6. तिर्थयात्रा कशी करावी.

6. तिर्थयात्रा कशी करावी.
          तिर्थस्थान हे सिध्दक्षेत्र म्हणुन संबोधले जाते. हे स्थान जागृत असते. तिर्थस्थानी प्रभुचे वास्तव्य असते व अशा पवित्र तिर्थयात्रेस गेल्याने मन शुद्ध व पवित्र बनते. आपले मन, चित्त भगवत्  नामस्मरणात एकाग्र होते. मनातले वाईट भाव नाहीसे होऊन मन प्रसन्न राहते. संसारात भटकणारे मन व वृत्ती तिर्थस्थानी निवास केल्याने प्रभु चिंतनात शांत होते. आणि मग अध्यात्म्यात जुडले जाते. संसाररूपी अनंत दुःखाचा तात्काळ विसर पडतो. सत्य सुखाच्या अनुभुती येऊ लागतात. ज्या ज्या पवित्र तिर्थस्थानी त्या त्या अनेक प्रकारच्या अनुभुती येत असतात व मनाला शांतीचा अनुभव येत असतो. तिर्थस्नान - पुजा - नामस्मरण व ईश्वराचे दर्शन या त्रिवेणी संगमाने मनातील अहंभाव, क्लेश, दुष्टवृत्ती इ. दुर्गुणांचा विसर पडतो व अखंड प्रभु नामस्मरणात तल्लीन राहुन एकाग्रतेचा लाभ होऊन मन प्रसन्न व शांत होते. जेंव्हा आपण तिर्थयात्रेला प्रयाण करतो त्यापुर्वी घरी एक दिवस उपवास करावा व दुसऱ्या दिवशी श्री गणेशाचे पुजन करून दर्शन घ्यावे व नंतर तिर्थयात्रेस प्रयाण करावे. प्रवासात स्वयं नियमाचे पालन करावे कुकर्मे करू नये. व तिर्थास प्रयाण करावे. तिर्थस्थानी गरीबाना भोजन द्यावे व तृप्त करावे. आपण ज्या तिर्थस्थानी जाऊन पोहंचतो तेथे कमीतकमी एक रात्र तरी निवास करावा. ज्या दिवशी जाऊन पोहंचलो त्याच दिवशी परत फिरू नये. एक रात्र मुक्काम करून दिवसभर तिर्थस्नान  पुजापाठ देव दर्शन इ. शुभ व पवित्र कर्मे करावी. याच दिवशी एकवेळ अल्प भोजन घ्यावे. शक्यतो दिवसरात्र नामस्मरणात रहावे. योग जप तप सतत करत रहावे. मन प्रसन्न ठेऊन प्रभु चरणावर लक्ष केंद्रीत करावे. आणि नामस्मरण घेत राहावे, शक्यतो रात्री धर्मशाळेत एखादी रूम घेऊन निवास करावा. एखादे स्वच्छ आसन घालुन जप करीत रहावा. तिर्थस्थानी अनाथांना दिनदुबळयांना गरजेप्रमाणे वस्त्रदान व अन्नदान करीत रहावे. यात्रेच्या काळात कोणत्याही प्राणीजनाना व इतर जिवात्म्याना आपल्यामुळे त्रास होईल अशी वर्तणुक ठेऊ नये. सर्व जिवमात्राना समान मानुन सर्वांषी शुद्ध आचरण ठेवावे. तिर्थ स्नान करण्यासाठी ज्या तिर्थात किंवा तिर्थकुंडात घाटावरून पायऱ्या उतरत असताना प्रथम प्रभुचे नाम घेऊनच उजवा पाऊल प्रथम पायरीवर ठेऊन तिर्थात उतरावे. तिर्थाच्या जलाशयात प्रथम उजवा हात घालुन तिर्थजल घेऊन मंत्र उच्चारत (नामस्मरत) तिर्थजल प्रथम मस्त्कावर शिंपडावे. नंतर उजवा पाऊल तिर्थ जलाशयात प्रथम ठेऊन लोटीने जल घेऊन मुखाने नाम घेत स्नान करावे. स्वतःचे स्नाण होताच ओल्या वस्त्रातच गुरूमाउलीना, मातृ, पितृ, पत्नी याना स्नान घालावे व दर्शन घ्यावे. नंतर गुरूंची व मातृ, पितृ यांची पाद्यपुजा करावी. पत्नीने पतीदेवाची पाद्यपुजा करावी व पती स्तोत्राचा पाठ पत्नीनी पुजेत पुर्ण करावा. पतिस्तोत्र व पुजापाठ पुढीलप्रमाणे करावा. महिलासाठी आहे.





         ।। पतिस्तोत्र ।।     
 नमः कांताय मंत्रेः चः षिवचंद्रस्वरूपीणे ।
 नमः शांताय दंताय सर्व देवाश्रयाय चः ।। 0१।।
 नमः ब्रम्हरूपाय सतीप्राण परायच्चः ।
 नमश्चयाच्चः पुजाय हृदयधाराय ते नमः ।। 0२।।
 पंचप्राणादी देवाय चक्षुस्तारकाय चः । 
 ज्ञाणाधाराय पत्नींणां परमानंद दाईने. ।। 0३।।
 पतिर ब्रम्हा पतिर विष्णु पतीरेेच महेश्वरा  ।  
 पतीर धर्म निर्गुनाधार ब्रम्ह रूपे नमस्तुते  ।। 0४।।
 क्षमस्व भगवान दोष ज्ञाणाज्ञाण कृतंचयत ।
 पत्नीबंधो दया सिंधो दासीदोष क्षमस्व   ।। 0५ ।।
।। पतीर देवणपर्णवस्तु ।।
।। पतीर ब्रम्हा पतिर विष्णु पतीरेेच महेश्वरा ।। 
  पतीर गुरूदेवोभ्योंन नमः
          पुजा संपताच पाच प्रदक्षिणा घालाव्यात साष्टांग दर्शन घ्यावे. तिर्थात स्नानाच्या वेळी सोडा - साबण व धुतवस्त्र बाहेर जल घेऊन स्वच्छ करावेत. तिर्थात चुळा भरणे महापाप आहे. निषिद्ध  आहे. 
          तिर्थजल तीनवेळा मंत्र म्हणत आचमन करावे. आणि नंतर नामस्मरण घेत पद पावलाने मंदिर प्रवेश करावा व प्रभु दर्शनास रांगेने शांत पणे मंदिरात जाऊन यथाविधी आपल्या इच्छेप्रमाणे पुजा - अभिषेक - दर्शन करून प्रभुच्या चरणावर त्रिवार पुष्प अर्पण करून दर्शन घ्यावे. तद्नंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यंतरी अथवा एका निवांत कोनाडयात जपध्यान करावे. कासवाच्या मुर्तीच्या मागे उभे राहुन प्रभु भगवंताचे दर्शन घ्यावे (कुर्म दृष्टी प्रमाणे)
  श्री गुरूंच्या चरण कमलाचे दर्शन घ्यावे तद्नंतर मातृ, पितृ दर्शन घ्यावे. वरिष्ठांचे दर्शन  घ्यावे. समाधान मानुन चित्त शांत ठेवावे. मंदिर प्रदक्षिणा करीत असताना प्रभुच्या मंदिराच्या शिखराकडे दृष्टिक्षेप करून कळसाचे दर्शन घ्यावे व प्रक्षालण करून कळस पाहुन त्यात प्रभुची मुर्ती आहे अशी भावना करून भाव ठेऊन दर्शन करावे त्रिवार हात जोडुन कळस दर्शन करावे. व बिज मंत्र ११ वेळा म्हणुन अंगाभोवती ११ प्रदक्षिणा घालाव्यात. आणि मंदिरातील येणाऱ्या भाविकाना यथाविधी प्रसाद वाटुन तृप्त करावे.
          धर्मशाळेतील  व्यवस्थापन व इतर कर्मचारी यांच्याशी प्रेमाची वर्तणुक देऊन त्याना यथाविधी मोबदला देऊन तृप्त करावे. यात्रा काळात किंवा पवित्र स्थानी स्वच्छता ठेवावी. कारण तिर्थ स्थान व मंदिराचा प्रवेश भुमी, अनेक साधुसंताच्या चरण कमलाच्या स्पर्शाने, मातीचा कण ना कण शुध्द व पवित्र झालेला असतो. तिर्थ स्थानावरील मातीचे कण मस्तकी लावावे. लाखो वर्षापासुन अनेक महान योगी साधु सत्पुरूष याच भुमीवरून पद भ्रमण करून गेलेले असतात. या स्थानाला पवित्रता आलेली असते. काही काळी अनेक साधु संतानी याच भुमीत तपश्चर्या केल्याने ही तिर्थभुमी प्रखर व तेज पुंज पुण्य भुमीत रूपांतर  होते. कांही वेळा अनेक संत पुरूषांचा आशीर्वाद या भुमीस प्राप्त झालेला असतो. या पवित्र भुमीत आपण चालत असताना पावलो पावली नामाचे उच्चारण करत चालावे. तेंव्हा त्या महान योगी सत्पुरूषांच्या आशीर्वादाचा प्रभाव येणाऱ्या भक्तावर पडल्या शिवाय  रहात नाही. पण शुध्द अंतःकरणाने शांत चित्ताने प्रभुच्या नामात राहुन नामातच रममाण झाले पाहिजे. 
          तिर्थ यात्रेच्या काळात आपली वस्त्र तिर्थ स्थानावर धुवु नयेेत. वस्त्र मलिन होताच ते बदलुन दूसरे वस्त्र परिधाण करावे. मलीन वस्त्र परत आपल्या घरी परत येऊन आपल्या स्थानी स्वच्छ करावे. कारण तिर्थ यात्रेत अनेक क्षेत्रातील पवित्र धुळीचे कण त्या वस्त्रावर बसुन ते पवीत्र होते ते वस्त्र आपल्या घरी धुतल्याने ते पवित्र मृत्तीकेचे कण आपल्या निवासस्थानी पडतात. याने आपले निवासस्थान शुध्द व पवित्रतम होते. पवित्र तिर्थ स्थानी निवास करून एक दोन दिवस तरी सत्संगतीत राहुन साधु सत्पुरुषांच्या सत्संगतीत राहुन सत्संग करावा. आणि गुरूनी दिलेल्या बिजमंत्राचा जप करावा पवित्र स्थानी केलेला जप (नामस्मरण) आणि घरी बसुन केलेले जपध्यान यात फार मोठी तफावत आहे. आपण जेंव्हा घरी बसुन हजारो संख्या जप करतो त्यापेक्षा तिर्थ स्थानी शंभर जप संख्या जरी केली तर लाखो जपाची शक्ती तयार होते. घरच्या पेक्षा लाखावर अंकानी जपाचे पुण्य लाभते. तिर्थाच्या ठिकाणी पवित्र वातावरणात प्रेक्षणीय स्थाने पहात पायी प्रवास पंचक्रोशीतील सर्व तिर्थस्थानाना भेट देत दर्शन घेत जप करावा. तिर्थ यात्रेस प्रयाण केल्यास पदभ्रष्ट होण्यापासुन सावध असावे. ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करावे हे आद्यकर्तव्य आहे.
          यात्रा काळात तिर्थ स्थानी कुटुंबातील सर्व लहान थोर मंडळीनी आखंड नामात रहावे ही सुचना देणे. तिर्थ स्थानी लघुशंका व शौचविधी करण्यास शौचालयात जावे पवित्र पुण्य भुमीत इतरत्र शौच विधी करू नये. मंदिराच्या गाभाऱ्यात तिर्थात पडलेले निर्माल्य पायाखाली तुडवुन चालु नये. ते सर्व हाताने गोळा करून एखादया कोनाडयात ठेवावे. कारण अन्य कोणाच्या पायाचा स्पर्श निर्माल्यास होणार नाही.
          तिर्थ स्थानी सर्व व्यसनापासुन अलिप्त रहावे. पान, तंबाखु, मद्यपान, धुम्रपान इ. सवयी व्यसने त्वरीत बंद करून प्रभुच्या दरबारात शपथ विधी घेऊन कायमचे व्यसन सोडण्याचा संकल्प करावा. मातृ, पितृ, बंधु, बहिण, आप्तइष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार व प्रजाजन यांच्याषी प्रेमाने व श्रध्देने वागण्याचा प्रभु चरणी संकल्प करावा. आपल्या दिक्षा गुरूना प्रत्यक्ष परमात्म स्वरूप समजुन गुरूंना सर्व भावे शरण जाऊन शेवटी गुरू माउलींच्या चरणकमलांचा आश्रय घ्यावा आणि गुरू हेच माझे सर्व काही आहेत ते स्वयं परमात्म स्वरूप आहेत हा आत्मनिश्चय करावा. 

टिप्पण्या

  1. जय सद्गुरू पूजा तुझ्यामुळे सर्वांना सद्गुरु महाराजांचे तीर्थक्षेत्राचे महत्व आणि तीर्थक्षेत्रात कशा कशा पद्धतीने आपण तेथे वास्तव्य करायचे जप करायचा तीर्थस्नान कसे करायचे हे किती छान समजावून सांगितले कळले आणि तुझ्या माध्यमांमधून पूजा तू सर्वांपर्यंत हे पोहोचलेला आहे महान कार्य तू करत आहेस खूप छान पूजा जय सद्गुरू

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा