💐 *अभंग* 💐
थोर उपकार गुरूचा झाला I
आज माझा हो फेरा चुकला II
जेंव्हा झालो घोडा गाढव बैल I
वाहिला ..... बोझा पुरा I
नाही आली दया मालकाला माझ्या I
मार दिला पुरा मला I
नाही चारा पाणी कधी वेळेवरी I
दिले बांधून या खुंट्याला II ०१II
जेंव्हा झालो मासा टाकीला फासा I
कोळ्याने माझ्यावरी.. II
नरकात राहिलो किडा होऊनी I
सोसल्या यातना भारी I
कुत्रा मांजर झालो दारोदारी फिरलो I
काठी दगडाचा मार खाल्ला II ०२II
मानव जन्मी नारी जन्माची I
काय सांगावी कथा I
कामानी वेढलं नवऱ्यानी पिढलं I
नवऱ्याला दारूची नशा I
नाही संसारी सुख घडीभर I
जीव दुःखाने बेजार झाला II ०३II
वेळोवेळी संत येती जगात I
दाखवी न्या मार्ग खरा I
गुरू कशीनाथा चरणी I
शरण येवूनी II
भक्ती त्यांची खरा चुकविल फेरा I
सांगे जगाला सदगुरू नाथ II
खूपच मस्त भाव ओतून गीत रचले आहे
उत्तर द्याहटवा