श्री सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणतात.रात्री झोपल्यानंतर बारा वाजता आपल्या जवळ कोणती वस्तु होती, काही ऐकत होतो, कांही पहात होतो, कांही नाही तरी पण आपण सुखी होतो. कोणते सुख होते, जो बुध्दीमान मनुष्य आहे ना, तो विचार करीत रहातो आणि निर्बुध्द मनुष्य झोपून जातो, तो रात्री झोपतो व दिवसाही झोपतो, किती लोक तरी झोपेत चालतात. आपण चालतो, बाजारात जातो, याचा अर्थ असा नाही की, आपण जागे आहोत आपण झोपलेलेच असतो, कितीतरी लोक असे असतात की, रात्री झोपतात सकाळी उठल्यावर आपले अंथरून घेऊन दरवाजा उघडतात व चालु लागतात, त्याना माहीत नसते की, आपण निघून गेलो आहोत असे चालतात आणि अनुभवही तसाच आहे. तर मग ही अभिलाशा आम्हाला का सोडीत नाही असा प्रश्न आहे. आपल्या दृष्टीने जी माया (व्यक्ती व वस्तुची आभिलाशा ) आहे. ती तर रहाणारच परंतु शास्त्रकार म्हणतात.
पुर्णमदः पूर्णमिदं पुर्णात, पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पुर्णमादाय, पुर्ण मेवावशिष्यते ।
आपण रोज वाचतो की, मी पुर्ण आहे, मला कोणाचीही जरूरत नाही, तसा अनुभवही झोपेत रोज येतो. तरीही व्यक्तीची किंवा वस्तुची आभिलाशा आहे ती का? आहे सुख हवे म्हणुन सुखासाठी वस्तू किंवा व्यक्ती हवी.
तत्र भागवताण धर्मान शिक्षेद गुर्वात्मदेवतः।।
आमाययानुवृत्यां यैस्तुष्येदात्मात्मदो हरीः ।।
शिष्याने गुरूलाच आपला परम प्रियतम मानुन त्यांची निष्काम भावाने सेवा करून त्यांच्याजवळ राहून क्रियात्मक शिक्षण घ्यावे. या साधनानी भक्ताना आत्मस्वरूपाचा दाता, भगवंत प्रसन्न होतो. प्रथम सर्व विषयासंबंधी वैराग्य, संत समागम, अनाथावर दया, बरोबरीच्यांशी मैत्री आणि श्रेष्ठ पुरूषाविषयी पुज्यबुध्दी या गोष्टीचा विचार केला पाहीजे. म्हणजे या गोष्टी शिकल्या पाहीजेत. मृत्तीका, जल आदी साधनानी बाह्य शरीराची पवित्रता करता येते, पण कपट इत्यादीचा त्याग करून, स्वधर्माचे आचरण, क्षमा (सहनशक्ती), मौन, स्वाध्याय, सरळता, ब्रम्हश्चर्य, अंहिसा आणि शितोष्ण, सुख, दुःख इत्यादी हर्ष विषय रहीत होणे शिकले पाहिजे. तिलक गंध लावावा असे लिहिले नाही पण गंध तर लावलाच पाहीजे. गंध लावला आहे यातच पुर्णविराम समजणाऱ्यासाठी हे सांगीतले आहे. जेथे स्वल्पविराम हवा तिथे पुर्णविराम मानतात ते बरोबर नाही कित्येक लोक म्हणतात मी रोज स्नान करून कपाळाला गंध लावतो. आणि त्यानंतर दुध पितो. कारण मी वैष्णव आहे, वैष्णवाची व्याख्या इतकी लहान करून टाकली आहे की, कोणीही मनुष्य वैष्णव बनू शकतो. सुभाषितकार म्हणतात.
ये पाप शमयन्ती संगतीमृतां ये दाणशंगारीनो ।।
येषां चित्तमरीव निर्मलतरं येषां न भग्रंवृतम ।।
ज्यांच्या सहवासाने पापे नष्ट होतात जे दानाला आलंकृत करतात. ज्यांचे चित्त अतिशय निर्मळ असते त्यांची वृत्ती कधी भंग होत नाही. जे प्रतिदिन सर्वाना सुख देतात. वैष्णव गंगा हातीचे गंण्डस्थळ, आकाश, भिष्म व संगीतासारखे असतात आणि या जगात दुर्मिळ असतात. भागवत धर्मात गुरूच माझा आत्मा गुरूच माझी देवता आहे असे वाटले पाहिजे. तरच या मार्गाने जाता येते. अज्ञातावर प्रेम करायचे आहे अशा जवळ जायचे आहे. आणि अज्ञात रस्त्याने जायचे आहे हे सर्व इतके अज्ञात आहे की, गुरूवर मार्गदर्शन करण्यावर गुरूंची आवश्यकता समजावली आहे. गुरू ही अत्यावश्यक बाब आहे. तो माझा आत्मा आहे असे वाटले पाहिजे. त्याचा अर्थ काय गुरूंचे सुख दुःख ते माझे सुख दुःख बनले पाहिजे गुरूंचे कार्य अथवा ध्येय माझे बनले पाहिजे. याचे कारण कार्य व ध्येयहीन गुरू असूच शकत नाही. जर कोणी असेल तर तो गुरू नाही तुम्ही महर्षींचे, आचार्याचे जीवन पहा त्यांच्या जीवनात ध्येय असते. तसे कार्यही दिसते, कोणत्याही ऋषिंचे वा आचार्याचे जिवन ध्येयरहीत नाही. गुरूंचे ध्येय व कार्य हे माझेच ध्येय व कार्य आहे, असे वागले पाहिजे अशी एकात्मता गुरूंशी व्हायला हवी. भारतीय संस्कृतीत गुरू भक्ती हे एक मधुर काव्य आहे. ज्ञानेश्वर भगवंतानी तेराव्या अध्यायात गुरूंची महती समजावली आहे. कोणाला वाचायचे असेल तर वाचु शकता यामुळे ज्ञानात भरच पडेल. गुरू म्हणजे शिक्षक किंवा आचार्य नव्हे, शिक्षक आणि आचार्य त्या त्या विषयाचे तज्ञ असतात व तो विषय समजावून सांगतात. परंतु गुरू ज्ञानाच्या गर्भगारात घेऊन जातात. शिक्षक व आचार्यानी शंका विचारावी आणि ते समजावून सांगतात. शंकेचे निरसन करतात, पण ज्याना पाहूनच शंकेचे निरसन होते. त्यानाच गुरू म्हणतात.
गुरूस्तु भौनं ध्यारष्यानं शिष्यस्तु छिन्नसंशया ।।
अशा प्रकारे गुरूंची महती अद्भुत आहे.
(जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात)
द्रष्टांतोनैव नैव द्रष्ट स्त्रिभुवन जठरे समगुरोज्ञार्नदातुः ।
स्पर्शश्र्चत्तत्र कल्ष्यः स नयति यदहो स्वर्णता मश्रमसारम ।।
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात ज्ञान देणाऱ्या सद्गुरूना दिली जाईल अशी कोणतीही उपमा दिसून येत नाही.
गुरूंना जर परिसासारखे म्हणावे तर ते बरोबर नाही कारण परीस फक्त लोखंडाचे सोने करतो. स्वतः सारखा परिस बनवत नाही. आणि सद्गुरू तर आपल्या चरणाचा आश्रय घेणाऱ्या शिष्याला स्वतःसारखे बनवितात.
म्हणुन गुरूदेवाना कोणतीच उपमा नाही गुरू तर अलौकीक आहेत. गुरूना गुरूदेव म्हणुन संबोधले जाते. गुरू म्हणजेच देव अन्य कुठला देव नसून गुरू हेच देव परमात्मा भगवंत ईश्वर आहेत. गुरूसेवा गुरूभक्ती हीच परमेश्वराची उपासना सेवा भक्ती आहे. गुरूना सोडून जी भक्ती केली जाते ती निष्फळ आहे...........
मी कोणाचा आहे असे म्हणण्यात आनंद आहे, मी एकटा आहे, स्वतः माझाच मी आहे, असे म्हणण्यात आनंद नाही. जडवादी लोकही गुरूपुजा मानतात. फक्त ईश्वरवादीच मानतात असे नाही. ज्याना भाव व भावना आहे, त्याला गुरूपुजेचे महत्व आहे. जो सत् शिष्य आहे तो गुरूंचे सिध्दांत त्यांचे कार्य त्यांचे अंतिम ध्येय ते सर्व पुढे घेऊन जाईन अशी भावना शिष्यांच्या अंतःकरणात घर करून रहाते.
जानकीचे पिता राजा जनक म्हणतातः- मी याज्ञवल्काचा शिष्य आहे. शुकदेव सांगतात की मी जनकाचा शिष्य आहे. यातील शुक वितरागी आहेत आणि सिंहासनाधिष्टीत जनक राजर्षी आहेत. आचार्यात सुध्दा असे द्वैत आहे, शंकराचार्य म्हणतात मी गोडपादत्पार्याचा आहे. मुळ मुद्दा असा आहे की, गुरूंचे सिध्दांत पुढे न्यायचे आहेत व गुरूंचे जे कार्य आहे ते अधिक शक्ती लावून पुढे घेऊन जाणे ही गुरू पुजा आहे. गुरूपुजा केवळ फळ फुल अर्पण करून होत नाही. गुरूंचे जे जिवनसिध्दांत आहेत त्याना पुढे घेऊन जाणे ही खरी गुरूपुजा आहे. जोपर्यंत शांत व स्वच्छ बनण्याची तळमळ शिष्याना आहे, तोपर्यंत गुरूपुजा राहीलच.
ज्याला पाहुन स्वार्थ समाप्त होतो. ज्याच्याकडुन स्वार्थ, साधायची इच्छा होत नाही. अशाना परम गुरू म्हणुन संबोधले जातात जगदगुरू शंकराचार्यांच्या बाबतीत एक घडलेली घटना आहे. श्रीमंत शंकराचार्य एका प्रचंड शिळेवर बसले होते. राव, रंक सर्व त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले. प्रातःकाळी राजा एकटाच पायी चालत त्यांच्या दर्शनाला जात होता. रोडच्या कडेला एक माळी बसला होता त्याच्या हातात एक सुगंधी कमळ होते. शरदऋतु संपून शिशिर ऋतु सुरू झाला होता कमळ फुल दुर्मिळ झाले होते. ते कमळ विकत घेऊन सद्गुरूना अर्पण करण्याची इच्छा राजाला झाली. त्याने कमळाची किंमत माळी यांना़ विचारली, माळी यांने सांगीतले चार आणे. इतक्यात एक श्रीमंत मनुष्य तिथे आला तो म्हणाला, मी आठ आणे देतो, आणखी तिसरी व्यक्ती तेथे आली तो म्हणाला, मी एक रूपया देतो. अशा रितीने कमळाची किंमत वाढु लागली. माळयाने विचार केला हे सगळे ज्याला हे कमळ विकतील त्याच्याकडुन आधिक पैसे घेतील. हे कमळ मीच जाऊन कमळ विकुन आधिक पैसे का घेऊ नये?, असा विचार करून माळी म्हणाला, मला कमळ विकायचे नाही तुम्ही सरळ जा. श्रीमंत मनुष्य व राजा पुढे चालु लागले. माळीही त्यांच्या मागे मागे जाऊ लागला हे सगळे आद्यशंकराचार्यांच्या जवळ पोहचले. अनेक लोक आले होते ते शंकराचार्याना नमस्कार करीत व बाजुला होत. राजाही त्यांना नमस्कार करून बसला. त्यांच्या मागुन माळीही होता. तो सद्गुरूंच्या जवळ गेला, त्यांच्या चरणावर ते कमळ ठेवले नमस्कार केला आणि स्तब्ध झाला. पैसे घ्यायचे आहेत हे तो विसरून गेला. ज्या विचारानी तो आला होता ते विसरून गेला. शंकराचार्यांना पहाताच त्याच्या मनातील स्वार्थी विचार नष्ट होऊन गेले. त्या पवित्र गुरूमुर्ती समोर त्याचे हृदय पवित्र विचारानी भरून आले, पवित्र वातावरणात स्वार्थी विचार एकक्षणभर ही टिकु शकले नाहीत. हिंदी भाषेत एक म्हण आहे, पिना पाणी छानके, और गुरू करना जानके । त्यासाठी गुरूना समजून घेऊनच गुरू केला पाहिजे.
बहवो गुरूवो लोके । शिष्यपितापहरकाः
कचित तत्र द्रष्टान्ते शिष्य चित्ताप हरकाः
जगात शिष्यांचे वित्त हरण करणारे गुरू बरेच आहेत. परंतु शिष्याच्या चित्ताचे हरण करणारा गुरू क्वचितच आढळतो. गुरू शब्दाचा अर्थ काय? गु. शब्दस्तन्धकारःशावतरू रू. शब्दस्तन्निवर्तकः गु. शब्दाचा अर्थ अंधःकार आणि रू शब्दाचा अर्थ आहे निवर्तक. (काढुन टाकणारा)
अंधःकाराचे निवारन जो करतो त्याला गुरू म्हणतात. जिवन काय आहे कशा करीता आहे, याबाबतीत सर्वांच्या जीवनात अंधःकार आहे. अंधःकारात प्रकाश कोण देईल सुर्यच अंधःकाराचा नाश करतो. सुर्यामुळे अंधःकार जातो तो वेगळा अंधःकार आहे. परंतु जिवनाबाबत जो अंधःकार आहे तोच गुरु आहे. तो अंधःकार दुर करून जिवनाचा अर्थ समजावणारा आहे. गुरू आपले जीवन काय आहे? का आहे? जिवन म्हणजे कसे आह? हे ज्ञान गुरूच देतात गुरू कसा असायला हवा यावरही शास्त्रकारानी लिहिले आहे. सर्व शास्त्रेपरो दक्षः सर्व शास्त्रार्धवित्सदाः ज्याला काही येत नाही कोणत्याही शास्त्राचा अभ्यास नाही तो गुरू कसा बनू शकेल. कारण तो दुसऱ्याचा अनूभव उचलायला तयार नाही. त्याला दुसऱ्याचा अनूभव नाही. ज्ञानाचा अर्थ काय आहे. हे शब्दार्थाचे अनूभव शब्दांकित झाले त्यानाच शास्त्र म्हणतात. असा गुरू असला पाहीजे.
सगुणोपासना - मुर्तीपुजा ही जीवन विकासासाठी सर्वात आधिक महत्वाची गोष्ट आहे. सगुणोपासनां वस्तु साम्यक जाणतीः ।
न केवलं जानती की विदः ।। 01 ।।
असे लिहीले आहे याचे कारण मुर्ती पुजेवीना मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. पुजेशिवाय चित्त शुध्दी होत नाही, मुर्तीमध्ये चित्त एकाग्रता हा एकच उपाय आहे. यासाठी सगुणोपासना हा प्रथमावस्थेचा सुलभ मार्ग आहे.
।। सर्वकार्येषु निपुनः गुरू यवंते विधियते ।।
अशा गुरूंची अध्यात्मात आवश्यकता आहे. अदृष्य भगवंताजवळ प्रेम करायचे आहे, जायचे आहे याकरीता गुरू मार्गदर्शक आहेत. अदृष्य शक्तीवर प्रेम करायचे आहे, त्यासाठी जिवनात गुरू असायलाच हवे. गुरूंच्या जिवनाचा व विचारांचा परिणाम आपल्या जिवनावर होतो. मनुष्य जिवनात गुरू लाभणे हे फारच महत्वाचे आहे.
‘‘ गुरूविन जिवन जगणे ते मृतवतः’’
जिवनात गुरू असणे हेच उज्वल भवितव्याप्रत नेऊन सोडणारे भवरोगाचे वैद्य. म्हणजे -।। भवरोग वैंद्य श्री सद्गुरू त्वं नमामी ।। गुरू पाहिजे याचे कारण आपल्या मनात कचरा साचतो तो सर्व कचरा कोठे टाकाल. मनाला रिकामे करायचे आहे, या सर्व कार्यासाठी गुरूंची कृपा पाहिजे. गुरू मनातील कचरा काढून मनाला मोकळे व स्वच्छ करतात. जोपर्यंत मनातला कचरा निघत नाही तोपर्यंत मन उद्दिघ्नतेने बेचैन होऊन सैरावैरा धावतच रहाते. एकदा का गुरू कृपेची अमृतवृष्टी झाली की, क्षणार्धात मन कचरा विरहित होत स्वच्छ होते.
आपल्या गुरूजवळ मनुष्य पाप ओकणार नाही तर तो मनात ते कितीवेळ साठवून ठेवील. माणसाच्या हातून पाप तर होतेच अज्ञानामुळे, मुर्खपणामुळे, किंवा परस्थितीमुळे हाताने पाप घडते. घडलेले पाप गुरूजवळ ओकण्याशिवाय हलकेे होता येणार नाही. आपल्या मनात येणाऱ्या अनेक शंका कुषंका (न जाणता) गुरूंना सांगाव्याच लागतात. तेवढयासाठी गुरू हवेत. शिष्याला आत्मवत समजावणारे गुरू हवेत, कारण गुरूंचे मस्तक ज्ञानाने भरलेले एक मोठे भांडार असते. गुरूंच्या मस्तकातुन ज्ञानाची गंगा अखंड वाहत असते.
श्रवणं किर्तणम् गुरूरदेवो। स्मरणं पादसेवनम् ।
आर्चणं वन्दणम् दास्यं । सख्यमात्मनिवेदनम् ।।
श्रवण, किर्तन, स्मरण, पादसेवनं, आर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. या सर्व गुरू भक्तीच्या पायऱ्या आहेत. तेंव्हा गुरू म्हणतात. सत्यंवद खरे बोलले पाहीजे, खरी भक्ती केली पाहीजे. खरी ज्ञानोपासना केली पाहीजे. खरी गुरूसेवा केली पाहीजे. खरे आचरण ठेवले पाहीजे. खरे ज्ञान झाले पाहीजे. खऱ्या मार्गाने वागले पाहीजे. सत्यंवद = सत्यंवद = सत्यंवद = हेच श्री गुरू शिष्याला सांगतात = म्हणतात = उपदेश करतात = परम सत्य है. परम सत्य है. अंतीम वही परं सत्य है.
ओंकार बिन्दुसंयुक्तं । नित्यं ध्यायन्ति योगीनः ।
कामदं मोक्षदं चैव । ओंकाराय नमोः नमः ।।
( व्यासरचित )
महाराजानी केलेले निरूपन.
जय सद्गुरू श्रीमहाराजांनी किती सुंदर विवेचन केलेले आहे नवविधा भक्ती
उत्तर द्याहटवागुरु तत्व बोध गुरु शिवाय जगणे व्यर्थ अशा अनेक विषयाच्या द्वारे आपल्यापर्यंत आलेले आहेत असे सुंदर रत्न विचार रत्न अनमोल खजाना खूप सुंदर पूजा तुझ्यामुळे हे वाचण्यात आले