१०. जन्म मृत्यु जरा व्याधी
दुःख दोषानु दर्षणम्.
शास्त्रांतर्गत मृत्युला मांगलीक मानले जाते. मी जाणार आहे पण कधी जाईन हे माहीत नाही. असा प्रकार जिवनाचा आहे. जे संसारात मस्त असतात ते मृत्युला विसरतात तर त्यानी मृत्युचा विचार करणे जरूरीचे आहे. ज्याप्रमाणे जिवनाचा विचार करतो तसा मृत्युचाही विचार केला पाहिजे. शास्त्र सांगते मृत्यु समयी भगवंताचे स्मरण करा. अजामीळ ने मृत्युच्या समयी स्वतःच्या नारायण नामाच्या मुलाचे स्मरण केले व तो मुक्त झाला. मृत्युच्या समयी नामस्मरण करावे असे सांगितले जाते पण त्यावेळी नेमका विसर पडतो कारण ज्याने संसारात सुख माणुन संसाराचा ध्यास केलेला आहे त्याचेसमोर अंती त्याचेच चित्र उभे राहते. जो जरा, दुःख, व्याधीने त्रस्त आहे त्याला तेच दुःख आठवते जो आप्त, इष्ट, मित्र यात गुरफटलेला आहे त्याला अंती तेच इष्ट मित्र आठवतात. जो धन द्रव्य, बायका मुलेबाळे यात गुरफटलेला आहे त्याला त्यांचीच आठवण रहाते, हा मृत्युसमयीचा खेळ आहे. जिवनभर जसा ज्याचा ध्यास असतो तेच अंती मृत्यु समयी माणसाला आठवते. या सर्व व्याधीतुन जीवन मुक्त व्हायचे असेल तर, जन्म मरणाचे कल्याण करून घ्यायचे असेल तर, शास्त्र पुराण सांगते व साधु संत सांगतात तेच सद्गुरु काशिनाथ महाराज आपल्या शिष्याना व भक्ताना कळकळीने सांगतात. त्याचे अनुकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
इह जन्माचे सार्थक फक्त मृत्युसमयी नामस्मरणात प्राणोत्कृमण व्हावे तेंव्हाच लाभते. एवढयासाठी आयुष्यभर नामाचा ध्यास करा, चोविस तास नामात रहा, सत्संग करा, साधुसंतांचा उपदेश अंतःकरणात परिपक्व करा, गुरूनी दिलेल्या बिजमंत्राचा अखंड जप करा. जपात रहा, तपात रहा, यौगात रहा, कामात नाम पहा, नामात काम करा, हा संकल्प करा तेंव्हा आपली सर्व इंद्रिये नाममय होतील. इंद्रिया कडुन केले जाणारे कर्म नामात केले जातील तेंव्हाच मृत्यु समयी शेवटचा श्वास नामस्मरणात बाहेर पडेल. तेंव्हा जन्म, मृत्यु, जरा, व्याधी इत्यादी अनंत सुख दुःखातुन हा आत्मा परावृत्त होऊन नामाच्या ध्वनिलहरीत विलीन होईल. आत्मा परब्रम्ह स्वरूपी स्थितप्रज्ञ व एकरूप होईल. तेंव्हाच इह जन्माचे सार्थक झाल्याचे श्रेय पदरी पडेल.
मरावे परी किर्ती रूपे उरावे ।।
संत रामदास स्वामी म्हणतात: -
मरा आमची हरकत नाही. आवश्य मरा. पण या जगात जन्म घेऊन कांही तरी मागे ठेऊन मरा. सद्गुरु काशिनाथ महाराज म्हणतात: - मर मर बैलासारखे मरा, पण मुखी नाम हाती काम अखंड ठेवा.
श्री समर्थ सद्गुरु काशिनाथ महाराज आपल्या सर्वांचे इष्टदेव, श्री 🕉 स्वरूप चैतन्याचा महाप्रकाश यांनी कधीही कोणाकडुन सत्कार करून घेतला नाही किंवा आपल्या कर्तव्याची व यौगीक सामर्थ्याची किंवा मोठेपणाची थोरवी लोकाकडुन केली जाणारी प्रशंसा ही त्यांना मुळीच आवडत नसे. मी म्हणजे एक तुमच्या सारखा सर्व सामान्य जिवात्मा आहे. माझ्या हातुन होणारे जे कार्य आहे ते मी करत नसुन माझे गुरूदेव (मोठे महाराज) मुगळखोडचे यल्लालिंग प्रभु महाराज करीत असतात. माझे सर्वस्व जे काही आहे ते माझे गुरूच आहेत, तेच माझ्या हाताला धरून हे सर्व कार्य पार पाडतात. अरे, इथे तुमचे महाराज आहेत असे तुम्ही सर्व भक्त जाणता व जे काही केले जाते ते सर्व महाराज करतात अशी जी तुमची समजुत आहे ती निव्वळ आंधळयाने क्षणार्धात पृथ्वी प्रदक्षिणा करावी त्याप्रमाणे आहे. कारण आंधळा आणि पृथ्वी यांच्या मधला अंतर म्हणजे जमीन आस्मानचा फरक आहे, हे तुमचे निव्वळ अज्ञान आहे. ही तुमची एैहिक सुखोपभोगातील दृष्टी आहे, ही दृष्टी म्हणजे मर्यादित असते दिर्घ दृष्टीनेच या सर्व गोष्टींचे ज्ञान होते. बाह्य दृष्टीने सर्व आकलन होणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. प्रत्येक मानव प्राण्याची आकलन शक्ती अल्प असल्यामुळे ते अशक्य कोटीतील गोष्ट आहे. या सर्व गोष्टींच्या आकलन शक्तीसाठी ज्ञानाची व दिव्य दृष्टीची नितांत गरज भासते. बाह्य दृष्टीने हे विश्व पहाता येते व अंतरदृष्टीने देहातील अंतरात्म्याला पहाता येते. आणि दिव्य दृष्टीने त्या परम पवित्र परमात्म्याला पहाता येते.
प्रभु रामकृष्ण परमहंस, कासिपुर नामक वेलुर मठात आसताना, त्यांचे सत् शिष्य स्वामी विवेकानंद एकवेळा गुरू दर्शनास आले असताना ते येत असल्याचे पहाताच प्रभु रामकृष्ण परमहंस दुरूनच मोठयाने उद्गारले , आला माझा बाळ आला, आला आला आला, आत्मीक दृष्टीतुन बाह्य दृष्टीचा नाश करून दिव्य दृष्टीचा प्रकाशमय तेजाने प्रक्षालन करीत परम पवित्रतेचा ध्वज फडकावित धाव घेत आहे. धावतच येत आहे. प्रभु कल्याण भवः कल्याण करावे बाळाचे. इथे गुरू शिष्याच्या भेटीचे श्रीगुरू रामकृष्ण परमहंस या महान यौगी पुरूषाने दोन्ही तिन्ही दृष्टीने अंतर्यामी प्रक्षालन करून पहिले व वरील प्रमाणे कमल मुखातुन दिव्यत्वाचे महान उद्गार काढले व प्रभु चरणी विंनती केली प्रभु कल्याण करावे बाळाचे. श्रीगुरू रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदाना सर्व भावे ओळखुन होते. हा काही सर्व सामान्य पुरूष नाही तो योगबळाने परिपुर्ण असुन एक महान कैवल्याचा अधिकारी तपोनिधी प्रखर तेजपुंज जिवात्मा आहे.
स्वामी विवेकानंदानी गुरू सेवाभावाने आपला देह सर्वभावे गुरूचरणी समर्पण करून अहोरात्र सर्व जिवांना समभावनेने ज्ञानाचे दान देत राहुन, आत्मनिष्ट भावनेने, योगबळानी परिपुर्ण झालेले आणि बाह्य दृष्टीचा लय होऊन अंतर दृष्टीने, आत्म दर्शनाचा लाभ घेऊन त्याच्याही पुढे उर्ध्व दृष्टीच्याद्वारे अखंड भाववेशात देही असुन विदेही रहात असत व दिव्य दृष्टीने अखंड जागृती - स्वप्नी - सुषुप्ती - गुरू दर्शनाच्या गुरू चरणसेवेच्या समीप निद्रिस्त असत आणि क्षणमात्रात या विश्वब्रम्हांडात दिव्य दृष्टीने प्रक्षालन करीत असत. या प्रमाणे पवित्र पुण्यतम भारत भुमित प्रभु रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या सारखे महान व थोर संत महात्मे भारत भुमित अनेक साधु संत महान यौगी सत्पुरूष होऊन गेले, हेच भारत मातेच्या कृपेने भारत देशाचे भाग्य आहे. सद्गुरु काशिनाथ महाराज भक्तजनाला कळवळुन सांगत असत, बाबानो हा कलियुग आहे या कलीयुगात सर्वात सर्वश्रेष्ट ( नामच ) आहे. नामानेच मनुष्य तारूण जातो व देहाचे आत्मकल्याण होते. अन्य काहीही सायास या युगात करण्याची गरज नाही. नाम हेच सर्व श्रेष्ट साधे व सोपे साधन आहे.
।। कलियुगी महान नामचि पै साधन ।।
योग याग जप तप अनुष्ठान उपवास व्रत या सर्व उपाधी आहेत. कलियुगात अन्नमय प्राण आहे. या पुर्वी वायुमय प्राण असल्यामुळे महान यौगी महर्षी शेकडो वर्षे अन्न पाण्याविना तप साधना करून योग सिध्द करीत असत. आज अशा अनेक संकटाना तोंड देण्याची मुळीच गरज नाही.
सुखे येतो घरा पांडुरंग.
म्हंटल्याप्रमाणे तुम्ही फक्त बिजमंत्राचे ध्यान करा (नाम घ्या) अखंड नामात रहा खंड पडु देऊ नका, चालता फिरता चोविस तास मुखाने आतल्या आत नाम घेत रहा यातच योग याग जप तप अनुष्ठान सामावलेले आहे. नामातच ज्ञानाचे परम रहस्य आत्मज्ञान भरलेले आहे. श्रीमद्भगवतगीतेत भगवान श्रीकृष्णानी सांगीतले आहे.
आत्मज्ञानं विना पार्थः । सर्व कर्म निरर्थकम् ।।
नाम हेच तारक आहे. नामानेच आत्मज्ञानात परिवर्तन होते. नामस्मरणाने जड मुढाचा देखील उध्दार होतो. गुरू मुखातुन मिळालेले नाम सतत घेत राहुन त्याचा निधीध्यास केल्याने अज्ञानाचा लय होऊन ज्ञानाची प्राप्ती होते. नामाच्या शक्तीने निरक्षर साक्षर बनतो. वेदासारखे संस्कृत मंत्राचे महान ग्रंथ सुध्दा सहज वाचण्याची शक्ती येते. नामाच्या साह्याने अनेक ग्रंथाचे पठण होते व स्मरण शक्तीचा विकास होतो. एखादा साधक निरक्षर असला तरी साधा भोळा सामान्य मनुष्यसुध्दा तत्वज्ञ होऊ शकतो. तो गुरू मंत्राच्या नाम स्मरणाने किर्तन प्रवचन करून तत्व ज्ञानाचा बोध करू शकतो व वेदांत पंडिताचा महापंडित म्हणुन जगात प्रसिध्दिस येतो. सद्गुरु महाराजांनी पुढील दृष्टांत देऊन सांगीतले आहेत.
उत्तमात उत्तम उपदेश आहे, जय सदगुरू
उत्तर द्याहटवाजीवनाचा कल्याण करणारा उपदेश
उत्तर द्याहटवाहे ज्ञान अमृत आहे
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू पूजा तुझे हे कार्य खूप मोठे फार आवडते मला हे आणि खरंच नामा सारखा कलियुगात दुसरे काय साधनाचा मार्गच नाहीये कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आपण यज्ञ करू शकत नाही जप यज्ञ आपला हा श्रेष्ठ मार्ग आहे असे श्रीमहाराज सांगतात खूप छान खूप छान ऐकायला मिळाले वाचायला मिळाले धन्यवाद पूजा तू अशीच यशस्वी हो असेच कार्य करत राहा जय सद्गुरू
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवा