श्री समर्था हे घे जवळी आता

.          
     
   *सुधामती नाडे, मुरुडकर* या स्वतः सद्गुरूंच्या सानिध्यात सेवाकार्य अनुभवले असल्याने त्यांनी स्वतः गीत रचून गायलेले आहेत.
         *आजचा अभंग*

श्री समर्था हे घे जवळी आता I
अवघे दर्शन ध्यावे भक्ता I I

त्रिमूर्ती त्रिगुणात्मक दत्ता I
त्रिताप हरिता तू अवधूत I
वत्सलतेची अवघी सरिता 
म्हणती गुणवंता II 01II

माय बाप हा अखिल जगाचा I
कल्पवृक्ष हा काळी युगाचा I
असे भुकेला सद्भक्तीचा स्वामी सुखदाता II 02II

ध्यान लागता तुझिया चरणी I
भ्रंग मना का रमे गुंजनी I
चतुर्भुज ते स्मरूपे स्मारूनी 
वंदीन भगवंत II 03II

          आजची सेवा श्री समर्थ सच्चिदानंद सदगुरू काशिनाथ महाराज यांचे चरनी अर्पण.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️*
 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सदगुरू काशिनाथ महाराज की जय.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

  1. जय सद्गुरू पूजा तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे एवढं काम कॉलेज सांभाळून हे सगळं महाराजांचा कार्य करीत आहेस अभिमान वाटतो तुझा प्रत्येक शनिवारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे तो आम्हाला ग्रुप वर व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल मध्ये दिसतेस शनिवारची वाट बघत राहतो आम्ही खूप आनंद वाटतो तुला पाहिलं की आपल्या आनंदाचे दिवस गंगाखेडला उत्सव प्रसंगात आपल्या सर्वांच्या
    भेटी होतात खूप उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण आनंदात खूप छान आठवले की मन भरून येते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा