ॐ चैतन्यं शास्वतम् शांतं योमातीतं निरंजंम् नाद बिंदु कलातितंम् तस्मै श्री गुरूवे नमः
निर्गुण निराकार मुळ बीज आहे, चैतन्य स्वरूप आहे, तो शास्वत असून नित्य अक्षय अविनाशी अजर अमर सृष्टीचा निर्माण कर्ता मुळबीज आहे आणि मृदु मुलायम दृष्य आदृष्य गुणातीत शांतीचा महासागर आहे, अदि - मध्य -अंती सदा सर्वदा स्थिर असणारा मंत्रराज आहे. तो सर्व जिवमात्राच्या ठायी, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आप, तेज, वायु, पृथ्वी, आकाश, पंचमहाभौतिक सर्व जिवमात्रात भरून उरलेला आहे. निरंजनाप्रमाणे शांत - स्थिर, धिर - गंभीर महाप्रकाशाचा महाप्रकाश आहे. तेजाचे तेज, शक्तीची महानशक्ती प्रलयाचा महाप्रलयकारी महद्तत्व आहे. सर्व नादात नाद अनेक प्रकारच्या ध्वनीत समरस आहे, आणि तो कसा आहे म्हणाल तर बिंदूवत बिंदू आहे, सुक्ष्मात सुक्ष्म बिंदू आहे. सर्व प्रकारच्या कलेत (कलातीतं) सर्व नादात नाद, रागात - तालात - स्वरात, भाषणात, ध्वनीत मंत्र उच्चारात प्रणवात प्रणव, जल सागरात अग्निरागात नृत्यात गुण संपन्न भैरवित स्मरणात सर्वत्र स्थित आहे. असे जे महान परमपुज्य सद्गुरू काशिनाथा तुम्ही आसाल तसे त्या तुम्हाला या पामराचा नमस्कार असो. वरील विषयाच्या अनुषंगाने श्री पुज्यनिय महाराज गुरूपुत्राना उपदेश करतातः- बिजमंत्र हा महानात महान, शक्ती संपन्न आहे.या वाणीने त्यांची थोरवी सांगता सांगता इथे मात्र मती खुंटते, वाणी बंद पडते, दृष्टी मंदावते, चित्त विचलीत होते, सांगणारा लक्ष पुरीहुन आलक्षपुरीला जाऊन स्थितप्रज्ञ होतो, लक्ष आणि मन लक्ष्मण आत्मा आणि राम यांना सोडुन आलक्षपुरीत निवासास थांबतो. आलक्षात मात्र अलंकापुरी येऊन मिळते, त्यावेळी लक्षपुरी व अलंकापुरी. ‘अ’ लक्षाला जागृत करण्याचे कार्य करते. ‘अ’ लक्ष जागृत होताच बीजाक्षराची ओळख होते व त्या महान शक्तीने बिज मंत्राच्या प्रभावाने आत्मशक्ती-मनोभाव-आत्मप्रचिती आत्मविश्वास हे सर्व खाड्कन् जागृत होतात आणि देहातीत असणारे सर्व इंद्रिये त्या बिज मंत्राच्या महाप्रकाशात आत्मानुभवाने उत्तिर्ण होतात.
या काळात ॐ या बिज मंत्राच्या फक्त एकाच उच्चारात एवढी महान ताकत असते की, त्या पृथ्वीला उलटे करून पालटे करू शकते. एकाच मंत्र शक्तीच्या प्रभावाने हे सर्व विश्व अस्थिर होऊन कायापालट होऊ शकतो. एवढेच नाही तर या विश्वातील सर्व कारभार संपुष्टात येऊ शकतो.
सद्गुरू महाराज म्हणतात, ॐ हा महामंत्र सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ महाशक्ती संपन्न महामंत्र आहे. त्याचेच मनन करा, ध्यान करा व मुखात अखंड ठेवा. चोवीस तास नामाच्याच नशेत मस्त रहा, स्वस्थ रहा, निकोप रहा, चैतन्य प्रकाशात रहा, उद्योगी रहा, संसारी रहा, जागृत रहा, स्वप्नात रहा, कर्मरत रहा, आहोरात्र कर्म करा, जागृती स्वप्नी सुषुप्ती कर्मरत रहा. ॐ मुळ बिजाशी मुळ जोडा व कुळाचा मुळीचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध गुरू शिष्यांचा योग म्हणजेच ऋणानुबंध योगाचा महायोग साध्य करून घ्या. मनुष्य देहाची काया त्वचा छिद्र रोम रोम ॐ च्याच ध्वनीनादात संचरण झाले पाहीजे. ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ....नाद ब्रम्ह - शब्द ब्रम्ह कायाकल्प = ब्रम्ह = अकारातुन - उकारात - उकारातुन - मकारात व मकारातुन अर्ध तन्मात्रीका 0 शुन्यात लक्ष द्या. तेंव्हाच मुळबीज महामंत्राची महानशक्ती आपल्या लक्षात येईल व आपले सर्व कार्य तीच करीत राहील.एवढया महान सिध्दिची प्राप्ती करून देणारे देवाधिदेव श्री प्रभु सद्गुरूनाथ हेच साधकाच्या अंतर्यामी अखंड वास करतील व शिष्यांच्या कर्तव्य कर्माप्रमाणे त्याला वेळोवेळी उपदेश करून एकमेव एकमेकाद्वितीय परम पदाला नेऊन सोडतील.
ॐ शांती शांती शांती.
उत्तम ज्ञान
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवा।।जय जय दत्त माउली।।
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय
उत्तर द्याहटवासद्गुरु महाराजांचे अगाध ज्ञान
भक्त परिवारामध्ये किती सुंदर शब्दात व्यक्त केले आहे
तुझ्यामुळे पूजा हे वाचण्यास सोपे
झालेले आहे खूप खूप मेहनत घेऊन
तू हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवत आहेस धन्यवाद पूजा