. 🕉️भक्तिगीत🕉️
🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩💐
मानव जन्म किती स्वार्थी बाई I
परमार्थाचा त्याला मुळी भान नाही II धृII
धन दौलत या पैशापाई I
भाऊ बहिणीचे नाते आठवत नाही I
जाताना संगे कांहीं येत नाही II०१II
घडी दो घडीच्या सुखापा यी I
घडी सुखाला हरवून घेई I
नाशिवंत शरीर आहे स्थिर नाही II ०२II
सद्गुरू देवाची तुम्ही करा सेवा I
तुम्हा मिळेल मुक्तीचा मेवा I
जन्म घेवून आलेले सार्थक होई II०३II
रचना आणि गायिका
सौ. विजयलक्ष्मी प्रभाकर बेनकळी, गुलबर्गा.
खुप सुंदर रचना, भाव फुलांची माळ
उत्तर द्याहटवाअतिउत्तम आक्का, गीतात उत्तम भाव मांडला आहे
उत्तर द्याहटवा