वन्देहं सच्चिदानंद भावातितं सोहंः ब्रम्हः
नित्यं पुर्ण निराकारं निर्गुणनं स्वात्म सुखं
दमानिकरं प्रसन्नं सोहंः स्वरूपं निबोध रूपं
योगींन्द्र माध्यं भवरोग वैद्यं सद्गुरू त्वं नमामी.
श्री समर्थ काशिनाथ महाराज योग्यांचे योगी आहेत. ते महान तपस्वी असुन, आत्मनिष्ट आहेत. सर्वज्ञ असुन, साक्षात्कारी महापुरूष प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार आहेत. ते निष्प्रह असुन सर्व गुणातीत सर्वस्व आहेत. ते स्वयं कष्टकरी अखंड कर्मरत आहेत. हाती कुदळी व खुरपे ही त्यांची आवड असे. भुषण आहे १२० वर्षाच्या आयुष्यात ते सतत २४ तास रांत्रदिन कर्मरत असत. पायी खडावा, काखेत झोळी, मस्तकी जटाभार, गळयात रूद्राक्षमाळा, मनगटी रूद्राक्षमाळा, कंठी असलेल्या रूद्राक्षमाळेत १०८ मणी व ९ वा मेरूमणी (गुरू) एकुण १०९ मणी याप्रमाणे ३२ आधिक १०९ एकुण १४१ रूद्राक्ष सतत परिधान केलेले असत.
वाचकांच्या स्मरणात येण्यासाठी १४१ रूद्राक्षाचा महीमा व सत्पुरूषांच्या आगमनाचा पवित्र शुभारंभ व एकाच आश्रमात सतत २१ वर्षे राहुन १२० वर्षाचे आयुष्य पुर्णत्वाप्रत नेऊन असा अर्थ होतो कि, सांगण्याचा सारांश म्हणजे श्री सद्गुरू काशिनाथ महाराज रामवाडी येथे आश्रमात असताना महाराजांचे प्रतीवर्षी २ प्रमाणे २१ वर्षे अनुष्ठान रामवाडी येथे पुर्ण केले. आणि २१ व्या वर्षाच्या अनुष्ठान काळात फक्त ७ दिवस पुर्ण करून आठव्या दिवशी अनुष्ठानाचे उद्यापन केले.
अंदाजे इ. सन. १९७० साली अनुष्ठान संपताच भक्ताना समवेत घेऊन २ महीने उत्तर भारत तिर्थ यात्रा करीत असताना श्री महाराज. डाॅ. शंकरराव नामदेव बचाटे या भक्ताला उपदेश करीत असत. त्याचाच एक भाग लेखकाने भक्तांच्या सेवेत या ग्रंथात नमुद केलेला आहे.
सतत २१ व्या वर्षीचे अनुष्ठान कर्मभुमी रामवाडी येथे पुर्ण केले. महाराज म्हणाले, अरे तुमच्या महाराजांचे २१ वर्ष या भुमित पुर्ण झाले रे. यापुढे तुमच्या महाराजांना इथे थांबता येत नाही, कारण धर्म संकेत असा आहे की, कोणत्याही सत्पुरूषाला एके ठिकाणी फक्त २१ वर्षे थांबता येते. आता २१ वर्ष पुर्ण झाले आहेत. यापुढचा काळ म्हणजे मी यापुढे विहंगम अवस्थेत राहणार. मी तुम्हाला ओळखीन पण तुम्ही मला ओळखणार नाहीत. आत्तापर्यंत सद्गुरू काशिनाथ महाराज हे ज्या ज्या भक्ताना मंत्रोपदेष दिला त्यापुर्वी प्रथम दिलेला श्लोक वंदेहं शब्द असलेला वरीलप्रमाणे स्तवन करून नंतरच मंत्रदिक्षा देत असत.
श्री समर्थ सद्गुरू सिध्दलिंग महाराज लच्चाण, जि. बेळगाव. ( गंगाखेड मठातील मुर्ती )
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय
उत्तर द्याहटवाकाशिनाथ महाराज यांचे वर्णन डॉक्टर अण्णा यांनी किती सुंदर केलेले आहेकिती सुंदर केले आहे रुद्राक्ष भूषण कर्मयोगी
24 तास कार्यरत असे महान योगी आपल्याला गुरू म्हणून लाभले धन्य भाग्य आपले जय सद्गुरू
कोणत्याही भगवंताची आरती करताना संपूर्ण शरीर आणि त्यांनी परिधान केलेले वस्त्र अस्त्र आदींचा उल्लेख येतो. आपले सद्गुरू काल्याचे वेळी १४१ रुद्राक्ष, खडावा, त्रिशूळ घेवून साक्षात शिवरूप धारण करत असत.
उत्तर द्याहटवात्यांचे रूप पाहून भक्त निशब्द होऊन फक्त आणि फक्त आनंदाश्रु चा बांध फुटल्याने अश्रूंचा अभिषेक प्रत्येकजण घालत असत.
प्रत्येक भक्ताला आपोआपच अश्रू बांध फोडायला लावणारा सदगुरू होणे नाही. खूप छान उल्लेख डॉक्टर बचाटे अण्णा यांनी केलेला आहे.