मनोगत

प्रस्तुत ग्रंथात दिलेला सर्व विषय, सद्गुरू काशिनाथ महाराज यानी वेळोवेळी केलेले उपदेष व त्यांचे महान विचार, प्रवचन, कीर्तन, भजन, गुरूमाउलींच्या मुख कमलातुन प्रस्तुत झालेले विषय, सर्व एकत्र करून, लेखकाने ग्रंथ रूपाने प्रसिध्द केला आहे. महाराजांच्या कृपा  आशिर्वादाने भाविक भक्त व शिष्यवृंद या सर्वाना हा ग्रंथ बहुमूल्य व उपयुक्त आहे. महाराजांचे सखोल ज्ञानाचे भांडार, या ग्रंथात सामावलेले आहे. भक्तांना या ग्रंथाच्या आधारे अनेक विषयानुसार, दृष्टांत व सिध्दांत दिले आहेत. आध्यात्मिक साध्या व सोप्या विषयावरून, पायरी पायरीने तत्वज्ञाना पर्यंत बरेचसे विषय यामध्ये सामावलेले आहेत.  सामान्य स्त्रि व पुरूष भक्ताना गुरूभक्ती मार्गाचे ज्ञान सहज प्राप्त होते. गुरू भक्ती मार्गाने, या मायावी संसाराच्या संवेदनेतून सहजपणे ज्ञानमार्गाने जाऊन सुख दुःखाच्या अनेक आपत्तीना धैर्याने तोंड देवून जीवनमुक्त होण्यासाठी अनेक मंत्र व जप नामस्मरण़ = प्राणायाम  वगैरे प्राकृतिक उपाय या ग्रंथात दिले आहेत. 
         इ. सन. 1952 पासुन महाराजांच्या सत्संगतीत राहून, संग्रह केलेले महाराजांचे महान विचार भक्तांच्या कल्याणार्थ प्रगट करण्याची प्रेरणा, ही लेखकाला गुरू माउलीनी प्रदान केली. महाराजांची महान कृपा अंतःकरणात प्रवेषून पदरात घेवून वेळोवेळी या अज्ञान पामराला अंतरध्वनीद्वारे सांगत राहिले. इथे मात्र लेखक निमित्तमात्र असून गुरू माउलींच्या चरणी एक सुक्ष्म अणु रेणुवत सूक्ष्म कण आहे. तरी वाचक व षिष्य वृंद यांनी या ग्रंथाचे श्रवण पठण करावे व ज्ञानाच्या सान्निध्यात जाऊन पोहचावे. व महाराजांच्या कृपा आशिर्वादाने या नरदेहाचे कल्याण करून घ्यावे. गुरू भक्ती मार्गाने आत्मनिश्चयात जाऊन, पोहचावे इथेच सर्व सामान्य भाविक भक्तानी संकल्प करावा. हेच गुरू भक्तीचे मुळ आहे. जिवाच्या आत्मकल्याणाच्या महान मार्गाने वाटचाल करीत रहावे. महान मार्ग म्हणजेच गुरू भक्तीयोग, याच मार्गाने मार्गक्रमण करीत राहून सद्गुरुंचे अंतिम ध्येय, पूर्ण करावे हीच सत्य व निष्काम गुरू भक्ती आहे.
जय गुरूदेव.
       अखंडमंडलाकारमं व्याप्तं येन चराचरम्।
         तत्पदं दर्षितं येन तस्मै श्रीगुरूवे नमः ।।
            ।।   ॐ कल्याणमस्तुः ।।

टिप्पण्या