अध्याय एकवीस
सद्गुरु चरणांचा सहवास सा-यांनाच प्रिय असतो..सद्गुरुंचे असे अनेक भक्त होते जे कायम सद्गुरु सेवेत मग्न असत..केवळ सद्गुरु आज्ञा शिरोधार्य मानूनच ते आपले जीवन व्यतीत करत होते..अशा अनेक परमभक्तांपैकी एक म्हणजे श्री. शिवसिंग महाराज...मूळचे आलूर ग्रामीचे असणा-या शिवसिंग महाराजांनी आपल्या मूळ ग्रामी एक मठ स्थापन केला होता..तिथे ते कायम सद्गुरुंचे नामस्मरण करीत असत...ते नेहमीच सद्गुरुंच्या दर्शनासाठी रामवाडीत येत असत..सद्गुरुचरणी त्यांची अपार श्रद्धा होती..एकदा ते असेच सर्व भक्तांसोबत रामवाडीत बसले होते..ते सा-यांना बोलले..”सद्गुरुंनी माझ्यावर फार कृपा केली ....ते होते म्हणूनच मी केवळ संसारी तरलो..अन्यथा माझे काय झाले असते देवच जाणे..”तेंव्हा एका गुरुबंधूने त्यांना विचारले.. “ सद्गुरु कृपेचा आसा कोणता अनुभव तुम्हाला आला आम्हालाही सांगा..” त्यानंतर शिवसिंग महाराज सांगू लागले...
आलूर ग्रामात असता....शिवसिंग महाराज प्रपंचात रममाण होतो..धर्मपत्नीसोबत बारीकसारीक कुरबुरी चालत असत त्या तर काय सगळीकडेच असतात..दोन माणसं म्हणली की, मतभेद हे आलेच ..पण एकदा कडाक्याचे भांडण झाले..शब्दाने शब्द वाढत गेला...क्रोधही अनावर झाला..हा क्रोधच मानवाला हिंसक बनवतो आणि त्यांनी त्यांच्या भार्येस ताडन केले..क्रोध मानवात राक्षसी प्रवृत्ती उत्पन्न करतो..सारासार विचार करण्याची आपली क्षमताच संपवते..सर्व नाशाचे मूळ कारण हा क्रोधच असतो..ज्याने यावर मात केली तो जिंकला..पण ते सहजासहजी शक्य होत नाही..आणि याच साठी नामस्मरण करायचे..केवळ सद्गुरुच आपल्याला या षडरिपूंपासून सोडवू शकतात..भांडण विकोपाला गेले..आजूबाजूचे चार समजदार लोक समजावत होते..पण कोणीच माघार घेत नव्हते..शेवटी रागारागात शिवसिंग महाराज यांची पत्नी प्राण त्यागण्यासाठी घराबाहेर पडली....ग्रामाबाहेर एका विशाल विहीरीजवळ आली..आता आत उडी घेऊन आपण आपले प्राण द्यायचे असा निश्चयच जणू त्यांनी केला होता..विहीरीच्या कठड्यावर उभे राहून त्यांनी सद्गुरुंचे स्मरण केले..व मनात म्हणाल्या “ सद्गुरुनाथा आता मी थकले..जीव देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही..मला मान्य आहे असे कृत्य अत्यंत चुकीचे आहे..पण मला माफ करा..आणि मला या सा-यातून सोडवा आता..” एवढा विचार करुन त्यांनी पाऊल पुढे टाकले..पण त्याक्षणी त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांना मागे खेचत आहे..त्या एकही पाऊल पुढे टाकू शकत नव्हत्या..त्यांनी आश्चर्याने आजूबाजूला पाहिले..पण तिथे तर कोणीच नव्हते...आणि त्यांच्या लक्षात आले..की, आपण अंतःकरणापासून सद्गुरुंचे स्मरण केले..आणि तेच धावून आले..आपण अशा पद्धतीने प्राण त्याग करावा अशी त्यांची इच्छा नाही म्हणूनच त्यांनी आपल्याला थांबवले..अतातयी पणे घेतलेल्या निर्णयापासून त्यांनी मला वाचवले..त्यांनी मनोमन सद्गुरुंना नमस्कार केला..व त्या घरी परतल्या..सारे निवळले...दाटून आलेले आकाश मोकळे झाले..त्यानंतर काही दिवसांतच हे दोघे पती पत्नी सद्गुरुंच्या दर्शनाला रामवाडीला गेले..सद्गुरुंचे दर्शन घेतल्यावर सद्गुरु शिवसिंग महाराजांना म्हणाले “ अरे शिवसिंगा तुझी पत्नी आमचे नाव घेऊन जीव देत होती..अरे तुम्ही भांडण करता मग मलाच निस्तरावे लागते..” क्षणार्धात दोघांच्याही लक्षात सारा प्रकार आला..दोघांनीही सद्गुरुंच्या चरणावर डोके ठेवले व मनोमन क्षमा मागितली..
शिवसिंग महाराजांनी हे अनुभव कथन केल्यावर सा-या भक्तांनी सद्गुरुंचा मनोमन जयजयकार केला “ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय..”
सद्गुरु नेहमी अनेक तिर्थक्षेत्र भ्रमत असत....जसजसे भक्तगण वाढत गेले तसतसे सद्गुरु नेहमी आपल्या भक्तांनाही सोबत घेऊन तीर्थक्षेत्री जात असत....असेच एकदा सद्गुरु आपल्या भक्तगणांसोबत हरीद्वार ला निघाले....तिथे पोचताक्षणी एक वृद्ध गृहस्थ सद्गुरु सन्मुख आले..शुभ्र वस्त्रे, मस्तकी भगवा फेटा, हाती दंडा असे अत्यंत तेजस्वी यती होते ते...सद्गुरुंच्या सन्मुख येताच त्यांनी सद्गुरुंकडे पाहून ओळखीचे हास्य केले.दोघांनीही एकमेकांना अभिवादन केले....दोघांच्याही डोळ्यात युगायुगांची ओळख जाणवत होती..अभिवादन करुन ते वृद्ध गृहस्थ निघून गेले....सारी भक्तमंडळी सद्गुरुंसहित एका धर्मशाळेत पोचले...स्नानसंध्या आदि कर्मे पूर्ण होताच सद्गुरुंनी..सुग्रास भोजनाची सिद्धता करण्यास सांगितले....सारी सिद्धता झाली माध्यान्ह उलटली...दुपारचे दोन वाजून गेले पण तरीही सद्गुरु काही भोजनांस पात्रे घेण्यास आज्ञा देत नव्हते....सारे क्षुधेने व्याकूळ झाले होते....एवढ्यात सकाळचे ते गृहस्थ धर्मशाळेत आले..व सद्गुरु सन्मुख बैसले..त्यांना पाहताच सद्गुरुंनी भोजनाची पाने घेण्याची आज्ञा दिली....ते गृहस्थ प्रसन्न चित्ताने भोजन करुन तृप्त झाले....व जाताना भरभरुन आशीर्वाद देऊन ते निघूनही गेले..आलेले आतिथी तृप्त होऊन आनंदाने परतले म्हणून महाराजही अत्यानंदित झाले...रात्री सारे भक्त गण जमलेले असताना सद्गुरु त्यांना म्हणाले “ अरे तुम्ही महापुण्यवान आहात....या हरीद्वारी प्रत्यक्ष नारायण आज तुमच्या दारी येऊन अन्न सेवून गेला...” सद्गुरुंचे हे बोलणे ऐकून सा-यांच्या डोळ्यासमोर सकाळचे ते गृहस्थ आले..आता सा-यांना समजले ते कुणीही सामान्य गृहस्थ नसून प्रत्यक्ष नारायणच होता...आपल्या सद्गुरुंच्या बोलावण्यावर प्रत्यक्ष भगवंत धावला...त्यांच्यामुळे आपल्या हातचे अन्न सेवन केले..केवढी थोर महती सद्गुरुंची..धन्य धन्य..अशा थोर सद्गुरुंच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम....
रामवाडीत अनेक घटना घडत अनेक अनुभव, अनेक दाखले..हे सारे भक्त नित्य अनुभवत असत..एकदा असेच सद्गुरु स्वतः शेतात हरभरे काढत होते..एवढ्यात एक गृहस्थ तेथे आला..व त्याने सद्गुरुंचे पाय धरले..व म्हणाला “ माझ्याकडून घोर अपराध घडला आहे...आपण मला क्षमा करावी..मी अपराध केला आहे पण मला आता पश्चात्ताप होत आहे..तेंव्हा मोठ्या मनाने आपण मला क्षमा करावी माझ्याकडून असा अपराध पुन्हा घडणार नाही....” असे म्हणून तो पुन्हा पुन्हा सद्गुरुंच्या चरणांवर डोके ठेवू लागला..तेंव्हा त्याचे हे बोलणे ऐकून सद्गुरु हसून त्याला म्हणाले..” अरे चौर्य कर्म सोडून सज्जनांच्या संगतीत राहा.....तुला हवे ते तू माझ्याकडे माग त्यासाठी चोरी का करतोस??” आणि आता...हे पश्चात्तापी रुदन तू का करत आहेस हे जरा सांग सगळ्यांना..त्यांनाही कळू दे तुझी कर्मकहाणी..तो हात जोडून सांगू लागला “ रात्री दोन वाजता आम्ही दोघांनी सद्गुरुंच्या शेतातून ज्वारी चोरली व ती चोरलेली ज्वारी शेजारच्या शेतात लपवून ठेवली व घरी गेलो.....घरी गेल्यावर भार्येस मी ही गोष्ट सांगितली....तेंव्हा माझी भार्या अत्यंत क्रोधित झाली...व म्हणाली “ तुम्ही फार मोठी चूक केली आहे...जे संत सज्जन दुस-याचे पोट भरण्यासाठी स्वतः कष्टून पीक पिकवतात..व हजारो लोकांचे पोट भरतात त्यांच्याच शेतात तुम्ही चोरी केली तुम्ही लवकर जा आणि त्या महात्म्याची क्षमा मागा..” धर्मपत्नीचे हे बोलणे मलाही मनोमन पटले..व उपरती होऊन मी क्षमा मागण्यास धावलो..” सद्गुरु त्याला हसून म्हणाले... “ अरे माझी काय क्षमा मागतोस..मंदिरात जाऊन त्या दत्ताची क्षमा माग..तो जगद्नियंता आहे..सारे काही तो जाणतो आणि पाहतही असतो..त्याच्यापासून काही लपत नाही..” सद्गुरुंचे हे बोल ऐकताच तो दत्त मंदिरात धावला..त्याने डोळे मिटून त्या त्रिमुर्तीस वंदन केले..डोळे उघडून पाहतो तो काय!!!! दत्तमुर्तीच्या ठिकाणी त्याला साक्षात सद्गुरु दिसले..व हात उंचावून त्यांनी त्यास क्षमा केली..हे आनोखे दृश्य पाहताच त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रुधारा वाहू लागतात..तो बाहेर येऊन पाहतो तो काय सद्गुरु शेतात आपल्या कामात निमग्न असतात..तो धावत जाऊन सद्गुरुंचे चरण वंदन करतो व म्हणतो.. “ तुम्ही साक्षात भगवंत आहात..आता तुमच्या चरणांपासून मला वेगळे करु नका..आता माझे सारे जीवन या चरणासी अर्पण..”
“ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!!!!, श्री.समर्थ सत्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!!!”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा