श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय अठरा

अध्याय अठरा...
सद्गुरु रामावाडी अश्रमात मुक्कामास होते....अनेक शिष्य  सद्गुरुंच्या चरणसेवेत निमग्न असत....सद्गुरुंची सेवा हेच आता जीवनाचे ध्येय असे मानून अनेकजण समर्पित भावनेने सद्गुरुंच्या सहवासात अश्रमातच मुक्कामास राहत होते..अशाच अनेक शिष्यांपैकी एक होते श्री. दत्ता पाटील खसगीकर..महाराजांचे परमभक्त..सद्गुरुंच्या चरणी अत्यंत दृढभाव..आणि त्यांचे सुपुत्र श्री. किसनराव हेही अगदी पित्यासम सद्गुरुंच्या सेवेत धन्यता मानत..उमरगा ग्रामी ते मुक्कामास होते..व छाया चित्रण हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन..परंतु त्यांचे मनही नित्य सद्गुरुचरणी धाव घेई...प्रपंचात राहूनही ते मनी नित्य सद्गुरुंना ध्यात असत..प्रपंची राहून ते परमार्थ साधत होते..व नित्य सद्गुरु सेवेत सादर असत..श्री. दत्ता पाटील हे स्वतः सद्गुरुचरणी लीन होते व स्वतःस सद्गुरुसेवेस वाहून घेतले होते परंतु आपल्या पुत्राने केवळ उत्तम प्रपंच आधी करावा असेच मनोमन त्यांना वाटत होते..परंतु त्यांचे पुत्र सद्गुरु चरणी धन्यता मानत होते..आपणांस केवळ एकच पुत्र आहे..आणि त्यानेही असे स्वतःचे जीवन परमार्थास वाहून घेऊ नये तर आधी प्रपंची लक्ष घालावे..प्रपंच नेटका करावा..असेच त्यांना वाटत होते व याच भावनेने ते उद्विग्न असत..सद्गुरुंनी दत्ता पाटलांच्या मनीची ही भावना जाणली..भगवंत नेहमीच आपल्या भक्ताच्या अंतरीचे भाव जाणतोच..ते स्वतःच दत्ता पाटील यांना म्हणतात..” पाटील का व्यर्थ चिंता करत आहात..अहो. कर्ता करविता तो भगवंत आहे..तोच सारे ठरवतो...आपण तर फक्त त्याच्या इशा-यावरच चालतो..खरा सुत्रधार तर तोच आहे..कोणी काय करायचे, कसे करायचे हे सारे त्याने आधीच ठरवलेले असते..आणि आपल्याकडून तो फक्त करवून घेत असतो..तुम्ही तर मला म्हणाला होतात की..माझा सुत मी तुमच्या चरणी समर्पित करतो..तुम्हीच त्याचे तारणहार..आठवा तुमचे ते वचन... मग असे व्यथीत का होता??”
सद्गुरुंच्या या वचनांनी दत्ता पाटील यांचे अंतःकरण प्रकाशमान होते..सारे मळभ संपून जाते आणि त्यांच्या लक्षात येते की, एवढे समर्थ सद्गुरु आपल्या पाठीशी असतानाही आपण का असा विचार करत होतो..ते सद्गुरुंच्या चरणावर दंडवत घेतात व म्हणतात “ तुम्हीच माझ्या मनात प्रकाश पाडला..आता मला कसलीही चिंता नाही..मी कायम अशीच आपल्या चरणांची सेवा करीत राहीन...”
किसनराव हेही गुरुसेवेत नित्य मग्न असत..अनेक देवदेवतांची चित्रे काढून ते महाराजांना दाखवत असत..निरनिराळ्या मुर्ती घडवणे हाही त्यांचा एक आवडता छंद होता..अतिशय सुबक मुर्ती ते बनवित असत....उमरगा ग्रामी एक आश्रम बांधावा व तिथे दत्त चरणांची स्थापना करावी अशी त्यांची खूप इच्छा होती..एकदा ते धाडस करुन सद्गुरुंच्या समोर ही आपली इच्छा बोलून दाखवतात..त्यांच्या मनीचे निर्मळ भाव व अंतरीची तळमळ बघून सद्गुरु त्यांना तसे करण्यास अनुमती देतात..
मग ते आश्रमासाठी सुंदर मुर्ती व पादुका बनवतात व दोन्ही आपल्या घरीच ठेवतात...कारण आश्रम बांधण्यासाठी अर्थिक अडचण येत असते..तेंव्हा ते गोव्याहून स्फोटके आणत व विहीर खोदण्यासाठी ते वापरले जात मग ज्यांना विहीर खोदायची असेल ते त्यांच्याकडून ते विकत घेऊन जात असत..
एकोणीसशे बाहत्तर साल असेल ते अचानक दुष्काळ पडला..पाण्याची तीव्र कमतरता भासू लागली आणि मग सामूदायिक कुप खोदण्यासाठी किसनरावांकडून लोक स्फोटके विकत घेऊ लागतात..या विक्रीतून आलेले धन ते आश्रमासाठी साठवतात..व एक सुमुहुर्त गाठून उमरगा आश्रमाची स्थापना होते..जेंव्हा मनात अत्यंत निर्मळ इच्छा असते..तेंव्हा सद्गुरु ती इच्छा पूरी करतातच....एकदा सद्गुरु आपल्या कांही भक्तांसोबत मुगळखोडला आपल्या गुरुंच्या दर्शनासाठी निघतात..मजल दरमजल करत वाटेत ते एका ग्रामी पोचतात..बरीच रात्र झालेली असते म्हणून ते तिथेच एका शेतात मुक्काम करण्याचे ठरवतात..उन्हाळ्याचे दिवस असतात..सारे भक्त घामाघुम झालेले असतात..तहानेने व्याकुळही असतात...जल प्राशून तृषा शांत करावी असे त्यांना वाटत असते.. सद्गुरु हे ओळखतात..व ज्या शेतात ते थांबलेले असतात त्या कृषीधारकास ते विनंती करतात व म्हणतात “ माझे सारे भक्त खूप थकले आहेत व तहानेने व्याकुळ झाले आहेत तेंव्हा तुमच्या विहीरीतील जल काढून माझ्या भक्तांची तहान भागवाल का?”
तो शेतकरी अतिशय विनम्रतेने म्हणतो “ महाराज उन्हाळ्याचे दिवस आहेत माझ्या विहीरीत थेंबभरही पाणी नाही..इथून कोसावरच गाव आहे..तिथून मी तुमच्यासाठी जल घेऊन येतो..तोवर तुम्ही थोडा आराम करा...”
सद्गुरु त्यांस म्हणतात “ तुझ्या विहीरीत जल आहे..मग कशाला गावाकडे जातो..”
पुन्हा तो कृषीवल काकुळतीस येऊन बोलतो “ महाराज माझी विहीर कोरडी ठणठणीत आहे..मी आता गावाकडे जाऊन पाणी घेऊन येतो..”
तरीही सद्गुरु त्यांस म्हणतात “तू पोहरा घेऊन त्वरीत जा..आता तहानेने जीव व्याकुळ होत आहे..व्यर्थ वेळ दवडू नकोस..”
आता तो सद्गुरुंना नकार देऊ शकत नाही तसेच पोहरा घेऊन तो विहीरीकडे जातो..तसाच पोहरा विहीरीत सोडतो त्याला माहित असते विहीरीत थेंबभरही पाणी नाही..त्यामुळे तो मनातून अत्यंत दुःखी झालेला असतो..दारी एवढे संत सज्जन आलेले आहेत आणि आपल्या विहीरीत थेंबभरही पाणी नाही ही कसली परिक्षा आहे..पोहरा खडकांना आपटत आपटत तळाशी पोचतो..तेवढ्यात स्फोटकासारखा आवाज येतो..व विहीरीतून धूळीचे लोट बाहेर येतात..तो घाबरुन पोहरा माघारी खेचतो..पोहरा पाण्याने भरलेला असतो..तो अत्यंत भयभीत झालेला असतो तसाच धावत तो सद्गुरुंकडे येतो..व सारा वृत्तांत त्यांना सांगतो..सद्गुरु त्यांस म्हणतात “ तू असा भयभीत होऊ नकोस तू तर आमची तहान भागवण्यास जल आणलेस..आम्ही तृप्त झालो..सारे पोटभर जल प्राशन करतात...व तेथेच निद्रीस्त होतात..अजूनही तो शेतकरी मनातून साशंक आसतो..पोह-यात पाणी कसे आले हे काही त्याला कळत नव्हते..म्हणून दिवस उजाडता क्षणी तो धावत आधी विहीरीकडे जातो..पाहतो तर काय विहीर शुद्ध नितळ पाण्याने काठोकाठ भरलेली असते...तो मनोमन जाणतो हे संत कोणी सामान्य नाहीत..तो धावतच जाऊन सद्गुरुंच्या चरणांवर लोटांगण घेतो..व म्हणतो “ महाराज आपण धन्य आहात..मी पेलाभर पाणी आपणांस दिले ..आपण मला भरभरुन दिले..मी आपला आजन्म ऋणी राहीन.......आपले दर्शन झाले माझ्या जन्माचे सार्थक झाले..हा हस्त मस्तकी आसाच कायम राहू द्यावा..” असे म्हणून तो पुन्हा पुन्हा सद्गुरु चरणी लोटांगण घेतो....सद्गुरु त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्यांस अनुग्रहित करतात..
“ धन्य धन्य ती गुरु माऊली, राहो सदा तयांची कृपा सावली..”

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!! श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय..!!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या