१४. गुरू शिष्य संबंध.

नारायनं नमस्कृतय नरं चैव नरोत्तमम् ।       

देवी सरस्वती व्यासं ततो जय मुदिरयेत ।।

( भा. स्कं. १ आ. २ श्लोक. ४ )

            गुरू शिष्यामध्ये केवळ प्रेमाचा संबंध असुन चालत नाही. त्यांच्यात आत्मीय संबंध पाहीजे तो नसला तर आत्मज्ञान होत नाही. गुरू शिष्यामध्ये आत्मीय संबंध निर्माण झाल्याशिवाय गुढ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. गुरुकृपेने किंवा गुरूभक्तीने पण होत नाही. त्याच्यासाठी गुढ ज्ञान प्राप्तीसाठी गुरू शिष्याचे हृदय एक झाले पाहीजे. तरच गुह्य ज्ञान होऊ शकते. 

जन्म मृत्यु जरा व्याधि, दुःख दोषानु दर्षनम् ।।

    (भ.गि.) मुत्यु हा मांगलीक आहे. परब्रम्ह = शब्द ब्रम्ह हे ज्ञान गुरू देतात. (सद्गुरू हे चरित्र आहे.)

सर्वेेत्र सुखीनः सन्तु = सर्वेसंन्तु निरामयाः ।।

सर्वे भद्राणि पष्यन्तुु मा कश्चित दुःख भाग् भवेत् ।।

  श्रीक्षेत्र अमृतकुंड येथे महाराजानी केलेला उपदेश  स्थान रामलिंगेश्वर मंदिर.

            मनुष्य प्राणी अहोरात्र सुखासाठी धडपडत असतो, धनद्रव्य, संसारी सुख, आप्तइष्टांचे सुख व जगात आपल्याला मानाचे स्थान कसे मिळेल, अमाप धन संचय काय केल्याने प्राप्त होईल, इत्यादी अनेक प्रकारच्या विचारचे काहुर डोक्यात घर करून बसलेले असते. याच विचारात रांत्रदिवस परेशान होऊन, रात्ररात्र जागत काढतो पण सुखाची लालसा त्याला सोडण्यास तयार नसते. सुखाची आशा हीच परम दुःखाची पहिली पायरी आहे. सुखाची लालसा ही परम दुःखाची दुसरी पायरी आहे. मनशा ही अत्यंत दुःखाची तिसरी पायरी आहे. या तीन पायऱ्या पार करण्यासाठी (या त्रिपुटीला) सत्संगातुनच साधनेच्या आधाराने निवृत्त करता येते. त्यासाठी सद्गुरू उपदेश देतात.

                                             आशा मनशा तृष्णा कामक्रोध कुरवांडु ।।

            म्हणजे या त्रिपुटीला देहातुन सर्वभावे शरण गेले पाहीजे. सद्गुरू शिवाय दुसरी व्यक्ती कोणीही नाही. या अविद्येच्या जाळयातुन काढणारी व्यक्ती कोणीही मिळु शकत नाही. महान योगी पुरूष साक्षात्कारी महापुरूषांच्या सान्निध्यात जाऊन पोहचावे लागते. तेंव्हा ते साक्षात्कारी महापुरूष अनुग्रहीत करून घेतात. सत्संगात ठेऊन वेळोवेळी त्याच्यावर बोधामृताचे सिंचन करून त्याला शुध्द व पवित्र करून नाम साधनेद्वारे नामाची थोरवी व नामाची गोडी त्याच्या ठायी निर्माण करतात व अखंड नाम घेण्याचा आग्रह करतात. त्याच्या अंतःकरणात नामाची गोडी निर्माण करून गोड नाम सर्व सुखाचे आगार आहे. नाम हे कल्याणकारी आहे. देहाचे आत्मकल्याण करणारे नाम, शेवटचा क्षण गोड करणारे नाम, इह जन्माचे सार्थक करणारे नाम, मोक्ष कल्याणाचा मार्ग दाखविणारे नाम, आज्ञानातुन ज्ञानात नेणारे नाम, पवन वेगी मनाला आकळणारे नाम, आणि जिवात्म्याला सुख देणारे नाम, सद्गुरूंच्या (प्रणवोवाच्य) पाचव्या वेदातुन प्राप्त होणारे नाम, चारही वेदात न मिळणारे नाम, हे नाम पाचव्या वेदातुन प्राप्त होते. पाचवा वेद गुप्त असुन ते सद्गुरू देतात. पाचवा वेद गुप्त आहे पण चार वेद प्रगट आहेत. पाचवा वेद गुप्त म्हणजे (प्रणवोवाच्य) आहे म्हणजे गुरू मुखात निर्गुण निराकार, प्रणवध्वनी तो दिसत नाही. पहाता येत नाही तो उजव्या कर्णेंद्रियाने देहाच्या अंतरंगात विलीन होतो. तदनंतर ओंकाराच्या ध्वनी अंतःकरणात निनादत राहतात.

            गुरू नाम देतात. गुरूंनी दिलेल्या नामाचे निष्काम भावाने श्रवण - मनन - व निदीध्यास केल्याने देहाच्या ठिकाणी परावाणीत  ॐ चे बिजांकुर अंकुरीत होते. जेंव्हा भक्त साधनेत पारंगत होऊन नामात राहतो. साधनेच्या मार्गाने देहातील असणाऱ्या परम पावन परमात्म शक्तीला आपल्याच देहात पाहातो आणि परमानंदी निमग्न राहतो. परमात्म स्वरूपाच्या दर्शनाने छंदे - छंदे डोलत राहतो. स्वभाव शांत चित्त होतो. तो स्वःहा मंत्र मुग्ध होतो व मुख कमल सदैव हसतमुख राहते. अखंड प्रसन्न राहतो व सर्वाभुती प्रेमाने समभावाने वर्तन करीत राहतो. संसारीक सुख दुखःपासुन तो दुर राहतो, जे काही घडते ते ईश्वरी शक्तीने घडत राहते आपण निमित्त मात्र आहोत.

            भगवंताच्या कृपाआशीर्वादाने हे सर्व चालत राहते. पुनरपी जननम् पुनरपी मरनम्  हे चालुच राहते. जन्म मरणाचा फेरा कधीही कोणाला चुकलेला नाही. ईश्वरी घटनेप्रमाणे हे सर्व चालुच असते. काहीवेळा मनुष्याला जन्माच्या पुर्व संचिताप्रमाणे सोबत येणारे भोग हे भोगुनच संपवावे लागतात. ते भोगल्याशिवाय अन्य कशानेही संपत नाहीत. प्रारब्धात जे जे लिहिले आहे त्या प्रारब्धाप्रमाणे जिवनात अनेक प्रकारचे बदल होत राहतात. संचित = प्रारब्ध = आणि - क्रियामान = ही तर त्रिपुटी आहे, त्याप्रमाणे म्हणजे संचिताप्रमाणे घडत राहते. प्रारब्धात जे लिहिले आहे त्याप्रमाणे जिवनात अनेक वेळा अंनत प्रसंगाला तोंड द्यावे लागते. क्रियामाण = जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते तुम्ही अंतःकरणात प्रभुला साक्षी ठेऊन जे जे कर्म करता मी हे करत नसुन प्रभु आपणच कर्ते आहात मी म्हणजे कोण? आलो कोठुन? जाणार कोठे? करतो काय? हेच मला ज्ञात नाही. हे सर्व आपणच जाणता. मी म्हणजे एक मानव नाव धारण करून या पृथ्वीतलावर प्रभु आपणच या जिवयोनीत पाठविले आहे, ते आपण माझे परम पिता परमात्मा आहात, हे सर्व माझे मलाच कळत नाही, मी कोण - कोठुन - व अंती जाणार कोठे? ही सर्व करणी प्रभु तुमचीच आहे, तुम्हीच या प्रथ्वीतलावर नानावीध रूपाने प्रगट होऊन नटला आहात.

            जगाच्या कल्याणा संताच्या विभुती.  जणकल्याणार्थ साधु सत्पुरूषांच्या रूपात अवतीर्ण होऊन, जगाचे पालन पोषण करत आहात. सत्याच्या संरक्षणार्थ व दुष्टांच्या निर्मुलनार्थ पुन्हा पुन्हा अवतार घेऊन, जनकल्याणार्थ परमात्मा अवतिर्ण होत असतो या घटना घडविणारा परम पिता परमात्मा युगानयुगे साधु सत्पुरूषांच्या रूपात प्रगट होऊन तो म्हणजे मी परमात्मा नसुन ते साधु संत सत्पुरूष आहेत. असे जगाला भासविणारे ते म्हणजे स्वयं परमात्माच आहेत. असा अंतःकरणी आत्मविश्वास  ठेऊन जे भक्त ईश्वरी भक्तीत व गुरूभक्तीत अखंड कार्यरत रहातात. त्यानाच गुरूकृपेने अनंत अनुभुती येऊन एकमेवाद्वितीय परम पावन पदाची प्राप्ती होते. अंतिम या देहाचे कल्याण होऊन जिवन कृतार्थ होते.

श्री परम पुज्य सद्गुरू काशिनाथ महाराज. 

टिप्पण्या