गुरू कृपे शिवाय जीवन.
म्हणजे
कहत कबीरा सुन भाय साधु आया वेैसा गया ।।
जसा आला तसाच निघुन गेला असे जीवन मातीमोल आहे. या जन्मात येऊन जीवनाचे कल्याण होण्यासाठी, अद्वितीय परमपदाच्या प्राप्तीसाठी, ज्ञानांतर्गत जाऊन पोहचण्यासाठी , प्रभुच्या चरणारविंदी एकरूप होण्यासाठी, सद्गुरूंच्या आशिर्वादासाठी व भगवंताच्या दर्शनासाठी प्रत्येक जीवमात्रास गुरू कृपेची नितांत गरज आहे. गुरू कृपेने हे मानवी जीवन उजळून निघते. मी कोण आहे हे कळते व मानवी धर्माच्या कर्तव्याची जाणीव होते व अध्यात्म मार्गात उच्चतम मार्गात उच्चतम ज्ञानाची निर्मिती होते. जिवनात जन्माला येऊन काय केले पाहिजे या सर्व बाबीची प्रत्यक्षानुभुती येते.
सद्गुरूनाथ म्हणतात ‘माझे गुरू यल्लालिंग प्रभु महाराज फार मोठे होते रे. त्यानी त्यांच्या पाच लाख गुरूपुत्रांना कधी हाताने धरून चालण्याचे शिकविले नाही. त्यांच्यात मंत्रोपदेश होताच गुरू पुत्राच्या देहात सुक्ष्म तत्वाच्या संवेदना होत असत व विद्युत प्रवाह शक्तीचा संचारण होऊन देह चैतन्यमय होत असे. जसे गायीचे वासरू जन्मताच ताड्कन् उठून उभे रहाते व स्तनपान करताच उडया मारू लागते. त्याला चालवायला शिकवावे लागत नाही पण माणसाच्या वासराला जन्म झाल्यावर हाताना धरून चालायला शिकवावे लागते. चालण्यासाठी त्याला काही काळ लागतो पण हे लक्षात घ्या. सिध्दलिंगाच्या सिध्दकुळीत येऊन जन्मलेले आपण वासरे आहात, सिध्दांचे अनुग्रहीत आहात, सिध्द गुरूपुत्र आहात, ते स्वयं सिध्दच आहेत. जे गुरू पुत्र नामाची सांगड अखंड कमरेला बांधतात ते कधी बुडत नाहीत. या मायारूपी महासागरातुन सहजगत्या तारून जातात. आणि हा भवसागर मायारूपी सागर क्षणार्धात पार करून पैलतिराला जाऊन पोहचतात. तेंव्हाच त्या जन्म झालेल्या गायीच्या वासराप्रमाणे उडया मारतात. त्याना शिकवायची गरज पडत नाही.
यल्लालिंग प्रभु महाराज मुगळखोड मठात अन्नकुट क्षेत्रात भोजनास बसले. सद्गुरूनाथ महाराज व त्यांचे शिष्यवृंदही पंक्तीत बसले, श्री यल्लालिंग प्रभु महाराज म्हणाले, अरे गाडेबाबा सर्वाना तुप भरपुर वाढा. हे ऐकुन गाडेबाबानी तुपाने भरलेली चरवी घेऊन तुप वाढू लागले व गुरूआज्ञा म्हणुन प्रत्येकाला एक एक तांब्या भरून ताटात वाढले हे पाहुन सद्गुरू काशिनाथ महाराज आपल्या शिष्यांना म्हणाले, एक नाही आणखी एक एक तांब्या वाढा म्हणावे भिता काय, अरे तुम्ही सिध्दांची लेकरे आहात, स्वयं सिध्द आहात भिता कशाला, ताट भरून वाढा म्हणावे, अरे पण माशाच्या पिलाला पोहायचे शिकवावे लागत नाही हे लक्षात घ्या.
श्री यल्लालिंग प्रभु महाराज व सद्गुरू काशिनाथ महाराज यांचा कानडी भाषेत झालेला आध्यात्मिक विषय जसा बोलले तसा श्री मायाप्पा आन्ना मुगळखोड यांना भक्त डाॅक्टर शंकरराव नामदेव बचाटे यानी विनंती केली की, आन्ना यल्लालिंग प्रभु महाराज व सद्गुरू काशिनाथ महाराज रात्री कोणत्या विषयावर बोलले तो कृपा करून आम्हाला कानडीचे मराठीत भाषांतर करून सांगावे. महानयोगी गुरूशिष्याची भेट व त्यानी एक रात्रभर कलेला संवाद खालीलप्रमाणे....
सद्गुरू काशिनाथ महाराज त्यांच्या गुरूना प्रणाम करून म्हणाले, महाराज गंगाखेड येथे समाधी स्थानी स्थितप्रज्ञानंतर ८ ते १० वर्षाच्या काळात तिसऱ्या मजल्यावर मध्य स्थानी चिरायु अवस्थेत कोण ओळखणार, जे येतील त्याना पाहुन आशिर्वाद दिला तरी कोण ओळखणार, आपले गुरू सिध्दलिंग महाराज काशिच्या पदयात्रेत काशिवरून येत असताना याच भुमीत मुक्कामास थांबले. श्री सिध्दलिंगानी काशिचे तिर्थ या भुमित सिंचन केले व एका विस्तिर्ण शिळेची पुजा केली आणि एकवीस दिवस याच शिळेवर अनुष्ठान केले. भक्तांच्या कल्याणार्थ गंगाखेड भुमीत गोदामाईचे तिरी ते पवित्र झाले.
सिध्दांच्या उध्दारार्थ सिध्द कुळीच्या रक्षणार्थ भक्तांच्या सुख दुःखाच्या निर्मुलनार्थ श्री सिध्दलिंगानी शुभाशिर्वाद दिला व स्थितप्रज्ञ असलेल्या त्यांच्या कुळीला आशिर्वाद देऊन श्री सिध्दांच्या आशिर्वाद पुर्तीसाठी, महाराष्ट्रात सिध्दांच्या कल्याणासाठी आपल्या आशिर्वादाची गरज आहे. माझ्या मराठी भाविकांच्या कल्याणासाठी त्याना भक्तीमार्गात प्रवर्त करण्यासाठी तेथे हे कार्य करावे लागेल हे परम कर्तव्य आहे. तर आपल्या आशिर्वादाची याचना करीत आहे ही सद्गुरू काशिनाथांची विंनती ऐकून अंतःकरणाला पाझर फोडणारे उद्गार गुरूंच्या अंतःकरणात विद्युत प्रवाहाप्रमाणे क्षणार्धात प्रवेशून प्रकाशमान झाले. तेंव्हा प्रभु यल्लालिंग महाराज काशिनाथाना म्हणाले, मग -मग उशिर कशाला आपण आताच प्रस्थान करावे वेळ नको. हे ऐकून काशिनाथ महाराज म्हणाले, नाही कुठल्याही कार्याला काळ व वेळ यावी लागते. श्री सिध्दलिंग महाराज ज्या काळात त्याच वेळात ज्या शुभ समयी शुभ तिथी वार (माघ मास) नागेश्वराचा शुभ संदेश याची प्रतिक्षा करावी लागेल. हे काशिनाथ महाराजांचे महान व भविष्य काळाचा प्रवाह बोलण्याचा मतितार्थ ऐकून यल्लालिंग प्रभु महाराज शांत राहीले जसी आपली ईच्छा. कालाय तस्मै नमः म्हणुन शांत राहीले.
श्री यल्लालिंग प्रभु महाराज मोठया महाराजांचे शिष्य श्री मायाप्पा आन्ना हे काशिनाथ महाराज यांचे जेष्ठ गुरूबंधु मायाप्पा हे अत्यंत पराक्रमी धीरगंभीर व तत्वनिष्ट, एकनिष्ट व गुरू भक्तीनिष्ठ गुरूसेवाधर्म म्हणुन भुक, तहान विसरून जात असत. त्यांचे एकच ब्रिद सद्गुरू सेवा दिवसरात्र २४ तास आपल्या हातून घडावी यासाठी ते तत्पर रहात असायचे.एके काळची गोष्ट आहे सद्गुरू काशिनाथ महाराज मुगुळखोड येथे असताना मायाप्पा याना म्हणाले, मायाप्पा गुरूसेवा ही तसे पाहीले तर फार अवघड आहे, अहो गुरूंच्या अंतःकरणात अंतर्यामीचा भाव शिष्याने तितक्या सखोल जाऊन जाणुन घेतले पाहीजेत व गुरूच्या अंतःकरणात सेवेबद्दल यत्किंचीतही दुःख होता कामा नये. गुरू सेवेत गुरूंना प्रसन्नता लाभावी त्यांच्या मनोकामनेच्या विरूध्द सेवा केली तर फार मोठे दुःख भोगावे लागते.यासर्व गोष्टीचा विचार तंतोतंत करावा लागतो. जी सेवा केली जाते त्यात गुरूंना परमांनद लाभावा हीच सत्य व निष्काम गुरूसेवा आहे.
सकाम सेवेने साधक ज्ञान मार्गातुन परावृत्त होतो, फक्त इच्छा रहीत गुरूसेवेने भक्तास पवित्रम ज्ञानाची प्राप्ती होते. निस्वार्थ भावाने केलेली सेवाच ईश्वराला मान्य असते. हेच सद्गुरू काशिनाथ महाराजांचे अमृतमय बोलने ऐकुन मायाप्पानी दोन्ही हात जोडून सद्गुरू काशिनाथ महाराजाना म्हणाले, महाराज माफ करा क्षमा असावी. गुरूमाई माझ्या हातून कधी काळी अनेक चुका होत असतील क्षमा करा गुरूदेव आपण कृपामृतानी भरलेला महासागर आहात. आपल्या लाडक्या बंधुना क्षमा असु द्यावी. तुमचाच एक बंधु संसार सागरात गटांगळया खात आहे पक्का बुडाला आहे, कृपा करून त्याला बाहेर काढा. आणि सत्य ज्ञानाच्या मार्गाने जाण्याचा मार्ग आपणच दाखविणारे महानयौगी आहात. या भवसागरातुन बाहेर काढा व अखंड सत्संगतीत ठेवा. संताच्या पावन स्पर्शाने हा देह पवित्र व्हावा हीच मागणी आपल्या चरणी भाकीतो. आपण महान सर्वश्रेष्ठ परमात्म स्वरूप आहात सर्व सिध्दीचे दायक आहात, यौग्याचे महान यौगी आहात, सर्व ज्ञानाचे ज्ञान आहात. आत्मज्ञानाचे भांडार आहात, प्रत्यक्ष मायावी देह धारण करून महाराजांचे सोंग करून आपणच नटला आहात. असे जरी वाटत असले, दिसत असले तरी पण आपण प्रत्यक्ष परमात्मा आहात. हा माझा आत्मविश्वास आहे. पण आपण आपल्या खऱ्या स्वरूपाची, ओळख देण्यास विलंब होत आहे, महाराज या मानव देहाचे आयुष्य क्षणभंगुर आहे, हे जिवन निमिष्यमात्राचे आहे. त्यासाठी याची देही याची डोळा या देहात आहे तोवर हा सोहळा पाहु द्या देवा. एवढयासाठी गुरूदेवा तुमचा भक्त वाट पहात आहे त्वरा करा मज पामरा. महाराज, आपले गुरू एकवेळा बोलुन गेले आहेत ते म्हणाले, अरे मायाप्पा ऐक निट लक्ष देऊन ऐक, मी जरी तुझा दिक्षागुरू असलो तरी पण ज्या गोष्टी माझ्या अधिकाराच्या बाहेरच्या आहेत तर मी काय करू. पण त्या गोष्टी काशिनाथ महाराजांच्या अधिकाराखाली चालतात ते स्वयं शिव परमात्मा भगवान आहेत. माझे त्यांचे गुरू शिष्याचे फक्त नाते आहे पण निट लक्षात घ्या ते स्वयं सिध्द आहेत.
जय सद्गुरू
उत्तर द्याहटवापूजा आणि किरण तुम्ही सद्गुरु परिवारावर फार फार उपकार केले आहेत सद्गुरु काशिनाथ महाराज यांचे जीवन चरित्र त्यांची माहिती त्यांच्या लीला भक्ता पर्यंत पोचवत आहात त्यांचा गुरु शिष्य संवाद
खूप खूप छान आहे हे आम्हाला तुमच्यामुळे वाचण्याचा योग आला आहे खूप छान पूजा धन्यवाद तुम्ही खूप मेहनत घेऊन हे काम करत आहात श्री महाराजांचे कार्य आनंददायी आहे
अति उत्तम पुजताई धन्यवाद.
उत्तर द्याहटवा