७. गुरूबोध.
एकेकाळी रामवाडी आश्रमातुन हस्त लिखित एक चिट्ठी आली. एका कोऱ्या लिफाप्यामध्ये बंद करून भक्त त्र्यंबक दत्तु कोळी पाॅकीट घेऊन आला. पाॅकीट फोडुन पाहिले त्यात एक चिट्ठी दिड इंच ते अडीच इंच चार ते पाच बोटाची लांब व त्यावर महाराजांच्या हस्ताक्षर लिहिलेली होती. त्र्यंबक कोळीना डाॅ. शंकर बचाटे यानी विचारले, अहो हे पत्र कोणी दिले व एवढया तात्काळ सकाळी आपण कसे काय आलात? ती चिठ्ठी महाराजानी दिगंबर मास्तर अण्णाना दिली व ते म्हणाले, अरे त्र्यंबक हे पत्र डाॅ. अण्णांना तात्काळ नेऊन दे. हे एैकताच व चिठ्ठीवरील मजकुर पाहुन डाॅक्टर गोंधळात पडले. ते पत्रावर लक्ष देऊन पुन्हा पुन्हा वाचत राहिले त्याचा अर्थ कळणे शक्य नव्हते. कारण चिट्ठीवरील मजकुर सिसपेन्सीलने लिहलेला व अंधुक मजकूर.
।। शरीर माध्यं - खलु धर्म साधनं ।। इतकेच लिहीलेले व महाराजांची सही. या पत्राचा अर्थ डाॅक्टराना न समजल्याने कठीण झाले. अनेक विचारानी डाॅ. बेचैन झाले, नाना तऱ्हेचे विचार डोक्यात सुरू झाले. फक्त बारा अक्षरे आणि पाच शब्द हे पंच महाभौतिक तत्व तर नसतील किंवा द्वादश ज्योतिर्लिंग दर्शक असतील किंवा पंचतत्वाचे हे शरीर हा देह बनले आहे. अशा विविध विचारानी निर्णय घेत राहीले. हे शब्द प्रकृतीवर आधारभुत आहेत. प्रकृती आणि विकृती ही देहाची सांगडच आहे. प्रकृतीत अनंत प्रकारच्या व्याधी असतात. शरीर हे निकोप व निरोगी असणे फारच कठीण आहे.
बहुतेक गुरूमाउलीना अनुष्ठान काळात कांही तरी व्याधी होत असाव्यात, त्यामुळे अनुष्ठानात व्यत्यय येत असेल. असा मनाचा निर्धार करून श्री गुरूमाउलींच्या भेटीचा ओढा लागला. भल्या मोठया दोरखंडाने मनाला ओढु लागले. देह इथे व मन तिथे अशी द्विधा अवस्था होऊन श्री गुरूमाउली दोन्ही नेत्र बंद करतात व समोर रहात असत असे दृष्य नेत्रपटलावर उमटले. आणि नेत्र उघडताच ते दृष्य गायब होत असे.
कधी तरी कर्ण बधीर होत असत आणि सुक्ष्म स्वर निनादात राहुन त्या सुक्ष्म स्वरात. ‘शरीर माध्यं खलु धर्म साधनं’ असा आवाज काणी पडत असे.महाराज म्हणतात ‘‘अरे जप - तप - अनुष्ठान करण्यासाठी प्रकृती निकोप पाहिजे रे. या रामवाडी कर्मभुमी आश्रमात हे एकविसावे अनुष्ठान पुर्ण झाले. 21 अनुष्ठानापेक्षा पुढील अनुष्ठान कुठल्याही यौग्याला एका भुमीत करता येत नाहीत, हा शास्त्र संकेत आहे. आता यापुढील काळ विहंगम अवस्थेत राहील. अरे तुझे महाराज तुम्हाला ओळखतील पण तुम्ही मला ओळखु शकणार नाहीत. भविष्य काळ फार कठीण आहे.’’
एके दिवशी अनुष्ठानाचा सातवा दिवस रात्रीचे दोन वाजुन एकवीस मिनट संपताच, एक बेडकी उठली व पायापासुन पिंडरीतुन हळुहळु वर सरकत गुडघ्यामध्ये स्थिर झाली. असह्य वेदना चालु झाल्या तेंव्हा पायाला तराटा देऊन हस्त स्पर्षाने दाबले तेंव्हा बेडकी मांडीत आली, आणि एका तासाभरात ती सरळ जांघेत येऊन स्थिरावली, मरणोत्तर वेदना सहन करत एकदम दोन्ही नेत्र स्पष्ट खुले करून पाहिले तेंव्हा संदेश मिळाला, पुरे झाले एकवीस वर्ष संपले. ‘शरीर माध्यं खलु धर्म साधनं.’ प्रक्रती माध्यम असुन धर्म साधन, योग साधन आणि असाध्य ते साध्य ही वेळ संपलेली आहे.
पुढील काळ तत्वमसी महावाक्य आष्टदहा प्रकृतीचे आठ गुण व चतुष पादाचे चार गुण बाल्य - तारूण्य - वृध्दत्व - वाणप्रस्थ - संन्यास इथेच संन्यासाश्रमाचा अंत व वानप्रस्थ आणि संन्यास दोन गुण दोन पाद होत. इथेच चरण पादुकांचे दर्शन दत्त प्रभुंच्या पादुका कल्पवृक्ष स्थानी स्थिर आहेत. चरण कमलाचे दर्शन देऊन जगत्कल्याणार्थ उर्वरित देहाचे कार्य चालु रहाते. इथेच सत् - चित् - आनंद, सच्चिदानंद आहे. सत्य स्वरूपाचा चित्ताला स्थितप्रज्ञ ठेवणारा जो आनंद तो परमानंद परम पवित्र असुन अक्षय व अविनाशी परमानंद, हाच योग - जप - तप - अनुष्ठान सर्व सिध्दी पैकी योगसिध्दी ही अंतीम योगाची प्रथम पायरी आहे. अशा एकवीस पायऱ्या आहेत. पुढे आभास काळाकुट्ठ अंधकार आणि लालसर सुक्ष्म प्रकाश, सुक्ष्म देहात विहंगम स्थि
इथे
शांत चित्त एकांत लोकांताच्या पलीकडे भासमानाच्या पलीकडे, अभासात, निर्गुणात इथे कुठल्याही प्रकारचा रंग नाही. वायुमय तरंगात सुक्ष्म वायुच्या झुळकी भासतात पण दिसत नाहीत, देह हा द्रष्टीगोचर आहे पण अंतरंग निर्गुण निराकार ओंकार अद्याक्षरात 36 अक्षरे विलीन होतात. समाधानात ( समाधित ) स्थितप्रज्ञ स्थितीत जगत् कल्याणार्थ आरसा समोर ठेऊन प्रतिबिंब प्रक्षालण होते. तेंव्हा मात्र आरश्याच्या साथीने प्रक्षालण केले जाते, तेंव्हा इथे मी आणि तु याचा लय होतो.
🕉
।। गुरूबोध ।।
हा विषय महाराजांच्या कृपाशिर्वादांचा लेखकाला प्राप्त झाला आहे. महाराजानी लेखकाला दिलेले वरदान आहे. स्वप्नी व जागृतीत या बोधाचे ज्ञान बुध्दीच्या पलीकडचे महाकठीण आहे. लिखाणाचे ज्ञान दिले पण अर्थ ज्ञान दिले नाही, फक्त बोध प्राप्ती दिली. कृपा करून वाचकानी गुरूंच्या संदेशाचे अर्थ लावून वाचन करावे.
क्षमस्व = लेखक.
🕉
सत्संगात राहुन परमार्थीक विचारांचे अनुकरण करा. सत्संगती प्रापंचिकाना सुखमय असुन संसारातील सर्व गोष्टींचे दुःख विसरते. सत्संगतीने आचार विचारात बदल होतात. व मनुष्य सदाचारी विवेकी बनतो. अनेक प्रकारच्या सुख दुःखांचा विसर पडतो. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ, अंहकार सत्संगतीने क्रमाक्रमाने कमी होऊन मानव मानुसकीचा बनतो. मी तु पणाचा अभिमान नाहिसा होतो. आणि मनुष्य परम पवित्र होऊन परमात्म्याशी व गुरू चरणी एकरूप होतो. त्यावेळी त्याला सत्यत्वाची ओळख होते व मी म्हणजे एक देह असुन हा देह अक्षय नसुन नाशिवंत आहे, परमपिता परमात्मा हाच सत्य स्वरूप असुन, तो अक्षय व अविनाशी नित्य आहे याची जाणीव होते.
देह हा नाशिवंत व अनित्य आहे या सर्व गोष्टीची जाणीव फक्त सत्संगतीने होते. मानवाला मानवता प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर सत्संगतीची नित्तांत गरज आहे. संत संगतीने मनाचे मनोराज्य नष्ट होऊन मन पुर्ण शांतीपर्वात जाऊन शांतचित्त होते व अध्यात्मीक वृत्ती होऊन मन - बुध्दी - चित्त स्थिर होते. अंतःकरणाच्या अंतर्भावना जागृत राहतात. शुध्द चैतन्य स्वरूपाची ओळख होते. मनुष्य व भगवंत यांच्या मधील अंतर नष्ट होऊन मानव देहातच प्रभुचे वास्तव्य आहे असा परिपुर्ण भाव मानवाच्या ठायी निर्माण होतो. सत्संगती ही महान शक्ती असुन गुरूसेवेने गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ती प्राप्त होणारी आहे. जी वस्तु आपल्याजवळ नाही त्या वस्तुची मनुष्य ईच्छा करतो, ती वस्तु मिळाली तर तो आनंद मानतो व अंतःकरणातुन विश्वास ठेऊन गुरूसेवेत तल्लीन होतो. हे गुरूमाउली माझे सर्व काही तुम्हीच आहात, तुमच्याच कृपेने मी जगतो, मी म्हणजे कोण आहे हे मला कळत नाही, ते कृपा करून मला या सर्व गोष्टीचे ज्ञान प्रदान करावे. अशी क्षणोक्षणी गुरूचरणी मागणी करीत असतो. सर्वज्ञ होण्याची त्याची प्रबळ ईच्छा असते. आपला जास्तीत जास्त वेळ गुरू सेवेत घालवित असतो सत्संगामध्ये परमार्थीक गोष्टींचे श्रवण केल्याने आपल्या परम कल्याणाची रूची निर्माण होते व संसाराविषयी आरूची निर्माण होते. सत्संगात रूची वाटु लागते. सत्संगच गोड लागतो, सत्संगाची गोडी अमृतासमान अविनाशी आहे, ती गोडी अमृतमय लागते, अमृताच्या प्राशनाने मनुष्य अमर होऊन जातो. तद्वतच सत्संगतीच्या प्रभावाने अजर - अमर होण्याचे भाग्य लाभते इथेच मुक्ती प्राप्त होते, सार तत्वाचे ज्ञान होते, या अध्यात्म तत्वाचे ज्ञान होताच त्याला सर्व इतर ज्ञानाचे भांडार खुले होते. अज्ञान - ज्ञान - केवळज्ञान - आध्यात्मज्ञान - तत्वज्ञान - तत्वमसी - महावाक्य - ज्ञान आणि आत्मज्ञान अज्ञानरूपी अंधःकारातुन - आत्मज्ञानरूपी - महाप्रकाशात पोहचुन स्थितप्रज्ञ होतो.
हे सर्व सामर्थ्य व शक्ती फक्त सत्संगातच सामावलेली आहे. यासाठी संतानी गुरू सेवेचे वर्णन करून सांगितले आहे. सत्संगतीत अखंड वास करा. संतसेवा, गुरूसेवा, मातृसेवा, पितृसेवा हा अमृतानी ओतपोत भरलेला एक अमृतकुंभ आहे. गुरू सेवेत नित्य वास केल्याने कुंभातील पाझरणाऱ्या अमृताने आपले हात ओले होतात. ते न पुसता अखंड चाखत रहा, त्यामुळे नित्य अमृतप्राशनाचा स्वाद मिळुन, ही काया पवित्र व शुध्द होऊन, अमृतमय होऊन, सदा सर्वदा सत्संगाचा परमानंद आपल्या ठायी निवास करीत राहील. परमपदाच्या पवित्र आनंदात सत्संगाच्या प्रभावशाली महाप्रकाशात अमृतप्राशनाच्या स्वादात गोड परमानंदाची अविट गोडी चाखीत रहा. यासाठी साधुसंत, योगी, महात्मे तळमळुन सांगतात, बाबानो संत्संगात आपले आयुष्य कायमचे गुंतून ठेवा, सरळ साधे व सोपे नाम व सत्संग आहे. इथेच जिवनाचे उदिष्ट पुर्ण होते.
जय सदगुरू उत्तम
उत्तर द्याहटवाअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशिनाथ महाराज की जय डॉक्टर अण्णा यांचे हस्तलिखित अमृताने पीडीएफ करून लोकांपर्यंत पोहोचले आत्ता पूजा हे महान कार्य पुढे चालवत आहे ब्लॉग वरती तिने सर्वांसाठी सुंदर वाचण्यास सोपे असे कार्य महाराजांचे महाराजांचे विचार हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचत आहे खूप छान छान पूजा अमृता डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद
हटवाजय गुरुदेव
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू माझं नाव सौभाग्य रेखा पाटील आहे आमचा दोघांचा ई-मेल आयडी एकच असल्यामुळे
हटवामी दोन वेळेस प्रतिक्रिया देऊ शकते माझी आणि यांची सिताराम पाटील यांची प्रतिक्रिया पूजाला
गुरु महाराजांचा वरदहस्त लाभलेला आहे खूप छान पूजा असेच नवीन नवीन कार्यक्रम हातात घ्या आणि सरी सद्गुरू महाराजांचे कार्य जगभर होऊ द्या खूप छान महाराजांना आहे खूप आवडत आहे
Very nice 👌👌👍👍