3.सत्य गुरुसेवा

3.सत्य गुरुसेवा 
           श्री सद्गुरु प्रभु यल्लालिंग महाराज अत्यंत प्रेमभावाने विव्हळ होऊन म्हणाले, बाबानो नीट लक्ष देऊन ऐका बरं का!  पुन्हा तुम्हाला सांगायला कोणीही येणार नाही. अरे गुरुवर्यांची अंगसेवा करावी, गुरुवर्यांना तेल लावून स्नान घालावे, स्वच्छ कपडे त्यांना परिधान करावे. स्नानानंतर पूजेची व जपाची तयारी त्यांच्या इच्छेप्रमाणे करून सद्गुरूंना आसन टाकावे. त्यांच्या भोजनाची तयारी करून इच्छाभोजन भरवावे, त्यांचा मनोभाव ओळखून त्या त्या वेळी गुरुसेवा करीत रहावे. गुरु जेथे आसनावर बसले आहेत, तेथे भक्ताने खाली न बसता समोर थेाडे दूर हात जोडून उभे रहावे. मनात नामस्मरण चालू ठेवावे आणि गुरुवर्य काय म्हणतात त्या अपेक्षेत शांत चित्त रहावे. गुरूवर्यांच्या मनात येणारे विचार बुध्दीचातुर्याने ओळखून त्या वेळी गुरुवर्याना काय पाहीजे हे पटकन ओळखून त्यांची पूर्तता करावी.
          गुरुवर्य एखाद्या मोकळया हवेत स्थिर बसले असतील तेंव्हा थोडया दूर अंतरावर ज्या दिशेने हवा वाहते त्यांच्या विरूध्द दिशेला गुरूंचे बोल ऐकू येतील इतक्या अंतरावर उभे रहावे म्हणजे हवेचा प्रवाह गुरूंच्या देहाला स्पर्श करून पवित्र होतो ती पवित्र हवा आपल्या देहाला स्पर्श   करते,व आपल्या रोमरोमात प्रवेश करून या देहाला शुध्द व पवित्र बनविते. 
          गुरुवर्य ज्या तीर्थात स्नान करतात त्याठिकाणी व त्यावेळी आपण पाण्याचा प्रवाह वाहतो म्हणजे गुरूवर्यांच्या खालच्या बाजूला थोडया अंतरावर स्नान करावे. म्हणजे त्या तीर्थाचे पवित्र जल गुरूवर्यांच्या देहाला स्पर्श करून आणखी ते लाखपटीने पवित्र होते व ते आपल्या देहाच्या रोमरोमात प्रवेश करून देहाला शुध्द व पवित्र करून सुविचारांची वृध्दी करते. पापकर्माचा नाश  होऊन कोटी तीर्थस्नानाचे पुण्य लाभते.
          गुरूवर्यांच्या समवेत पादभ्रमण करीत असताना आपण त्यांच्यामागे पाच ते सात फूट अंतरावर थोडया तिरप्या बाजुने चालावे. त्यावेळी आपली दृष्टी गुरूदेवांच्या चरणकमलावर स्थिर ठेवावी आणि नामस्मरण करीत चालावे म्हणजे गुरूदेवांच्या चरणांचे चालते वेळी उडणाऱ्या धूळीचे सूक्ष्म कण आपल्या देहाला पवित्र बनवितात. तो कण न् कण पवित्र असतो.  गुरु कांही कामासाठी कडक उन्हात थांबले असतील तर तेंव्हा आपण आपल्या देहाची सावली त्यांच्या सर्वांगावर पडेल अश्या अंतराने उभे रहावे जेणेकरून गुरूमाऊलीना शांती मिळेल. गुरूपुत्रांनी या सर्व बाबींचे स्मरण अंतःकरणात पक्के स्थिर करून आत्मीयतेने दृढ भाव ठेऊन नित्य नैमित्तिक नामस्मरणाचा निदिध्यास करावा. तन मन धन हे सर्व गुरूंना भक्तिभावे समर्पित करावे. माझे मातृपितृ, आप्तइष्ट हे सर्व सद्गुरू परमात्म शक्तीचा खेळ आहे. एवढया महान विचारात जाऊन आत्मनिरीक्षण करावे व श्री गुरू माऊलीना अनन्यभावे शरण जावे. यातच शिष्यांचा पुरूषार्थ आहे.
                                                                ।। निष्काम ।।   
          श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज यांनी इ.सन १९६९ साली लच्चाण येथे मठात श्री सिध्दलिंग महाराज यांच्या मुर्तीस स्मरून भावावेषात येऊन तत्वज्ञान हा विषय निरूपण केला. तो फारच कठीण असल्यामुळे दोन तीन दिवस सतत निरूपण झाले, त्याचा सारांश थोडक्यात सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत साधक निष्काम कर्म व उपासणेच्याद्वारे शुध्द अंतःकरण ठेऊन तत्व साक्षात्काराची योग्यता प्राप्त करून घेत नाही. तोपर्यंत तत्वनिष्ठ महापुरूष (श्रीगुरूंचा उद्देष) ऐकुनसुध्दा तो परमात्म तत्व गृहन करू शकत नाही. परम तत्व शुध्द चैतन्य स्वरूप आहे. ते सर्वत्र व्याप्त आहे व सर्व प्रकारच्या मर्यादेपासुन शुन्य आहे. त्यामध्ये अनंत शक्ती सामावलेली आहे. सृष्टीच्या पुर्वी ते त्यात अव्यक्त लिन असते. आपल्या संकल्प शक्तीने आरश्यातले प्रतिबिंब स्वरूप भासमान होते. या तत्वज्ञान विषयाचे आकलन श्री सद्गुरूंच्या उपदेष श्रवणाने त्या तत्वाचा अप्रतिबध्द बोध होतो. परंतु चित्ताच्या अशुद्धीमुळे संशय व विपर्यास होतो. अशुद्धीतून निवृत्त होऊन त्याचे मनन केल्याने व निदिध्यास केल्याने विपर्यासाची निवृत्ती होते. व नंतर अखंडाकार वृत्ती होते. प्रतिबिंब शून्य ज्ञान होते. त्यासाठी श्रवण- मनन -निदिध्यास हेच ज्ञानाचे प्रधान साधन आहे. उपरोक्त शब्दाने अखंडाकार वृत्ती होऊन प्रतिबंध शून्य ज्ञान होऊन, निष्काम कर्म आणि उपासनाद्वारे सुक्ष्म व शुध्द चित्त होते. सुक्ष्म चित्तात परम तत्वाचे स्फुरण होते. त्यावेळी साधकाच्या सर्व कार्यात सफलता मिळते.
स्फुरण म्हणजेः-   
1) निद्रा आणि जागृतीच्या मधली अवस्था.  
2) ज्यावेळी चित्त एका वस्तुच्या आकाराला सोडुन दुसऱ्या वस्तुत जाऊ लागते त्याच्या मधली अवस्था.(सूक्ष्म स्थिती) 
3) एका विचाराला सोडुन दुसऱ्या विचाराला आरंभ होण्याच्या मधला अंतर. 
या दोन अवस्था दोन पदार्थ व दोन वृत्ती याच्या मधली संधी. (सूक्ष्मात सूक्ष्म समय) या संधीत चित्त निर्विषय राहते. हेच निर्विषय चित्त वास्तविक शुध्द व निर्विषय असते. हेच शिष्यांचे सद्गुरूविषयी परमपद आहे, सर्वेश्वर आहे व संपुर्ण प्रपंचाचा आधार आहे. सर्व पदार्थाच्या स्वरूपात तेच भासते. याप्रमाणे निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाल्यावर परम तत्वाचा साक्षात्कार होऊन तेंव्हाच सद्गुरूंची ओळख होते. त्याच वेळी सद्गुरूंच्या सतस्वरूपाची ओळख होते. शिष्याला सतस्वरूप दर्शन होऊन तत्वज्ञानाची ओळख होऊन सर्व अवस्था त्यातच प्रतिबिंबित होऊन सर्व जिवमात्रात सद्गुरूंचे दर्शन होऊन परमात्म्याचे प्रतिबिंब भासमाण होते. परम पदाच्या प्राप्तीच्या सर्व साधनाचे एकच साधन आहे ते म्हणजे तत्व. या तत्वरूपी महद्तत्व (अविद्या माया तत्वमसी महावाक्य, हिरण्यगर्भ) मुळबिज, या विश्ववब्रम्हांडात हिरण्य गर्भमय सुक्ष्मस्वरूपात विराजमान आहे. या महातत्वाचे दिग्दर्शक महापुरूष सद्गुरूच खरे परमार्थदर्शी आहेत. तेच सर्वांचे आदर्श असतात, त्यासाठी सर्वांनी त्यांचीच वंदना केली पाहिजे. हेच शिष्यांचे इःतह कर्तव्य आहे. परमार्थरूप फळाच्या प्राप्तीसाठी सत्संग म्हणजे बिज समजले जाते. जे आत्मभुत स्वरूप आहे तेच या विश्वब्रम्हांडात सर्वाठायी प्रतिबिंबित होते. देही ते पिंडी, पिंडी ते ब्रम्हांडी. जगत् मिथ्यं - ब्रम्ह् सत्यं.
                              
                                                संत अवतार घेण्याचे कारण.
                                                                 🕉
                   सद्गुरू काशिनाथ महाराज निर्गुण बुध्दीने सगुण उपासना करून, कर्मयोग हेच आत्म्याचे कर्तव्य समजून , निरनिराळया ठिकाणी देवतांच्या स्थापना करून, त्यांची पूजा करून, आत्मनिष्ठ भावनेने उपासना केल्याने तत्वज्ञानाचा बोध होतो. सगुण याचाच अर्थ परमेश्वराने हे सगुण विश्व निर्माण करून, साधुसंतांच्या साह्याने, जग उध्दाराचे कार्य  जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती. यालाच आत्मसंकल्प म्हणतात. आणि हेच कार्य सद्गुरू काशिनाथ महाराजानी प्रयत्नाच्या पराकाष्टेतुन करत राहुन आपले 120 वर्षांचे दिर्घायुष्य जनकल्याणार्थ खर्च करीत राहीले.
                                                               ।। 🕉 ।।
 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा