ताला जेंव्हा मंत्रोपदेश देतात  (दिक्षा) त्याला मंत्राचे अखंड नामस्मरण करण्यास सांगतात. ९ खंड नव्हे अखंड. खंड न पडता नामस्मरण चालले पाहीजे. काशीची गंगा भागीरथी जशी संथपणे प्रवाहाने खंड न पडता वाहते. तिच्या उगमापासुन ते सागराला जाऊन मिळेपर्यंत खंड पडत नाही. म्हणजे अखंड ती गंगा गुरूनी दिलेले नामसुध्दा या गंगेप्रमाणे संथपणे खंड न पडता अखंड वाहत राहीले पाहीजे. तरच ते भगवंताला जाऊन मिळते. नसता किंचीतही खंड पडला तर ते या पुर्णायुष्यात अंतीम टोकापर्यंत जाऊ शकत नाही. नाम हे स्तब्ध नसून प्रवाहीत आहे, गतीशिल आहे. सर्वश्रेष्ठ सामथ्र्यवान असून परमपावन व पवित्र आहे, ईश्वराचे नाव आहे. नाम हे तारून नेणारे एक मोठयात मोठे साधन आहे. नाम हेच अमृत भोजन आहे. नाम हे नाव नसून त्या प्रभुचे नाम आहे. म्हणजे बीजाक्षर आहे नाम हे चैतन्याचा महाप्रकाश आहे. नाम हे मुळ बिज महामंत्र आहे नाम हे आदि - मध्य - अंती अखंड आहे. नाम हे अविनाशी - अजर - अमर - निर्गुण - निराकार - मंत्रराज मंत्राचा राजा आहे. एवढयासाठी महामंत्राचे आद्याक्षर ॐ च आहे. सद्गुरू शिष्याला नाम देऊन उपकृत करतात. नामासारखे महत्व व नामाची थोरवी नामाची महान शक्ती. केवळ एका ॐ मध्येच गुप्त रूपाने सामावलेली आहे. म्हणुन आगम - निगम - उगम - चारी वेदशास्त्रे, पुराण सर्व नामाचीच थोरवी गातात. संत ज्ञानेश्वरानी सांगितले आहे की, नाम वेदत्रयीचा राजा सांख्य - मनुस्मृती - वेद गातात  ॐ ॐ ॐ ॐ ॐ   अ. उ. म. ओंकार.येवढयासाठी श्री परम पुज्यनिय सद्गुरू काशिनाथ महाराज कलियुगाचे युग प्रवर्तक महापुरूष कर्म - कर्म - कर्म - कर्म. पदभ्रमण. पदभ्रमण. पदभ्रमण. मुखी नाम - मुखी नाम - मुखी नाम. हाती काम - हाती काम - हाती काम. 

    म्हणजे या मानवाला उपदेश करीत असत की, बाबानो अखंड नामात रहा. अखंड कर्म करीत रहा. अखंड पायी चालत रहा. मुखात ॐकार प्रत्येक श्वासासोबत ठेवा. हाताने अखंड काम करीत रहा तरच या जन्माचे सार्थक होऊन शिल्लक राहिलेले आध्यात्माच्या बॅंकेत जमा रहाणारे आहे व पुढील जन्मासाठी धन आजच जमेमध्ये शिल्लक ठेवा.

    प्रारब्ध - संचित - आणि क्रियामान म्हणजे 0 शुन्य कर्माप्रमाणे संचीताची ठेव पुढील जन्मी आपल्या उपयोगी पडेल.

शांती शांती शांती

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा