स्वामी समर्थ माझा येणार काखतीत

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏         
.           🚩 *अभंग*  🚩
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

स्वामी समर्थ माझा येणार काखतीत I
हा देह त्याचे पायी ठेवीन मी त्वरित II

डोळे ते पाणीदार ते दंड पिळदार I
गरिबांचा पैलपारू स्वामी समर्थ माझा II ०१II

पायी खडाव साजे हाती माळ ती विराजे I
मुखी राम नाम गरजे स्वामी समर्थ माझा II ०२II

पाठीशी धेनुमाय संगे ते शिवराय I
श्री दत्त विस्मित होय स्वामी समर्थ माझा Ii ०३ II

रचना आणि गीतकार,
*परमभक्त सुधाताई नाडे, मुरुड*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा