९. अमृतोपदेष.
श्री समर्थ सद्गुरु काशिनाथ महाराज म्हणतात जे काही जाणायचे आहे ते ओळखण्यासाठी जाणण्यासाठी ज्ञान पाहीजे. तो सर्व परमेश्वर जाणता आहे, तोच जाणतो. मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाजही भगवंताला ऐकू येतो, असे सद्गुरु काशिनाथ महाराज निक्षुन सांगतात. त्या घुंगराच्या वाजनाचा आवाज परमात्म्याला ऐकू येतो. तर त्या घुंगराचा अंतरात्माही परमात्माच आहे तोच आहे. पण त्याला हा मानवप्राणी ऐकू शकत नाही, कारण सर्व सामान्य ज्ञाता - ज्ञान - ज्ञेय इत्यादी व्यवहार एकमेवाद्वितीय परमात्म्यात संभवत नाहीत. त्याला दृष्टा (दाखविणारा) दृष्टे (महानपुरूष) सर्वांचे आदिकारण व सर्वात श्रेष्ठतम व महान मानतात. हा लहानाहून लहान महानाहुन महान असा परमात्मा आपल्या सर्वांच्या अगदी निकट (जवळ) आहे. या देहात सुक्ष्म जीवतत्वाने लपलेला आहे.
पण तो आपण अनुभवू शकत नाही. कारण आपण अनेक प्रकारच्या भोग वासनेने गुरफटलेले आहोत, ऐहिक सुखोपभोगात तन्मय झालेले आहोत. जेंव्हा आपण आपले जिवन सुखोपभोगातुन अलिप्त करून, ऐहिक सुखाचा त्याग करून, प्रभुच्या नामात तल्लीन होऊन, नामाचा रसस्वाद घेत राहुन, गुरूमाउलींच्या चरणी सर्व भावे, अनन्य भावे शरण जाऊ व सर्व संग परित्याग करून सत्संगात अहर्निश ठेऊन नाम घेत राहतो. संसार सुखोपभोग ऐश्वर्य व अनेक सुख दुःख परमात्म्याला समर्पण करून सर्व संग परित्याग करून, हेच ब्रिद सत्य समजुन संकल्प केला जातो व तो संकल्प पुर्णत्वाप्रत नेऊन त्याचा शेवट करतो तो त्या परमात्म्याला जाणु शकतो व पाहु शकतो. त्यागानेच परमेश्वराचा लाभ होतो. किंचीतही वासना राहीली तर भगवंताची भेट होत नाही, त्यांचे दर्शन होत नाही किंवा भगवंत शक्तीचे आकलन होत नाही व सत्य सुख लाभत नाही, हा शास्त्र पुराणाचा व महापुरूषांचा सिध्दांत आहे.
श्री गुरू कृपेने तो त्याला पाहण्यास त्याचे सत्य रूप जाणण्यास समर्थ होतो. प्रभु एक मात्र सत्य आहे, हे जगत भासमान असुन क्षणभंगुर आहे, ब्रम्ह शक्तीच एकमात्र सत्य आहे. त्याच सत्यत्वावाचुन या भासमान विश्वब्रम्हांडाचे स्वरूप (प्रतिबिंब) भासित होते. उदाहरणार्थ - माझे नाव रामराव आहे मी माझे प्रतिबिंब आरशात पाहतो पुर्ण शरीर स्पष्ट दिसते. जसे आहे तसे दिसते, पण मी म्हणजे रामराव वेगळा आहे आणि आरशात दिसणारे रामरावचे प्रतिबिंब आहे. आरशात न दिसणारा रामराव सत्य आहे पण आरशात दिसणारा रामराव सत्य नसुन प्रतिबिंब आहे. तद्वतच ब्रम्ह सत्य असुन जगत् भासमान प्रतिबिंबित आहे मिथ्या आहे. तसेच ब्रम्ह सत्य असुन जगत् मिथ्या आहे. एक ब्रम्हांड नव्हे तर अनंत कोटि ब्रम्हांड नायक असा तो परमात्मा परम पवित्र निर्गुणातीत पर आणि अपर परमात्मा (आत्मा) आहे पर म्हणजे दुसरा आणि आत्मा दुसरा - म्हणजे अंतरात्मा. म्हणुन या पंचमहाभौतीक मानवाच्या देहात खुप खोल अंतरावर (अंतरात्मा) नावाने (जीव या रूपातुन) या पिंड देहात वास्तव्याला काही वेळेपुरता आलेला आहे. तोच परमात्मा अन्य कोठे नसुन याच देहात देह मंदिरात विराजमान आहे.
नोट - वरील विषय फार खोल आहे तो वाचकानी तेवढया खोल जाऊन गुरूंना स्मरून वाचावा व त्याचा खोल अर्थ गुरूंच्या आशीर्वादानेच ग्रहण करावा किंवा लेखकाच्या विचारात सहमत व्हावे.
लेखक.
संत कबीरदास निक्षुण सांगतात.
भगवान कंहा है वह मंदिर मे नही ।
कंहा है उसमे पाणि पथ्थर ।।
भगवान उसमे है नही ।
वह भक्तोंके घर बस रहा है ।।
जेथे भक्त, तेथे भगवंत.
तेथे निष्काम भाव, तेथे भगवंत.
जेथे सत्य कर्म, तेथे भगवंत.
जेथे ज्ञान, तेथे भगवंत.
जेथे सत्संग, तेथे भगवंत.
जेथे धर्म, तेथे भगवंत.
जेथे शुध्द कर्म, तेथे भगवंत.
जेथे भाव, तेथे भगवंत.
जेथे मातृ पितृ सेवा, तेथे भगवंत.
जेथे अखंड नाम, तेथे अखंड भगवंत.
जेथे गुरू भक्ती, तेथे सदैव भगवंत.
जेथे दया क्षमा शांती. तेथे सद्गुरु माउलींचा अशिर्वाद.
इस देहरूपी मंदिरमे भगवान का दर्शन करे, नित्य करे, स्वयं करे, विनाकष्ट करे. मत जाय काशी मथुरा, मत करो चारोधाम. इस मुख कमलोंसे अखंड बोलो, चलने दो हरिनाम. ध्यान लगादो गुरू चरणोमें, संकल्प करो हरीनाम, यही गुरूदेव का आशीर्वाद है. मिल जाय मुक्ती धाम, मंत्र बोलो मुख कमलेांसे
🕉 .नमः शिवाय नमः शिवाय .
जपत जाय इस नामको सार्थक हो जाय जिवनका, आखरी है साथी नाम, काशिनाथ प्रभु गुरूदेवका, दर्शन ले लो श्री गुरू चरणोंका, गुरू चरणोंमे चारो धाम है. ऐकेबिस है स्वर्गके द्वार, ऐकेबीस बार 🕉 का प्रणव करे बार बार. गुरू सिध्दलिंग, गुरू यल्लालिंग का आशीर्वाद है, मिल जाय प्रभु का द्वार.
कहत है गुरू काशिनाथ बारबार नाम है अमृत का पान.
श्री गुरूमाउली.
🕉.यौगेश्वराय यौगाय यौगाधीपतये युगे ।।
यौगीणे यौगरूपाय यौगजाय नमोः नमः ।।
।। प.यो.सु 7/22 ।।
योगमार्ग हा फार पुरातन काळापासुन महान पतंजली महर्षिंच्या कृपा आशीर्वादाने या पवित्र व पुण्यतम् पावन भारत भुमीत आज तागायत चालत आलेला आहे. महान महर्षिंच्या मुखकमलातुन आलेला एक महान प्रवाह आहे. योग प्रवाहाच्या सुक्ष्म लहरीत प्रवेश करता क्षणीच मानवप्राणी योग मार्गाच्या अभ्यासाने योग करीत राहीला तर तो जिवन निरोगी ठेऊन सुखा समाधानात दिर्घायुषीचा लाभ घेतो व उत्साही बनतो. पतंजली योग सुत्र हेच सांगते, योग नित्य नैमित्तिक आचरणात आणा, सदा सर्वदा यौगात रहा योग म्हणजे यौगा - योग - योग आल्या शिवाय काम होत नाही. म्हणजे त्याची वेळच यावी लागते. तेंव्हाच कार्य होते. या सर्व गोष्टीसाठी योग यावा लागतो. काळ आणि वेळ यावी लागते. तरच कार्य पार पडते. उदाहरणार्थ गुरूभक्ती योगः- गुरूंचा मंत्रोपदेष मिळण्याचा योग. परमार्थ प्राप्ती योग, भगवत दर्शनाचा योग, कोणतेही कार्य करण्याचा योग आल्याशिवाय कार्य होत नाही. समजा योगायोगाने गुरू भेट होऊन मंत्रोपदेश मिळाला व गुरूनी शिष्याला मंत्रदिक्षा देऊन कृतार्थ केले. व शिष्य गुरूनी दिलेला उपदेश स्वच्छ विसरला तर याला यौगायोग कसा लाभणार. योग आला गुरू लाभले. महामंत्राचा आलभ्य लाभ झाला आणि नामस्मरण घेण्याचा योग नाही. याचे एकच कारण म्हणजे विस्मृती. म्हणजे योग आला पण काळ आणि वेळ आली नाही. जेंव्हा स्मृती जागृत ठेऊन जे कार्य केले जाते तेंव्हा योग येतो. काळ आणि वेळ पण येते. गुरूकडुन जेंव्हा मंत्रोपदेष मिळतो त्याक्षणी स्मृती जागृत ठेवावी लागते. स्मृती आणि स्मरण वृत्तीत लिन झाली पाहीजे, तेंव्हाच योग येतो. आणि बिज मंत्राचा अखंड प्रवाह संथपणे प्रवाहित येतो. एकदा का नदीला पुर आला की तो जल प्रवाह सतत चालु रहातो, तो मध्येच बंद पडत नाही. तद्वतच त्या गुरूज्ञान रूपी प्रवाहात वाहत राहणे म्हणजे योग अखंड खंड न पडता अखंड नामस्मरणात रहाणे म्हणजेच योगः - आणि याच नामरूपी अमृत वर्षावात योग, याग, जप, तप इत्यादी कर्मे सर्व श्रेष्ठ आहेत. योगमुक्त प्राणायाम हे पतंजली महर्षिंनी जगाच्या संरक्षणार्थ अत्यंत परिश्रमातुन निर्माण केलेली आहेत. ती महान असुन प्रत्येक मानव प्राण्यांना अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती करून सुखी जिवन जगता यावे व रोग मुक्त होऊन दिर्घायुष्य लाभावे यासाठी सर्वश्रेष्ठ विद्या म्हणजे प्राणायाम प्रत्येक मानव प्राण्याना प्राणायाम हा फार मोठे वरदान आहे. प्राणायामाच्या आभ्यासाने प्राण - अपाण - व्याण - समाण - उदाण या पंचप्राणाचे संरक्षण होते, शरीर निरोगी व बलवान बनते. प्रकृतीच्या सर्व व्याधी नष्ट होतात. सुखी जिवन जगण्याची प्राणायाम ही फार मोठी शक्ती आहे. प्राणायामाचे भिन्न भिन्न प्रकार श्री सद्गुरु काशिनाथ महाराज यानी निरूपन केलेले आहेत. ते लेखकाने महाराजांचे चरित्र भाग 2 मध्ये सविस्तर दिले आहेत. याचा वाचकवृंदानी आवश्य लाभ घ्यावा व आत्ताच आपल्या रोग मुक्त व सुखी जिवनासाठी विलंब न लावता प्राणायाम करण्यास प्रारंभ करावा.
सद्गुरु काशिनाथ महाराज.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू काशिनाथ महाराज की जय
उत्तर द्याहटवाअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय दत्त जयंती निमित्त श्री सद्गुरू चरित्र अमृत ग्रंथाचे पारायण चालू आहे त्यामध्ये खूप छान छान अनुभव येत आहेत पूजा पण किती सुंदर हे ब्लॉग वरती पाठवत आहे
हटवाधन्यवाद पूजा जय सद्गुरू