.
. . *अभंग*
स्थिर कैसा बैसला हो ब्रम्हानंदी I
गंगाखेड चा योगी कोणी पाहिला II
अंगावरी भगवे वस्त्र गळा I
शोभे रुद्राक्ष माळ भाळी I
भास्माचा पट्टा कसा लाविला II ०१II
हातामध्ये त्रिशूळ धारी I
काखे मध्ये शोभे झोळी I
मस्तकी जठा भार वाहिला II ०२II
पायी खडावा वीराजे I
हाती कमंडलू साजे I
शनखाचा नाद नभी गुंजला II ०३II
चला चला गंगाखेड जावू I
डोळे भरुनी सदगुरू ला पाहू
गुरु नामाचा जय जय कार गर्जवू या II ०४II
भक्त सुधाताई म्हणे सदगुरू नाथा I
तुमचे चरण न सोडी आता I
तुमच्या चरणा वरी देह वाहिला II०५II
रचना व गायक
*परमभक्त सुधाताई नाडे मुरुड*
उत्तम, जय सदगुरू
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू खूप छान चाललेला आहे सप्ताह एक हप्ता म्हणून सुरू केलेला हा भजनाचा कार्यक्रम किती अखंड अविरत चालू आहे सुधामती नाडे यांना एकदम जुने भजन आठवताहेत त्यांचे म्हणणे आहे झरा लागल्या सारखा चमत्कार झालेला आहे खूप छान नाडे त्यांच्या गाण्याला आणि महाराजांच्या कार्याला ब्लॉग मार्फत पूजा कडून महाराज कार्य करून घेत आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद
हटवाVeri nice 👌🙏🌹🌟 जय सद्गुरू
Very nice
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा