१८. ॐकार रहस्य.
ॐ हे अक्षर अद्याक्षर आहे. ॐ हा महान मंत्र आहे. ॐ हा आदी, मध्य, अंती आहे. ॐ हा मुळ बीज महामंत्र आहे. ॐ हा परमपवित्र शुध्द निजबीज आहे. ॐ हा अ, उ, म, अर्ध मात्रा आहे. हा तत्वमसी महावाक्य आहे. ॐ हा हिरण्यगर्भ आहे. ॐ हा या भुमंडळाचा आदी, मध्य, अंती आहे. ॐ हा परमश्रेष्ठ परमात्म्याचे रूप आहे. ॐ हा निजबीज आहे. ॐ चैतन्य स्वरूप आहे. ॐ हा अ. उ. म. अकाररहीत निर्गुण निराकार आहे. ॐ हा मंत्रराज मंत्राचा आदि आणि अंत आहे. ॐ हा सर्व मंगल आहे. ॐ हा सर्व मंत्रसिध्द मंत्रराज आहे. ॐ सर्व मंत्राला आपल्या प्राणशक्तीने प्रभावित करतो. एवढे मोठे सामर्थ्य ॐ मध्ये सामावलेले आहे. ॐ च्या अद्याक्षराने इतर मंत्रामध्ये सामर्थ्य येते. ॐ मिश्रीत मंत्राला सबीज मंत्र म्हणून संबोधतात. यामुळे ॐ ला मंत्राचा सम्राट म्हणतात. सर्व मंगल क्रिया घडवून आणत असतो.
साधकाना मांगल्य प्राप्त करून देण्यासाठी फार मोठी शक्ती ॐ मध्ये आहे. ॐ हा साधकाच्या ठायी पवित्रतेचा संचार करण्यास फारच सर्वश्रेष्ठ कार्य करतो. ॐ मंत्र साधकाला धर्ममय उपयुक्त आहे. ॐ सर्व प्रकारच्या मनोकामना पुर्ण करून साधकाला पुर्णत्वाप्रत नेऊन सोडणारा एकमेव महामंत्र आहे. सर्व पुर्तीचे प्रसाधन आहे. ॐ हा ब्रम्हरूप ॐकाराला मंत्राचा अधिपती म्हणतात हे सर्वश्रुत आहे. बहुगुण संपन्न शक्ती त्यात गुप्त रूपाने वास्तव्य करते. ॐ म़़ध्ये परिपुर्ण भरून उरलेली महाशक्ती आहे. सर्व मनोरथ पुर्ण करून सिध्दी व परमगती प्राप्त करणारा महामंत्र आहे. ॐ हे स्वतंत्र असुन साधण व साध्य आहे व दुसऱ्या मंत्राला शक्ती देणारा आहे. सर्व मंत्रामध्येही ॐ ही एकमेव शक्ती सामावलेली आहे. ॐ अनादी आहे सर्वाठायी आहे. आदि, मध्य, अंती ॐ चा ध्वनी समरस होऊन निनादत असतो. ॐ अद्वितीय असुन परम परमात्म स्वरूप आहे. ॐ निर्मळ व निष्कलंक, शुभ आणि परतर परमाणुपेक्षा सुक्ष्म बिज आहे. कारण ॐ हा सर्व ब्रम्हांडी भरून उरलेला आहे. सर्व भाषा व पंचमहाभुतांचे ध्वनी ॐ रूपी अणुवत ध्वनीरूप आहे. प्रत्येक भाषेतील ॐ ध्वनी प्रसरण झालेला आहे. ॐ चे हे सत्य आपआपल्या अनुमानाने ओळखता येते व सत्यता प्रगट करते. जोपर्यंत मंत्राच्या ॐ आदि जोडला जात नाही किंवा त्याचा उपयोग केला जात नाही तोपर्यंत तो निष्फळ मंत्र समजावा. ॐ हे बिज म्हणजे वृक्षाच्या मुळाच्या मुळाचेही मुळ असते, त्याप्रमाणे सर्व मंत्राचे बिजरूप ॐ च्या नामस्मरणाने साधना केल्याने जिवनाचा विकास होऊन ज्ञानप्राप्ती होते. सर्व साधना जप तप योग तंत्र मंत्राचे बिज ॐ आहे. आणि हेच सर्वाचे मुळ आहे. ॐ ओम (प्रणव) मंत्राचा ब्रिज (पुल) आहे. कारण पुल हा सरिता (गंगानदी) अथांग भरलेला महासागर तरून जाण्याचे एकमेव साधन आहे. सर्व मंत्र भवसागर तरून जाण्याचे माध्यम आहेत, परंतु ॐ च्या साह्याने सुलभतेने तारून जाण्यास मदत होते. ॐ हा आत्मचैतन्य आत्मचेतना त्वरीत निर्माण करतो. आणि साधकाला सुलभतेने पैल तिराला नेऊन सोडतो. ही सर्व कृपा मंत्राचा राजा ॐ चीच आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या काळी ब्रम्हदेवाच्या कंठातुन जो प्रथम पावन ध्वनी निघाला तो ॐ प्रथम पावन ध्वनी म्हणजे ॐ आहे. यासाठी हा अत्यंत कल्याणकारी आहे. ॐ सर्वत्र व्यापक व सर्व प्रार्थनेत ओमचेच रूप प्रतित होत असते ॐ मनुष्य मात्राचे दुःखनाशक महाऔषधी आहे .अत्यंत वेदना होत असताना हा. हा. हुंँ. हुंँ. हे स्वर निघतात हे वेदनेचे क्षमण करून सुख प्रदान करणारे ओम चेच ध्वनी आहेत. याप्रमाणे ॐ चा पावनध्वनी आपल्या सुख दुःखात सहभागी होऊन सुखाचा अनुभव प्रदान करतो. लहान मुल जेंव्हा रडते तेंव्हा उँ. उँ. उँ. एैं. एैं. ध्वनी काढते हे ॐ चेच रूप आहे. त्यातसुध्दा ओम हा ध्वनी सुक्ष्म तत्वातुन भासतो. परिश्रम करून थकल्यावर आ. आ. आ. हा ध्वनी ॐ चाच स्वर सोडतो. कपडे धुवत असताना हाँ. हाँ. उँ. उँ हा ध्वनी जो आवाज निघतो त्यात सुध्दा ओमचा स्वर निनादत रहातो या पृथ्वीतलावर अनंत प्रकारचे जिव आपले ध्वनी काढतात ते सर्व ॐ चाच जप करत असतात. जो शब्द मुखातुन बाहेर पडतो त्यात ॐ चा ध्वनी सुक्ष्मरूपात बाहेर प्रसरण होत असतो.
वेदाचे सुक्ष्म तत्व ॐ आहे.
जो जिवात्मा ॐ चे सामर्थ्य अर्थतत्व अंतःकरणात क्षणाक्षणाला जाणून घेतो, तो सर्वशक्तीमान बनतो. वेदाचा सुक्ष्म अर्थ ॐ आहे. तत्व आहे. जो ॐ चा तत्वरूपी अर्थ ग्रहण करतो तो सर्व शास्त्र पुराणात पारंगत होतो. सर्व धर्म ग्रंथ त्याला परिचित होतात. प्रभुच्या व गुरूंच्या सेवेचा व भक्ती आराधनेचा शुभारंभ ॐ पासुनच होतो. ॐ सगुण. निर्गुण. साकार. निराकार. ब्रम्हस्वरूपाला आपल्या ठायी साकार केले जाते. तात्काळ मुक्ती देणारा आणि सर्वाेत्तम मंत्र ॐच आहे. ॐ च्या महिम्याचे अनुमान म्हणजे वेदाच्या अंती ॐ चेच महत्व दिले आहे. उपनिषदाचा समारंभ हा ॐ पासुनच प्रारंभ होतो. ॐ परम पावन गायनात मंत्राचे अद्याक्षर ॐ चे आहे. भगवंताची आराधना ही परम पावन ॐ पासुनच आरंभ होते. ॐ चे महत्व अनंत आहे. अनंतात अनंत मिसळावे त्याहीपेक्षा ॐ चे सामर्थ्य कितीतरी पटीने जास्त आहे.
माता पार्वती भगवती ॐ चा जप करून रांत्रदिन वर्षानुवर्षे सुध्दा ॐ च्या ध्वनीलहरीत एकाग्र होऊन तन्मय होत असे ॐ अध्यात्म व भगवंत दर्शनाचे परम तत्व आहे. ॐ हे सद्गुरूच्या प्रणवध्वनीतून पाचव्या वेदातून प्रणवोवाच्य (गुरूमुखातुन) मिळणारा महामंत्र आहे. त्याचेच मनन करा, ध्यास करा, अखंड घ्या, मुखाने गुप्त घ्या अंतःकरणातुन घ्या सद्गुरूना शरण जा. ॐ चे दर्शन घ्या सर्व काया ॐ मय करून रोमरोमात ॐ चाच ध्वनि सोडा. ॐ परम पवित्र परमात्म्याचे (प्रभुचे) सर्व श्रेष्ठ नाम आहे. (स्वाभाविक) झाडाच्या पानाचा सुँइ. सुँइ. सुँइ. तसेच नदीच्या जल प्रवाहाचा व समुद्राच्या लहरीचा ध्वनी व मोटार गाडी इत्यादीचे ध्वनी (आवाज) इत्यादी मध्ये ओंकाराची ध्वनि भासतो. प्रकृतीमध्ये परमेश्वराच्या या ॐ कार नामाचा निरंतर जप करण्याची प्रेरणा होत असते. ॐ कसा महान शक्ती सामर्थ्यशाली आहे. ईश्वरी शक्ती मध्ये ओतपोत भरलेली आहे. ॐ काराला ब्रम्ह म्हणुन संबोधले जाते. ॐ ला प्रणव म्हणतात. कारण ओंकारची सर्वत्र स्तुती केली जाते. ज्याप्रमाणे लहानशा बिजात एक महान वृक्ष सामावलेला असतो. त्याप्रमाणे ॐ मध्ये संपुर्ण विश्वब्रम्हांड सामावलेले आहे. एवढयासाठी ॐ ला बिज म्हंटले आहे. ॐ हे ब्रम्हाचे प्रतिक आहे. ओंकाराला कल्याणकारी मंत्राचा शिरोमनी (शिकमनी) म्हणुन संबोधले जाते. त्याचप्रमाणे स्वस्तिक हे चिन्ह ॐ चेच विस्तृत रूप आहे. त्यामुळे स्वस्तिकला कल्याणकारी प्रतिकात्मक शुभचिन्ह समजले जाते. पुजा कार्यात स्वस्तिक हे चिन्ह अग्रस्थानी असते.
जीवनात सर्व प्रथम आवश्यक.
ओंकार उपासनेचे महत्व म्हणजे सर्व प्रथम मातेच्या उदरी शिशु/बालक जन्म घेते त्यावेळी प्रथम त्याला स्नान घालतात. सर्वप्रथम सुवर्णाचे/ सोन्याची लहानसी तार घेऊन मध व गायीचे तुप विषम प्रमाणात मिश्रन करून घेऊन सोन्याच्या तारेने त्यात बुडवून बालकाच्या जिभेवर ॐ लिहण्याचा प्रघात आहे. त्याचा संकेत असा की, मानव शरीर धारण करतेवळी सुवर्ण शलाकाने ॐ लिहल्यामुळे त्याची वाणी शुध्द व पवित्र होऊन वाणीत सदैव प्रणव ॐ ध्वनी रहातो. चालता फिरता, खाता पिता, जागृती स्वप्नी, सुषुप्ती अखंड वाणीत ॐ ध्वनी जीवनभर सतत तेवत राहतो. मृत्यु समयी सुध्दा शेवटचा श्वास ॐ च्या ध्वनीतच बाहेर पडतो. हे शास्त्र प्रणित आहे. जो व्यक्ती मृत्यु समयी ॐ च्या नामस्मरणात प्राण सोडतो तो उत्तम गतीला जन्म घेतो. (जाऊन मिळतो) शरीर धारण करतेवेळी आणि शरीर सोडतेसमयी या जगात येतेवेळी व या जगातुन जातेवेळी ॐच्या स्मरणात प्राण सोडणे हाच भक्तीचा महा पुरूषार्थ आहे. अंतिम समयी ॐ स्मरण करण्यासाठी जिवनभर ॐ चे नामस्मरण करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तरच अंतिम साध्य प्राप्त होते.
सर्व गोष्टीचा विचार करून श्री परम पुज्य महान तपोनिधी सद्गुरू काशिनाथ महाराज आपल्या शिष्याना पुन्हा पुन्हा सांगत असत की, तुम्हाला नाम मंत्र दिला आहे त्याचेच अखंड स्मरण करा, आयुष्यभर नामात रहा व अखंड कामात रहा. ‘‘ मुखी नाम व हाती काम.’’ हेच परम पदाला परम गतीला घेऊन जाणारे आहे. यासाठी नामस्मरण या देहाचे मुख्य ध्येय बनवा.
जय सदगुरू अतिउत्तम ज्ञान
उत्तर द्याहटवा