८. पिंडी ते ब्रम्हांडी.
सद्गुरू महाराज म्हणतात.
जो रहता है वंहा जिवन है ।।
और जो बह जाता है वह मृत्यु है ।।
एक समय यह शरीर भी बह जायेगा ।।
मृत्यु की धारामे।।
लेकीन तुम रह जाओगे ।।
जीवन जगण्याशिवाय देह नाही. या देहाला शुध्द व पवित्र ठेवले पाहीजे, देहशुध्दीसाठी चांगल्या प्रकारचे जीवन जगावे लागते. तरच देह सदैव शुध्द व पवित्र रहातो. कारण देह हे भगवंताचे मंदिर आहे. या देह मंदिरात भगवंताचा निवास आहे. हे भगवंताचे अधिष्ठान आहे. देहात भाव भक्तीचा वर्षाव सतत व्हावयास पाहिजे. ज्या देहाच्या ठायी भाव व भक्तीचे वास्तव्य आहे त्याच देहात परमात्मा अखंड निवास करतो. थोडा विचार करून पहा, परमात्मा आहे, याच देहात भगवंताचे आस्तित्व आहे, देही देवाचा निवास पिंड आणि ब्रम्हांड या दोहोची सांगड आहे. जलाशयात पोहण्यासाठी जसे सांगडीचा आधार घेऊन सहजपणे न बुडता पाण्यात तरंगत राहता येते. सांगड म्हणजे वजनास हलकेसे एखाद्या हलक्याशा लाकडाचे खोड. अशा दोन ते तीन लाकडाचे एकत्र बांधलेले जोडवे. हे कमरेला बांधुन सहजतेने पाण्यात पोहता येते. ज्याच्या कमरेला बांधुन जलाशयात सोडले तेच तरते. जे मनुष्याला पाण्यात बुडु देत नाही त्याचे नाव सांगड. तद्वतच गुरू शिष्यांची सांगड ही सुध्दा सांगडच आहे. म्हणजे सत्संगती ही अखंड पाहिजे, तेंव्हाच हा भवसागर या देहरूपी जड देहाला सरळ तारून जाता येते.
देहरूपी पिंड आणि ब्रम्हांड हे एकच असुन जे पिंडी आहे ते ब्रम्हांडी आहे, आणि जे ब्रम्हांडी आहे ते पिंडी आहे. याप्रमाणे पिंडब्रम्हांड म्हंटले जाते. म्हणजे पिंडी ते ब्रम्हांडी, पिंड देहात हे सुक्ष्म तत्व आहे, आणि या सुक्ष्म तत्वातच परमात्म्याचे सुक्ष्म तत्व समरस आहे. दृष्टीगोचर असणारे हे विश्व्ब्रम्हांड सुक्ष्मतत्वाने समिश्र आहे. जे जे दिसते ते ते सर्व नाशिवान आहे, आणि जे जे दिसत नाही ते ते अजर अमर असुन नित्य आहे, अखंड व अविनाशी आहे. असे जे महद् तत्व अक्षर ब्रम्ह आहे, हेच सत्य आहे. याचाच अर्थ असा होतो की,
जगत मिथ्यं ।। ब्रम्ह सत्यम् ।।
सत्य असणारे महद् तत्व हे परमात्म स्वरूपाचे प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे आरसा समोर ठेऊन आपणच आपले प्रतिबिंब पाहतो. अनित्य असणाऱ्या स्वस्वरूपाला सत्य मानतो. हेच आपले अज्ञान आहे. हा पिंड देह अज्ञानाच्या अंधकारात तरंगत रहातो, आणि सत्य स्वरूपाला विसरून ते तत्व जाणण्यास असमर्थ ठरतो. ब्रम्हांड हे महाभयंकर असुन त्यात अणु, रेणु, परमाणुवत एक सुक्ष्म तत्व कार्यरत आहे.
अनेक औक्षोहिनी पिंड देहाच्या सुक्ष्म तत्वातुन या भुमंडळात (ब्रम्हांडी) समिश्र आहे. चैतन्य स्वरूपातुन जी चेतना निर्माण होते, ती पिंडीतुन ब्रम्हांडी परिवर्तीत होते व पंचतत्वात विलिन होऊन, आचेतन बुध्दी चेतन होत राहते. कर्पुरवृत्ती या चार वृत्ती आहेत, या भिन्न भिन्न वृत्ती म्हणजे चेतन - आचेतन - सचेतन व कर्पुर या पिंडीतच आहेत व हे चारही वृत्ती आपआपल्या वृत्तीप्रमाणे देहाचे कार्य करीत राहतात. पिंड देह अनंत आहेत पण तत्व एकच आहे. ब्रम्हांड एकच आहे, ते अनंत देहाच्या अनंत वृत्तीना एकत्र करून ब्रम्हांड आपल्या उदरी स्थान देते. ज्याप्रमाणे महासागर अनंत नदीच्या प्रवाहाना एकच तत्वाने आपल्या उदरी सामाऊन घेतो, त्याप्रमाणे देहात्मा व परमात्मा याचे रहाटगाडगे अहर्निष चालुच राहते. याचाच अर्थ असा होतो की, परमपिता परमात्मा अन्य कोठे नसुन या देहातच त्या महाप्रभुचे वास्तव्य आहे. देह हेच त्या प्रभुचे मंदिर आहे, देह मंदिरात तो पभु शांत चित्त स्थितप्रज्ञ आहे. पिंडीत ब्रम्हांडात तोच असुन अक्षय व अविनाशी निर्गुण निराकार तत्वरूपाने अखंड निवास करतो. एवढया साठीच संत महात्मे साधु सत्पुरूष जेंव्हा साधकाला बिज मंत्रोपदेष देतात व मस्तकावर हस्त स्पर्ष करून बिज मंत्राची ओळख करून देतात व मंत्रजप अखंड जपण्याचा उपदेष देतात. अखंड या शब्दाचा अर्थ खंड न पडणे. म्हणजे गुरूनी दिलेल्या बिज मंत्राचा जप खंड न पडता अखंड चोवीस तास रांत्रदिवस सतत चालत राहीला पाहिजे. ध्यानी, मनी, स्वप्नी, जागृती, निद्रिस्तक्षणी क्षणमात्रही ध्वनि बंद पडता कामा नये म्हणजे अखंड. उठता बसता, चालता फिरता, खाता पिता, झोपता उठता, उद्योगी, शयनी, पावलो पावली नामस्मरणाच्या तालात एवढेच नव्हे तर स्नान करताना, शौचविधी करताना निसंकोचपणे त्या परम पुज्यनिय गुरूमाउलींच्या शब्दाचा अखंड स्मरणाचा अनुभुतीपुर्वक विचार करून अहर्निष देहाकडुन केली जाणारी जी जी लहान मोठी कर्मे आहेत ते प्रत्येक कर्म नामस्मरणात करा. केंव्हाही खंड न पडु देता अखंड नामात रहा, तेंव्हाच त्या महाभयंकर तत्व स्वरूपाची ओळख होऊन, परम पवित्र परमात्म स्वरूपाची ओळख होऊन, अज्ञानरूपी अंधःकारातुन ज्ञानरूपी महाप्रकाशात आपले सहज व सुलभतेने आगमन होईल.
श्री परमपुज्यनिय सद्गुरू नाथ.
Very very nice
उत्तर द्याहटवाविषय अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवंत अस्तित्व कोठे आहे हे यातून समजते. खूप छान
उत्तर द्याहटवा