१५. मुक्तीचे द्वार.
सद्गुरूंचा परम पवित्र अनुग्रह हेच ज्ञानाचे मुख्य द्वार आहे. जो भक्त सद्गुरूंना सर्व शुध्द भावाने शरण जातो व परमेश्वराची शरणांगती पत्करतो त्याला ज्ञानाचा मार्ग सुलभ होतो. हीच गोष्ट सत्य आहे. परंतु त्या पुरूषाला महान योगी पुरूषाकडुन अनुग्रह मिळणे हे महत्वाचे आहे. गुरूंच्या दिक्षेनंतर साधना मार्गातील ज्ञानाची प्राप्ती होते. साधना - साधन - साध्य साधना करीत राहील्याने साधन अवगत होते आणि साधनाच्या प्रगती नंतरच सर्व असाध्य सुध्दा साध्य होते. नामस्मरणात क्रमाक्रमाने सर्व काही साध्य करून घेता येते. गुरू हे मंत्र (दिक्षा) देतात (गुरू देतात) व ब्रम्हानंदाचा आनंद परमानंदाची प्राप्ती व चैतन्य स्वरूपाची अनुभुती शिष्याला प्राप्त व्हावी म्हणुन गुरू त्याला सत्संगात ठेवतात. पुन्हा पुन्हा गहन ज्ञानाचा मार्ग दाखवुन ज्ञान दानाचे कार्य करीत असतात गुरू सांगतात.
‘ नहि ज्ञाणेन सद्रशम्’.
ज्ञानासारखी महान शक्ती या भुतलावर प्राप्त होणारी नाही. कारण ज्ञान हे गुरूमुखातुन व गुरूसेवेतुन आणि निष्काम भक्तीतुन प्राप्त होणारे, महान शक्तीसंपन्न ज्ञान आहे. त्यासाठी महाराज सांगतात ज्ञानासारखी महान शक्ती या प्रथ्वीतलावर अन्य कोठेही नाही. तुम्हाला पहायला मिळणारी नाही, ज्ञानासारखी कुठलीही वस्तु भुतलावर मिळणार नाही म्हणुनच संत सतत सांगतात.
नहि ज्ञाणेन सद्रशम्.
परम पवित्र नाम हे मुळ बीज आहे व त्या मुळ बिजातच नाम समरस आहे व ज्ञानपण नामातच समरस आहे. हेच मुळबिज महाराज भक्ताला निक्षुन सांगतात. बिज बोया बबुलका तो आम कंहा से आय ।। अखेर लक्षात ठेवा बाभळीचे बिज लावले तर आंबा येणार नाही. बाभळीला शेंगारूपीच फळे येणार. आंब्याच्या फळासाठी आंब्याचेच बिज (कोय) लावाली लागणार तेंव्हाच मधुर रसाचे पाण करता येईल. त्याप्रमाणे सद्गुरू मधुर रसाचे अमृतपान भक्ताला लाभावे म्हणुन शुध्द बिज मंत्राचा मंत्रोपदेश देतात व शिष्य करून घेऊन सत्संगात ठेवतात साधनेत परिपक्व करून घेतात. महाराज म्हणतात.
शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी.
शुध्द बिज मंत्राचे, भक्ताच्या अंतःकरणात मगदुरी प्रमाणे मोसमाप्रमाणे काळ आणि वेळ पाहुन या मानवी देहाच्या क्षेत्रात शुध्द बिजरोपन करतात. आणि त्या भक्ताला अंग - संग - समरस करून घेतात. तेंव्हा त्या बिजाला अंकुर फुटुन कालांतराने एका सतेज रोपटयात रूपांतर होऊन क्रमाक्रमाने एका आवाढव्य वृक्षात त्या बिजाचे रूपांतर होते. त्याच वेळी मोसमाप्रमाणे पुष्प येऊन फुलामागे मधुर मधुर व गोड गोड रसाळ व गोमटी फळे येतात.
शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी. याप्रमाणे गुरूंची कृपादृष्टी शिष्याच्या ठायी होऊन कालांतराने ज्ञानाच्या अलभ्य लाभाने शिष्यास परिपुर्ण अवस्थेतुन ज्ञान मार्गाने आणि आत्मज्ञानाच्या उपदेशामृताने आत्मा आणि जिव व परमात्मा शिव तत्व ज्ञान देहात्म बुध्दीच्याद्वारे अंतःकरणाच्या ठायी सुक्ष्म तत्वातून शिष्याच्या मगदूरी प्रमाणे शैने शैने बिज मंत्राच्या महान शक्तीचा प्रभाव शिष्याच्या अनुभवास येतो. पण गुरू आणि शिष्य ज्ञान व वैराग्य ज्या समयी शिष्य अनन्य भावाने शरणांगती पत्करून सदैव सत्संगात राहुन गुरू वाक्य प्रबोध परमोच्य परम पवित्र म्हणुन गुरू सेवेत तनमनधने एकवटुन निरपेक्ष भावाने गुरूचरणी निद्रिस्त राहतो. हीच अनन्य भक्ती. गुरूमाउलीना आनंद देणारी महान भक्ती आहे. भक्ती हीच मुक्तीचे द्वार आहे.
परमपुज्य सद्गुरू महाराज. तिरूपती बालाजी येथे महाराजानी केलेला गुरूभक्ती बोध.
पुढील पानावर घेतलेला विषय व्यास विचार पा. नं ५१० वरून श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यानी व्यास काशिक्षेत्रावर गंगाजीच्या तिरी डाॅ. शंकरराव नामदेव बचाटे यांना निरूपन केला व त्याच वेळी आज्ञा दिली व्यास विचार ग्रंथ वाचन कर.
गुरूआज्ञा मस्तकी धारन करून पुढील विषय गुरू कृपेने लिहण्याचा प्रयत्न केला व गुरू भक्तांच्या सेवेत प्रस्तुत केला आहे. क्षमस्व. लेखक.
Very nice
उत्तर द्याहटवा