अध्याय अकरा..
सद्गुरु हे नेहमी आपल्या शिष्याच्या मनीची इच्छा पूर्ण करतात..त्याची काळजी घेतात..जे भोग नशीबी असतात ते चुकत नाहीत पण त्याची तिव्रता ते निश्चितच कमी करतात..आणि ते सोसण्याची शक्ती प्रदान करतात.....तळहाताच्या फोडाप्रमाणेच ते आपल्या शिष्यांना जपत असतात..
आरळी ग्रामीच्या यशवंतराव कुलकर्णी यांचे कनिष्ठ चिरंजीव गोपाळ यांना अचानक अपस्मारीची व्याधी जडते..यामध्ये ते अचानक मुर्च्छा येऊन जमिनीवर पडत असत..शरीर पिळवटून टाकणा-या या आजाराने ते अत्यंत त्रस्त होते....यशवंतराव त्यावर अनेक उपचार करत होते..पण रोगनिदान होत नव्हते व काही उपचारही साधत नव्हते..त्यामुळे सारेच त्रस्त होते..एवढ्यात कुलकर्णी वाड्यात सद्गुरुंचे आगमन होते..जणू शिष्यांच्या मनीची हाक त्यांच्यापर्यंत पोचलेली असते..आणि भगवंत नेहमी आपल्या भक्ताच्या हाकेला धावतोच..सद्गुरु आलेले पाहून सारे आनंदित होतात..पूजा विधी पार पडल्यानंतर यशवंतराव मनोभावे महाराजांना वंदन करतात..यशवंतरावांच्या चेहे-यावरची चिंता महाराजांना स्पष्ट दिसते व ते त्याचे कारण त्यांना विचारतात..सद्गुरुंनी मायेने विचारल्यामुळे बापूही सद्गदित होतात व गोपाळाच्या व्याधी बद्दल महाराजांना सांगतात..व म्हणतात “महाराज बरेच उपाय केले पण आजार काही बरा होत नाही..मुर्च्छीत अवस्थेतील गोपाळाची तडफड पाहवली जात नाही काय करावे सुचत नाही..”
सद्गुरु बापूंना समजावतात “ अहो बापू हे कर्मभोग आहेत...ते भोगल्याशिवाय सुटका नाही..पण तुम्ही का काळजी करता आपला दत्त आहे ना तो काहीतरी मार्ग काढेलच...तुम्ही फक्त त्याच्या चरणी दृढभाव ठेवा..”
महाराजांच्या या शब्दांमुळे बापूंना शांत वाटते..काहीतरी उपाय निश्चित सापडेल अशी आशा वाटते..
दुस-या दिवशी महाराज वाफंदीतील विहीरीवर स्नानासाठी निघतात..सोबत ते गोपाळांसही घेतात..पण इतर भक्तगण महाराजांना सांगतात..”महाराज गोपाळास सोबत घेऊ नका...त्यांस आपस्मारी आहे...आणि या आजारांस पाण्याशी वैर असते..पाणी पाहताच व्याधी अधिक बाळावते..तेंव्हा त्यांस नकोच..”
यावर महाराज हसून बोलतात “ दत्तचरणी दृढ भाव ठेवा..काहीही विपरीत होणार नाही..तो रक्षणकर्ता असल्यावर कशाचे भय मनी बाळगता..निर्भय होऊन चला काहीही होणार नाही...”
विहीरीजवळ गेल्यावर महाराज गोपाळास पाण्यात उडी घेण्यास सांगितले व स्वतःही त्यांच्यासोबत विहीरीत उडी घेततली...व गोपाळाच्या पोटाखाली हात घालून सद्गुरु गोपाळासमवेत कितीतरी वेळ पोहत होते..अपस्मारीच्या आजारास वैरी असणारे पाणी आज गोपाळांस काहीच करु शकत नव्हते..साक्षात भगवंत सोबती असल्यावर कोणता आजार राहिल....सारेच भक्तजन आचंबित होऊन ते दृश्य पाहत होते..आणि सा-यांनी जोरात महाराजांच्या नावाचा जयजयकार केला... “ श्री. सतचिदानंद सद्गुरु श्री. काशीनाथ महाराज की जय...” धन्य धन्य ती गुरुमाऊली..
असेच एकदा महाराजांनी माधवरावांना म्हणजेच बाळप्पांना बोलावले व म्हणाले “ लच्छान ग्रामी जाण्याची आमची खूप इच्छा आहे..ते आमच्या आजेगुरु श्री. सिद्धलिंग स्वामींचे स्थान..तिथे जाऊन त्यांच्या समाधीवर नतमस्तक होण्याची मनिषा आहे..तुम्ही आमचे जन्मोजन्मींचे परमभक्त..चला तुम्हांसही दर्शन घडवतो..ते पवित्र ठिकाणा जन्मात एकदा तरी पहावेच..तिथे जाऊन जीवन पावन होते..”
माधवराव तर तयारच होते ते महाराजांस म्हणाले “ तुम्ही म्हणाल तिथे मी आपल्यासोबत येईन..आपल्यासोबत श्री. गुरुंच्या पवित्र समाधीचे दर्शन घडणार असेल तर त्यासारखे दुसरे पुण्य कोणते...आपला सहवास लाभणार हेच माझे जन्मोजन्मीचे संचित..”
त्यानंतर माधवराव व सद्गुरु मार्गक्रमण करीत लच्छान ग्रामी पोचतात..समाधीपाशी पोचल्यावर सद्गुरु सद्गदित होतात..जणू एखादे पाडस आपल्या मातेला भेटत आहे असेच वाटते....ते मनोभावे समाथीवर नतमस्तक होतात..हे दृश्य पाहून माधवरावांच्याही नयनात अश्रु येतात...तेही मनोभावे समाधीचे दर्शन घेतात..त्यानंतर ते दोघेही एका बारवे पाशी येतात..खूप मोठी अशी ती बारव असते....त्यामुळे पाणीही भरपूर असते..पाहिले की डोळे फिरावेत एवढी मोठी बारव असते ती..महाराज स्नानासाठी आत विहीरीत उतरतात सोबत माधवरावही असतातच..महाराज अशी काही डुबकी घेतात की दोघेही झटक्यात तळाशी पोचतात..तिथे अनेक जलचर असतात..पण सोबत सद्गुरु असल्यामुळे माधवरावही अगदी निर्भय होऊन सद्गुरुंसवे चालत असतात..सद्गुरुचरणी दृढभाव असला की मग कशाचे भय..तेवढ्यात त्यांना एक तेजोमय मुनी तपःसाधना करत असलेले दिसतात..सभोवती आपार तेज पसरलेले असते..एवढे अपरंपार तेज माधवरावांच्या डोळ्यास सहन होत नाही ते पटकन आपले नयन बंद करुन घेतात..हे पाहून सद्गुरु तत्क्षणी त्यांच्या मस्तकावर हात ठेवतात..व सांगतात की आता आपणांस दिव्य दृष्टी दिली आहे..आता आपले नयन उघडा..बाळप्पा हळूवार नयन उघडतात पाहतात तर काय समोर साक्षात दत्तात्रेय..तीन शिरे, सहा हात..केवढे विलोभनीय रुप ते..बाळप्पा केवळ विस्मीत होऊन जोडून उभे राहतात..आपल्या शिष्याला साक्षात दत्तात्रेयाचे दर्शन घडवणारे धन्य ते सद्गुरु..आणि त्यांचे परमभक्त होण्याचा मान मिरवणारे धन्य ते बाळप्पा..आता सद्गुरु पुन्हा बाळप्पास सांगतात आता हळूवार नयन बंद करुन पुन्हा उघडा..आणि तसे करताच ते पुन्हा मठात येऊन पोचलेले असतात..
एका श्रावणमासांत सद्गुरुंना दृष्टांत होतो....रामवाडी गावांत एक प्राचीन दत्तमंदीर आहे...ते मंदीर हजारो वर्ष प्राचीन आहे..पण आता त्याठिकाणी खूप तृण वाढून जंगलच निर्माण झाले आहे..ज्या स्थानी नृसिंह सरस्वतींच्या अवतारात त्रिविक्रमभारतीला त्रिमुर्तींच्या रुपात दर्शन दिले तेच हे स्थान..त्याठिकाणी त्यांच्या पाऊलखुणाही उमटलेल्या आहेत..त्याच ठिकाणी हे मंदीर आहे..तिथे अरण्य असल्यामुळे अनेक वनचर मुक्त संचार करत आहेत..आणि त्यामुळेच कोणीही जन त्याठिकाणी जाण्यास धजावत नसे...स्वप्नात ते मंदीर पाहून सद्गुरु मनोमन काहीतरी विचार करतात व ताबडतोब माधवरावांना निरोप पाठवतात...सद्गुरुंची आज्ञा असल्यामुळे माधवराव धावतच महाराजांकडे येतात..तातडीने बोलावण्याचे कारण विचारताच महाराज प्रथम त्यांना त्रिविक्रम भारतीचे चरित्र विस्तारुन सांगतात..
त्रिविक्रमभारती हा एक परमभक्त होता...तो नृसिंहाचा उपासक होता...नृसिंहाशिवाय तो कोणालाही भजत नसे पण नृसिंहाठायी त्याची दृढ श्रद्धा होती..तो मनोभावे नृसिंहाची भक्ती करत असे....आणि म्हणूनच तो नृसिंह सरस्वतींची निंदा करीत असे...परंतु नृसिंह सरस्वती मनोमन जाणून होते याची नृसिंहाप्रती दृढ भक्ती आहे पण मनात अहंभाव भरला आहे..मग ते ठरवतात की याची उपरती यास व्हायलाच हवी..एके दिवशी त्रिविक्रमभारती मानसपुजा करीत असतो..पण त्याच्या मनःपटलावर नृसिंहाची मुर्ती काही स्थिर होत नसते..त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याचे मन अस्थिरच असते....त्याला मनोमन वाईट वाटते..आतापर्यंत केलेली तपसाधना व्यर्थ गेली असेच वाटते...तो चिंतेत बसलेला असतो..दुरुन नृसिंह सरस्वती येत असतात...त्यांना कळते की याचे चित्त स्थिर नाही...त्रिविक्रमभारती त्यांच्याकडे पाहतो तर काय साक्षात नृसिंह त्याला श्रीगुरुंच्या ठिकाणी दिसतात..तो चरणस्पर्शासाठी धावतो तर क्षणार्धात ते दंडधारी यतीरुपात दिसू लागतात..हे पाहून त्रिविक्रमभारती भ्रमित होतो त्याची चूक त्याला उमगते...तो श्रीगुरुंच्या चरणांवर माथा ठेवतो व म्हणतो “मला क्षमा करा...तुम्हीच ब्रम्हा, विष्णु आणि महेश आहात...तर तुम्हीच नृसिंह आहात..माझे चक्षु तुमचे हे रुप ओळखू शकले नाहीत..जगत्उद्धारासाठीच आपण हे यतीरुप धारण केले हे मला कळालेच नाही..तरी आपण साक्षात त्रिमुर्तीच्या रुपात दर्शन देऊन माझे जीवन धन्य केले..असे कितीतरी वेळ तो नृसिंह सरस्वतीचे स्तोत्र गात राहतो...”
सद्गुरु बाळप्पास सांगतात...” ज्याठिकाणी त्रिविक्रमभारतीस विश्वरुप दर्शन झाले तेच हे स्थान या ठिकाणी एक प्राचीन दत्त मंदीर आहे..त्याचे दार भक्कम आहे...जन्मोजन्मी तुम्हीच माझे परमभक्त आहात...तुम्हीच भारती आणि तुम्हीच बाळप्पा आता तुम्हीच हे दार उघडून हे स्थान सर्वांसाठी खुले करा...”
महाराजांच्या या आज्ञेने सद्गदित झालेले माधवराव पुढे होऊन दार उघडतात...त्यांचा हस्तस्पर्श होताच दार चटकन खुले होते..सारे भक्त महाराजांचा जोजोरात जयजयकार करतात “ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!! “
आपल्या भक्तांस प्रत्येकवेळेस प्रथम मान देणारे असे सद्गुरु धन्य धन्य...त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम....🙏🏻🙏🏻🌹🌹
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा