भुमंडळाचे प्रतिबिंब ॐ आहे. ॐ मंत्र शक्ती व सर्व सिध्दी प्रदाता आहे. जो जीवनात उदास व निराश आहे, दुःखात जिवन जगतो त्याला नवजीवन देऊन उच्छादित करून सुख व समृध्दीचे भांडार खुले करून देणारा महाशक्तिशाली महामंत्र आहे.
अनेक संकटे व विपत्ती मध्ये आत्मविश्वासाला जागृत करण्याची क्षमता ॐ मध्येच आहे. अज्ञान आणि अंधःकाराचा तर हा शत्रु आहे. कारण ॐ च्या उच्चारात प्रकाशाच्या कोटयावधी प्रखर ज्वाला (ज्योती) सामावलेल्या आहेत. ॐ च्या प्रत्येक उच्चारासोबत अनेक शक्तीचा लाभ होतो. ॐ हे अमृताचे एक महाऔषध आहे. ज्या सर्व सिध्दी आहेत त्या ॐ च्या द्वारपाल आहेत. या सर्व सिध्दी ॐ च्या आज्ञेची डोळयात तेल घालून वाट पहात असतात. आध्यात्मामध्ये जे साधक प्रगती करू इच्छितात त्यानी ओंकाराची उपासना अखंड करीत राहिल्याने त्वरीत परिवर्तन होऊन मन शांत व स्थिर होते, व ॐ च्या सामर्थ्याचा महान शक्तीचा अनुभव येऊ लागतो. त्वरीत प्रत्ययास येतो. १ ते ४ वर पहा (अ,उ,म,अर्धमात्रा). कारण मध्ये बल - शक्ती व बुध्दी सामावलेली आहे. ॐ च्या शक्तीने अनेक प्रकारच्या दैवी शक्ती साधकाच्या देहात प्रगट होतात व प्रकृतीत अनेक व्याधी समुळ नष्ट होतात. प्रकृती निकोप व सदृढ होते. ॐ मध्ये अणुरेणु परमाणु चे सुक्ष्मकण समिश्र आहेत. म्हणुन ॐ शक्तीचे भांडार आहे. ॐ च्या उच्चाराने किंवा जप केल्याने विचार शुध्द व पवित्र होतात. मन शुध्द व पवित्र बनते. आणि सात्वीक दैवीभाव निर्माण होतात. ॐ स्वयंसिध्द परब्रम्ह स्वरूप आहे व सर्व शक्तीसंपन्न नाम आहे. अग्नि व ईश्वराचे नाव अ. मध्ये. हिरण्यगर्भ वायु - तेज. उ. मध्ये. परमात्मा ईश्वराचे नाम म. मध्ये समाविष्ट आहे. तो अनेक दैवी शक्तीचे आगार आहे. ॐ च्या मंत्र जपात अनेक प्रकारचे तेज भरलेले आहे.
।। शास्त्र प्रचिती ।।
जे ओंकाराची उपासना व नामस्मरण करतात त्यांचे सर्व कर्म प्रबल व शक्तीषाली बनतात. ॐ च्या स्मरणाने मृत्युसुध्दा आपले कार्य थांबवितो व परमपिता प्रभुचे दर्शन होते. ओंकार उपासना सर्वश्रेष्ठ सर्व साध्य अशी महान आहे.
मांगल्य पावणं धर्म । सर्व काम प्रसाधं । औंकार परमब्रम्ह । सर्व मंत्रेषु नायकं ।।
कसलाही कष्टप्रद प्रसंग आला तरी ॐ च्या तेजाने शक्तीने दुःखद प्रसंगसुध्दा निमिष्य मात्रात नाहीसा होऊन जीवनाचे रक्षण होते. ॐ पवित्र ध्वनी आहे. स्वतःच्या अनुभवाशिवाय ॐ चे महत्व व शक्ती सम्राट स्थिती अनुभवास येत नाही. ॐ अनादी व अनंत परम पवित्रतेचा महासागर आहे. ॐ स्त्री, पुरूष, अबालवृध्द, रोगी, दुःखी, सुखी सर्व जिवमात्राचे जीवन आहे. त्यासाठी जीवन रक्षणाचा एकमेव सरळ व सोपा मार्ग म्हणजे ॐ च्या ध्वनीलहरीत परम पवित्र होऊन सर्व मार्गाने ॐ च्या नामस्मरणात आपले आयुष्य कंठीत रहावे व परम पवित्रतेचे भाग्य उपभोगण्याचे आधिकारी पद प्राप्त करून घ्यावे.यासाठी साधु संत योगी मुनी व वेदशास्त्र पुराणे हाच उपदेश करतात. बाबानो नाम घ्या. नामेची तरले नामेची उध्दरीले कोटयानकोटी. श्री सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणतात.
श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज रामवाडी आश्रमात असताना ३० ते ४० वर्षाचा काळ महाराज स्वयं कष्ट करीत असत. अत्यंत परिश्रम करीत असत. महाराज याच काळात २४ तास अहोरात्र शेतावरील काम करीत असत १८ ते २० तास ते स्वयं उद्योगी रहात असत. आश्रमाच्या अवतीभोवती दोन ते तीन एकर जमिनीत मोसंबी, लिंबु, चिक्कु, पेरू, पपई, फुलझाडे व भाजीपाला लागवड केलेली असे. त्याची मशागत स्वतः व येणारे भक्तवृन्द करीत असत. महाराजांचे एकच ध्येय असे, माझ्या सर्व भक्तानी सदैव उद्योगात रहावे, शरीर सुख न देता परिश्रमी जीवन जगत रहाणे हेच त्याना आवडत असे. आपण करावे व दुसऱ्यास करण्यास शिकवावे.
शहाणे करूनी सोडावे सकल जना.याच उद्देशाने सर्व जनतेला शिकवण देत असत. या काळात महाराजांच्या शिष्यगणापैकी अत्यंत परिश्रमी असणारे भक्त महाराजांचे सेवाधारी दिगंबर खंडेराव पाटील (मास्तर मटकीकर), श्री पंत मास्तर हे दोघे गुरू सेवाधारी तसेच दत्त मंदिरातील पुजारी सिध्दलिंग महाडा साफसफाई व पुजाअर्चा करीत असत. स्वतः विधिपुर्वक पुजापाठ करीत. ते सतत १२ तास आसनारूढ होऊन नामस्मरण करीत रहायचे. शेतावरील कामासाठी त्र्यंबक कोळी, बसलिंगाप्पा, महादेवाप्पा, भागुबाई, काशिबाई, रघुनाथ झाडुवाले व शहाबाई इत्यादी भक्त अहोरात्र परिश्रम करीत असत. प्रयागबाई दत्तु पिंपरे हे सर्व उद्योगात रममान असत. महाराजांचे भक्त मुरूड येथील एकनाथमामा सगर हे व भगवानराव सगर हे सर्व मिस्त्री लोक बांधकामात रहात असत. आश्रमात तयार होणाऱ्या फळाची व भाजीची विक्री प्रयागबाई करीत असे.
एकेकाळची गोष्ट आहे ......
लिला प्रभुची.
आश्रमात मध्यरात्री दोन वाजता महाराज लघुशंकेसाठी उठले व बाहेर आले समोरच कंदिलाच्या मंद प्रकाशात उंबरठयावर बाजुला चार ते पाच फुट लांबीचा एक भला मोठा केशरी रंगाचा नागराज महाराजानी पाहीला. त्याला पहाताच महाराज तेथेच थांबले कारण तो दरवाज्याच्या समोरच आडवा झालेला होता. त्याने अक्षरशः रस्ता अडविलेला पाहुन महाराज म्हणाले, अरे वैजीनाथ झोपलास का, उठ लवकर, आणि एक वेळू घेऊन ये. हे महाराजांचे बोल ऐकून भक्त वैजीनाथ माळी उठला व महाराजांच्याकडे धावतच गेला. त्याला महाराज म्हणाले, अरे समोर मोठा देवराज बसलेला आहे, एक वेळू घेऊन ये. तेवढयात भक्त वैजीनाथने समोरच्या कुडाचा एक वेळू पटकन उपसून घेतला व घेऊन आला. तितक्यात नागराज हातभर उभा झाला व फणा काढून महाराजांच्याकडे पहात डोलत राहीला. तेंव्हा महाराज वैजीनाथला म्हणाले, थांब वेळू पलीकडे ठेव, तेंव्हा नागराज फणा काढलेला व महाराज जिकडे पहातात तिकडे तो पण पहात असे, तेवढयात हळुवारपणे इकडे तिकडे घिरटया घालीत असे, तेंव्हा महाराज म्हणाले, त्याने बेडकाचे भोजन केले आहे तो सुस्तावला आहे बिचारा, त्याचे पोट खुप दुखते रे, त्याना अन्नपचन होणारे औषध पाहीजे. वैजनाथ भिऊ नकोस त्या वेळूवर हळूवारपणे त्याला उचलुन घे, हे महाराजांचे बोल ऐकून भक्त वैजीनाथ भितीने गांगरून गेला. म्हणाला महाराज त्याला पहाताच घाबरून माझ्या अंगात घाम आला आहे, माझे हात थरथरत आहेत, महाराज माझी हिमंत होत नाही. तेंव्हा महाराजानी उठून वेळू घेऊन नागराजाला वेळू पोटाखाली मध्यभागी घातला तेंव्हा त्याने हालचाल न करता गोल वेटोळे घातले व भलीमोठी फणी चार ते पाच इंचाची पुन्हा हातभर उंच होऊन महाराजांच्या समोर केली, तरीपण महाराजानी त्याला वेळूवर उचलून घेतले. तो स्वस्थपणे वेळूवर लोंबकळत राहीला. त्याला सरळ कुंपणाच्या बाहेर सोडले तेंव्हा तो खाली सोडताच अतिशय वेगात सळसळत समोर कुंपणाच्या दिशेने निघून गेला. हे आश्चर्य पाहून भक्त वैजीनाथ थक्क झाले, तेंव्हा महाराज म्हणाले, अरे वेडया तो बिचारा आपल्याला काय करणार त्याचे काम त्याने केले, आला बिचारा आणि दर्शन देऊन गेला.याप्रमाणे असे कितीतरी भयानक प्रसंग येत असत आणि महाराज भक्ताना दाखवीत असत.
।। एक प्रसंग ।।
एके काळी बंथनाळ मठाच्या स्वामी महाराजांचे शिष्ययोगी श्री मल्लया महाराज रामवाडी येथे सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या चरणाप्रती येऊन दाखल झाले. व त्यांच्या गुरू स्वामी महाराज यांचा लेखी पत्ररूपी निरोप पुढे ठेवले. महाराजांचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. तेंव्हा महाराज म्हणाले, मल्लया महाराज कसे काय आलात?, हे महाराजांचे बोलणे ऐकुन मल्लया म्हणाले, माझ्या गुरूदेवानी तुम्हाला हे पत्र दिले आहे. माझ्या गुरूदेवांचा निरोप आहे की, आपण बंथनाळला अमावस्येच्या आत येण्याची आज्ञा दिली आहे. तेंव्हा आपण लवकर चलावे हे ऐकून महाराज मल्लयाला म्हणाले, महाराज कुतरवाडीच्या पाटलाने आपल्याला एक एकर जमीन शिव मंदिरासाठी दिली आहे. दानपत्र करून दिले आणि तिथे शिव मंदिर पाच महिन्याच्या आत बांधण्याचा स्वामी महाराजांचा संकल्प आहे. स्वामी मला म्हणाले, अरे भक्ता सोलापुरच्या पंचक्रोशित ३५ शिवलिंग आहेत आणि ३६ वा शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा करणे आहे. हे सर्वसामान्याचे काम नाही. एकेकाळी शरणुशंकरलिंग महाराज बोलून गेले आहेत. ३६ वा लिंग स्थापनेस एका महान युग पुरूषाची गरज आहे. ती महान परमात्म शक्तीच ३६ वा लिंग व त्याची प्राणप्रतिष्ठापणा करील. या गुरू वचनाचा अनुभव घेऊनच स्वामीनी आपल्या दर्षनास पाठविले आहे हे मल्लयाचे बोलणे ऐकुण महाराज त्याला म्हणाले, अरे मल्लया एक एकर जमिनीच्या दानपत्राची नक्कल घेऊन ये व ती इतक्यात नको. माघ शुध्द ६ रोजी घेऊन ये. दोन महिने वेळ आहे पण एक लक्षात ठेव, येतेवेळी कुत्री मात्र घेऊन येऊ नकोस. इतके बोलून मल्लयाला महाराजानी निरोप दिला. ८ ते १० दिवसात श्री महाराज भक्त डाॅ. शंकरराव नामदेव बचाटे मुरूडकर व भक्त रामभाऊ दत्तोबा माळी मुरूडकर याना सोबत घेऊन स्वामीच्या आज्ञेप्रमाणे बंथनाळ गावी ता. इंडी जि. विजापुर येथे मठात पदार्पण केले. श्री स्वामी महाराजाना सद्गुरू काशिनाथ महाराज यानी साष्टांग करून दर्शन घेतले व चरणारविंदी नतमस्तक झाले. काशिनाथ महाराजाना पहाताच स्वामीजी पण नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणी घट्ठ मिठी मारली. नेत्रातुन आश्रुनी चरणकमल चिंब केले. आनंदमय होऊन मृदु कंठ स्वरात म्हणाले, महाराज एक विनंती आहे, आपल्या सर्वांचे गुरूदेव शरणुशंकरलिंग महाराज देह त्यागाच्या चार दिवस अगोदर सांगत असत की, सोलापुरच्या भुमीत ३५ लिंग आहेत पण छत्तिसावा वृषभलिंगेश्वर असेल आणि त्याची स्थापना करण्यासाठी एका महान परमात्म शक्तीची साथ पाहीजे. अन्य कोणीही स्थापना करू शकणार नाही. आणि तो म्हणजे माघ शुध्द ५ ते जेष्ठ वद्य १४ चतुदर्शी याच काळात स्थापन होईल. एका महान अवतारी सत्पुरूषाच्या हस्त स्पर्शाने होईल. सद्गुरू यल्लालिंग कृपा, सद्गुरू सिध्दलिंग कृपा व सद्गुरू शरणुशंकरलिंग कृपा या त्रैमुर्तीच्या कृपाशिर्वादातुन निर्माण होणाऱ्या सुक्ष्मरूपी सच्चिदानंद अवस्थेतून श्री विश्वेश्वर - विश्वनाथ काशिनाथ ॐकार रूपात्मक महान शक्तीच्या पदस्पर्शाने भुमी शुध्द व पवित्र होईल. असे श्री शरणुशंकरलिंग महाराज बोलून गेले त्याला आज ८० वर्षे होऊन गेले आहेत. ८० वर्षे असा दृष्टांत होताच. महाराज आपल्याच स्वरूपाचे दर्शन झाले त्याक्षणी विलंब न लावता आपल्या पाद्यपदमी लिन होऊन पोहंचले. हे स्वामी महाराजांचे बोल ऐकताच क्षणार्धात महाराजानी स्वामीना अभिवचन दिले व दर्शन घेऊन म्हणाले, स्वामीजी ज्या कार्यासाठी या अवनीतलावर साधुसंत सत्पुरूष अवतिर्ण होतात व पुर्वाश्रमीच्या व वचन पुर्तीच्या कार्याची काळ आणि वेळ येताच पुर्तता करतात. ती तोच करवून घेत असतो. असे बोलुन निरोप घेतला. तितक्यात स्वामी महाराजानी झोळीत हात घालून पैशांचे ४ ते ५ बंडल पुढे ठेवले व म्हणाले, आश्रमाच्या व मंदिराच्या निर्माण कार्यासाठी हे पैसे असु द्या. हे ऐकून महाराजानी त्या ५ बंडल पैशास हस्तस्पर्ष करून म्हणाले,अरे डाॅक्टर हे घे स्वामीजींच्या झोळीत ठेव. गुरू आज्ञा होताच भक्त डाॅ. ने ते बंडल उचलून स्वामी महाराजांच्या झोळीत ठेवले व चरणाचे दर्शन घेतले.
महाराज स्वामीला म्हणाले, पैशाची गरज पडल्यास पाहु. आपला आशिर्वाद हे कार्य..... असे बोलुन स्वामीजींची आज्ञा घेतली. पुढे लवकरच ४ ते ५ दिवसात मुरूड निवासी भक्तवृंद मिस्त्री लोक भगवानराव सगर, रामभाऊ चव्हाण, हरीभाऊ मिस्त्री, कचरू मिस्त्री, अर्जुन सगर, वसंत सगर, तुकाराम सगर इत्यादी भक्ताना एकत्र घेऊन आश्रमाच्या निर्माण कार्याच्या शुभारंभ केला. आणि २० ते २५ दिवसात मंदिरासह पुर्ण काम निर्माण कार्य संपवून तार कंपाऊंडसाठी एँगल व काटेरी तार खरेदीस महाराज शंकरआप्पा बिडवे लातुरकर यानां डाॅ. ना घेऊन मुंबईला गेले. येथे भक्त महादेव सायबन्ना त्रिमुखे भक्त महामुनी यांच्या निवासस्थानी २ ते ३ दिवस राहुन कंपाऊंडचे साहित्य त्रिमुखे यांच्या वाहनाने घेऊन आले. याप्रमाणे आश्रमाचे कंपाऊंड तयार झाले आणि जेष्ठ वद्य १४ शिवरात्री या शुभमुहुर्ती वृषभलिंगेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा केली.
सांगता समारंभ दुसऱ्या दिवशी करून सर्व भक्ताना आहेर करून भक्त यल्लप्पा सोलापुरकर याना महाराज म्हणाले, अरे यल्लप्पा हे सर्व कार्य एक महीन्यात पुर्ण झाले रे. अरे आपण सर्व लोक होतात म्हणुन झाले रे. अरे भगवान सगर आपण पहिल्यांदा जेंव्हा इथे आलो तेंव्हा कडक उन माळरान जवळ पाणी नाही. उन्हाळीचे झाडसुध्दा नाही. अरे सगर, वैशाख महीना उन मी म्हणाले इंचभर सावली नाही आमच्या शंकर डाॅक्टरने ४ लाकडे खोल रोऊन वर चादर टाकून महाराजांपुरती सावली केली व मला बसविले बघ. त्यावेळी मला असा झणाणुन ताप आला बघ, मग पाणि नाही हे पाहुन डाॅक्टरने एका पारध्याच्या झोपडीतुन 1 तांब्या पाणी आणले व गावातुन औषध गोळया आणुन द्यायच्या, मग २/३ दिवसात भक्त यल्लप्पाला समजले महाराज आले आहेत तेंव्हा त्याने मंडप व पत्रे मारून ताबडतोब व्यवस्था केली, त्यानंतर तुम्हा लोकाना बोलावून घेतले रे. एवढयात रामवाडी आश्रमातुन त्र्यंबक कोळी आला व दर्शन घेऊन सांगु लागला, महाराज लवकर चला आपला यशवंत गुराखी गेला. महाराज रात्री पहाटे ५ वाजता गायी म्हशीच्या गोठयात आग लागली. गोठयातील डांबराचे डबे भडकले संपुर्ण गोठा राखरांगोळी झाला आहे. पण महाराज त्या ज्वालातून गायी म्हशी मात्र ओल्या होऊन पाणी गाळत बाहेर आल्या. आपल्या सोमी गायीचे फक्त शेपूट पेटले.यशवंता गुराखी पाणी टाकुन विझवत असता एक अग्निचा लोळ डांबराचा त्याच्या अंगावर पडला व तो जळून गेला. तो जळत असताना त्याने हौदात उडी टाकली तो पुर्ण जळून सर्वांग मासाचा लाल गोळा दिसतो आहे. तो बेशुध्द पडला आहे लोक म्हणतात, महाराज आल्याशिवाय पंचनामा नाही व माती नाही करायची. हा सर्व वृत्तांत ऐकून महाराज म्हणाले, अरे डाॅ. जा लवकर! हे घे भस्म व त्या यशवंतला पाण्यातुन दे, तुझ्या मुरूडला दवाखान्यात त्याला औषधे चालु कर. त्याच्या सर्वांगाला काॅल्डलिव्हर ऑइल रोज 4 वेळा लाव व भरपुर लावत रहा. त्याला गादीवर शांत झोपव दवाखान्यात ठेव तुला कळतील ते औषधे देत रहा, उठ लवकर आत्ताच निघ. महाराजांची आज्ञा होताच त्याला मुरूडला दवाखान्यात त्याच्यावर उपचार चालु केले भस्म पोटात पाजला अवघ्या 5/10 मिनीटात त्याने डोळे डघडले खरोखरच गुरूकृपा त्याच्या आयुष्याची तुटलेली दोरी महाराजांच्या कृपा आशिर्वादाने परत जुडली. १०० टक्के भाजुन निघालेला यशवंत खरोखरच भक्तीच्या भाव तरंगातुन यशस्वी झाला. तो सोमीगायीचा लाडका भक्त रोज सोमी गायीला कुरवाळुन दर्शन घेत असे. ४ ते ६ दिवसात यशवंत उठुन बसला त्याचे सर्वांग श्वेत कुष्ठाप्रमाणे पांढरे बनले धन्यधन्य त्याचा एकविंद्य भाव व भक्ती व गुरूभक्तीची आत्मीयता.
अशा महान परमात्मरूपी शक्तीसंपन्न महान गुरू माऊलींच्या उलटया खुणा म्हणजे. सहजची बोलणे हीत उपदेश भक्तालागी तोची तारक.
जय श्री गुरू.
।।ॐ ।।
एकेकाळी सद्गुरू काशिनाथ महाराज दोन भक्तांना सोबत घेऊन महाराजांचे गुरू सद्गुरू यल्लालिंग महाराज यांच्या भेटीस मुगळखोड येथे गेले तेंव्हा श्री यल्लालिंग महाराजांचे चरणदर्शन घेऊन कृतार्थ झाले. श्री महाराजांच्या सेवेत मुगळखोड मठात थांबले. मठातील पुजाआरती कार्यात दोघेही भक्त कार्यरत रहात. गुरूसेवेत दोघेही कार्यरत रहात असत. मोठे महाराज रात्री भोजनानंतर सद्गुरू काशिनाथ महाराजाना जवळ घे़ऊन आध्यात्म विषयावर कानडी भाषेतून बोलत असायचे मठातील सेवाधारी भक्त व हे दोघेही भक्त धार्मिक विषय ऐकण्यास जवळच बसत. श्री यल्लालिंग महाराज व त्यांचे शिष्य मायाप्पाआन्ना याना मराठी भाषेतुन सांगण्यासाठी जवळ घेत. रात्री २/३ वाजेपर्यंत महाराजानी केलेल्या उपदेशाचा अर्थ मराठी भाषेतून मायाप्पा सांगत असत. एके दिवशी रात्री एक वाजले. धार्मिक विषयात दोघेही महात्मा गढुन गेले व एकाग्रतेत तन्मय होऊन आनंदमय होऊन डोलू लागले. आणि यल्लालिंग महाराज म्हणाले, माझे गुरू श्री सिध्दलिंग महाराज फार मोठे होते. अहो काशिनाथ महाराज खरोखरच ते सिध्द होते. ते एके काळी मला एकांतात घेऊन मध्य रात्री प्रेमात येऊन म्हणाले, अहो यल्लालिंग महाराज लक्षात घ्या, पुढे काही दिवसानी स्वामी समर्थाचा कृपाआशिर्वाद होईल. त्या काळी या आवणीतलावर एक जिव (परमात्मस्वरूप) आवतिर्ण होईल व जग उध्दाराचे कार्य मानव देह निर्माण करून ध्यान करून मानवाचा उध्दार करील त्या जिवाला प्रभु यल्लालिंगाचा आशिर्वाद राहील. हिमालयात केदारनाथ तिर्थ यात्रेला जाऊन सत्तर फुट भयंकर अंधःकारात दररोज प्रवेश होईल. काळया कुट्ठ अंधारात प्रत्यक्ष सिध्द शिव अलगदपणे दोन्ही हातावर झेलुन घेतील. आणि सुक्ष्म देहातुन लालसर प्रकाशात प्रभु यल्लालिंग रूपात दर्शन देतील. हजारो फुट खोल दरीत पद्मासनारूढ (बसलेले) मंद प्रकाश. सुक्ष्मध्वनी कर्णमधुर आवाज दोन्ही नेत्रपटल बंद असलेले पद्मासनी आरूढ स्थितप्रज्ञ व दोन समया तेवत असलेल्या एकात सहा वाती व दुसरीत पाच वाती घृतात तेवत आहेत (प्रज्वलित) हे सर्व दृष्य पाहुन महान सिध्दाला (परमात्म्याला) साष्टांग करून क्षणभर शांत व स्थित होऊन आशिर्वाद मिळताच अदृष्य होईल. पुढे यल्लालिंगाच्या आशिर्वादाने पुनित होतील व मंत्र दिक्षा मिळताच श्री गुरू यल्लालिंगाना साष्टांग करून बारा वर्षे तिर्थ यात्रेस संचार करतील. अंगावर फक्त लंगोटी परिधान करून (संचार) चालु राहील व बारा वर्षे पुर्ण होताच तेराव्या वर्षी परम पवित्र पर्णकुटीत गुरू यल्लालिंगाच्या चरणप्रांती स्थितप्रज्ञ होतील. भारत तिर्थयात्रा पायी संपवून शेवटी नर्मदा परिक्रमा अडीच वर्षे करतील व उज्जैयनी क्षेत्राचा निरोप घेतील. सिध्दाचा महाकालेश्वराचा ताज्या स्मशानभुमीतील भस्म मंहकालेश्वरास लेपण केलेला प्रसाद घेऊन व मध्य प्रदेशातुन प्रस्थान करतील. श्री गुरू यल्लालिंगाच्या पावन भुमीत मुगळखोड ग्रामी गुरू यल्लालिंगाच्या चरणी साष्टांग नमस्कार करून प्रभु गुरूमाउलीना पाच प्रदक्षिना करून प्रातःकाळी ब्राम्हीमुहुर्ती भुमी पुजन करून आश्रमाच्या निर्माण कार्यास शुभारंभ करतील. पाच कुदळी मारून श्रीफळ अर्पण करतील. गुरूचा जय करून चंद्र सुर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत या वास्तुचे कार्य चालुच राहील. असा आशिर्वाद देऊन श्री गुरू यल्लालिंगाच्या चरणकमली स्थिर होऊन, गुरू यल्लालिंगाचा आशिर्वाद मस्तकी धारण करून, मराठवाडयातील ऋनानुबंधाप्रमाणे भक्ताच्या कल्याणार्थ आपले उर्वरीत आयुष्य खर्च करण्याचा संकल्प करतील. श्री गुरूना स्मरून आशिर्वाद घेऊन प्रस्थान करतील.
याप्रमाणे........
यल्लालिंग महाराज व त्यांचे गुरू सिध्दलिंग महाराज हे एकेकाळी सांगुन गेले होते. तेच लेखकाने येथे सांगीतले आहे सिध्दलिंगाचे माझ्या मोठया गुरूंचे म्हणणे जे त्यानी मला सांगितले ते मी तुम्हाला सांगीतले आहे.
क्षमस्व.
हा सर्व वृत्तांत सद्गुरू काशिनाथ महाराज शांत चित्ताने एकाग्रतेने ऐकत होते.
यल्लालिंग महाराज म्हणाले, अहो काशिनाथ महाराज सिध्दलिंग महाराज सांगत असत की, सिध्द कुळी पवित्र व सर्वश्रेष्ठ असुन सिध्दार्थ आहे. सिध्दार्थ महास्वामी हुबळी आश्रमात असताना गुरू शंकरलिंग महाराज बंथनाळ हे गुरू भेटीस गेले. सिध्दारूढ महास्वामींचे दर्शन होताच सिध्दारूढानी शंकरलिंग महाराजाना डाव्या पायाची लाथ मारली व म्हणाले, अहो शंकरलिंग गुरूदक्षिणा काय देता असे मोठया स्वरात म्हणाले, तेंव्हा कसलाही विचार न करता एक भगव्या रंगाचे फुल झोळीतुन काढले व उजव्या हाताच्या अंगुष्ठ व मध्यांगुलीने धरून सिध्दारूढ स्वामीच्या डाव्या चरणावर मध्यांगुलीने वाहीले व भस्माचे त्रीपुंड लाऊन ही आपली गुरूदक्षिणा म्हणुन साष्टांग दर्शन घेतले. पाच प्रदक्षिणा घालुन प्रसन्न झाले आणि म्हणाले, गुरू महाराज काशीचे विश्वानाथ देह धारण करून अवतिर्ण होतील व कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यात संचार करतील आणि सिध्दांच्या सिध्दपताका व सिध्द कुळीचा जय जयकार उत्तरेकडे गंगातटी गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, तापी, गोदातटी, कृष्णा, भिमा तटी सिध्द कुळीचा जय जयकार होईल. छत्रपती शिवाजी, रामदास, ब्रम्ह, विष्णु, महेश, श्रीराम, शिवलिंग स्थापीत करतील.
सोलापुर भुमीत ३६ वा वृषभलिंगेश्वर त्यांच्यात हस्तस्पर्शाने भविष्य काळात स्थापन संपन्न होईल. श्री रामभुमी रामवाडी मराठवाडा पवित्रग्रामी संत भुमी काका कुंभार संत भुमीत रामग्रामी संताच्या पंचक्रोशीत अवधुत दत्तत्रयाच्या चरण पादुका अवधुत रूपात गुप्त असलेल्या त्यांच्याच हस्ते जग कल्याणार्थ प्रगट होतील.
वाचकाना सुचना: -
कृपया हा संपुर्ण विषय ८० ते ९० वर्षापुर्वी शरणुशंकरलिंग महाराजानी बोलुन गेले आहेत. भविष्य काळी काय घडणार हे सर्व त्यानी भविष्य केलेले आहे याची नोंद घ्यावी.
-----00000-----
श्री भगवान महावीर - शरण संभव तेरणेच्या तटी तेरभुमी संतभुमी नावाने प्रसिध्द तेरणेच्या तिरी रामवाडी ग्रामी कर्मभुमी म्हणुन कष्टतील. भुमातेत परिश्रम करून भक्तांच्या प्रेरणा ओळखुन अनुग्रहीत करून भक्ती ज्ञान वैराग्य याची ओळख करून देतील. नाम देऊन नामाच्या राजमार्गाने जाण्याचा सोपा मार्ग दाखवून अविश्रांत परिश्रमाचे धडे देतील. याप्रमाणे शंकरलिंग, सिध्दलिंग महाराजानी भविष्यवाणी यल्लालिंग महाराजाना सांगीतली.
यल्लालिंगानी इ. सन १९५४ मध्ये मुगुळखोड मठात ५/१० भक्तासमवेत सतत सात रात्र हाच उपदेश केला आहे. खालीलप्रमाणे भक्तवृंन्द गुरूवाणी ऐकत असत. मायाप्पाआन्ना मुगळखोड, डाॅ. शंकरराव नामदेव बचाटे मुरूड, राम माळी मुरूड, बन्सीभाई मुरूड, अंबादास बुवा, वैजिनाथ माळी, रामलिंग तेली वगैरे. भविष्यकाळाचा महासंदेश ऐकत होते.
सद्गुरू काशिनाथ महाराज सात रात्र कोणालाही काही बोलत नसत. शांत चित्त होऊन विषय ऐकण्यात तन्मय असत. दिवसरात्र महाराज आम्हा भक्ताना एक शब्दही बोलत नसत. सर्व गुरूबंधू थक्क होऊन विचार करीत राहीले. महाराज न बोलण्याचा अर्थ कोणालाही कळला नाही. एकवेळा सांयकाळी ९ वाजता महाराज विश्रांतीस थोेडे पहुडले. तेंव्हा एक भक्त डाॅ. शंकरराव हळुवारपणे भित भित हात जोडून विनम्र भावाने जवळ गेले व चरणाचे दर्शन घेऊन पाद्यसेवा करण्यास आरंभ केला तेंव्हा महाराज भाववेशातून स्पर्ष होताच पुर्व पदावर आले व भक्ताना हळु हळु व मृदु शब्दात म्हणाले, अरे डाॅक्टर चरण सेवा चरणकमल उमलत नसते रे. पाण्यात राहणारे कमल पुष्प परिपक्व होताच उमलते ते पाण्यात जन्म घेते. पाण्यातच वाढते त्याची उत्पत्ती पाण्यातच होऊन शेवटी अंत पाण्यातच होतो. तुझ्या लक्षात यावे म्हणुन सांगतो पण ते पाण्यात राहुन पाण्याच्या यत्किंचितही संबंध पोहचू देत नाही. बाहेर काढता क्षणी ते कोरडे फक्क असते. जणु काही त्याला पाण्याचा स्पर्ष नाही. तरीपण सत्संगती व ज्ञान हे त्या अंतिम परमपदाला नेऊन सोडते. एवढयात सांगता सांगता महाराज डोळे बंद करून भाववेशात तल्लीन झाले.
पटकन दर्शन घेऊन सेवेची आज्ञा घेतली अशावेळी सर्व भक्त दुरूनच दर्शन घेत असत. रोज काय बोलतात ते वेळ काढून लिहून ठेवीत असत. सात रात्र दिवस संपताच आठव्या दिवशी श्री प्रभु यल्लालिंग महाराज म्हणाले, अहो काशिनाथ महाराज चैतन्याचा महाप्रकाश उध्र्व द्रष्टीनेच पाहता येतो. सर्व सामान्य जिवाला ही द्रष्टी नसते. इथे अधिकारीच पाहिजे. परमात्म शक्तीच या सर्व कार्यात सिध्द ठरते.
पर आणि आत्मा पराच्या पलीकडे असणारी महान शक्ती म्हणजे परार्ध इथेच संख्या संपते. ० ते शुन्य यात १ या संख्येतून प्रारंभ होतो. परार्ध या अंतिम संखेत त्याचे विसर्जन होते.
सांगण्याचा सारांशः - अ. हे अद्याक्षर व ज्ञ हे परार्धाचे प्रतिक आहे. अपरा ही प्रकृती आहे. परार्धाच्या पलिकडील अवस्था म्हणजेच स्वयं स्थितप्रज्ञ. गुरू आणि शिष्यही द्रष्यमय जगतामध्ये दृष्टीगोचर आहे. निमित्त कारण आहे. जिथे निमित्त मात्र जन्म घेऊन देही असुन विदेही या स्थितीतच ते तत्व लुप्त आहे या सर्व गोष्टीचा विचार करून जर त्याचा मतितार्थ व भविष्य काळाची वाणी माझे गुरू सिध्दलिंग महाराज यानी खुली करून दाखविली.
धन्य धन्य ते परम पुज्य गुरूदेव.
अतिउत्तम माहिती, जय सद्गुरू.
उत्तर द्याहटवा