🚩🙏🏻💐🚩🙏🏻💐🚩🙏🏻💐
*गीत रचना आणि गायिका*
विजयालक्ष्मी प्रभाकर बेनकवळी, गुलबर्गा. मलकन्ना जमादार नंदगाव यांची मुलगी.
*भक्तिगीत*
सिध्द लिंग धावा हो यल्लालिंग धावा I
काशिलींग धावा हो शिवशिंग धावा II
माझ्या जीवनाची नौका किनारी लावा II धृ II
जन्म दिले माझे आई बाप I
आणून घातीले संसार सागरात I
ओलांडून जाऊ कशी त्या गावा II ०१II
सगरात प्राणी मोठे भयंकर I
हमला करू लागले माझेवर I
पाश घालुनी जाळ ठेवा I
त्यातून पार करा गुरुदेवा II ०२II
सागरला आली भरती उठली लाट I
खळबळ होऊ लागले मन अफाट I
नावाडी होऊन तुम्ही दावा I
येवुन. तुम्ही दर्शन द्यावा II ०२II
जीवनाची फार आहे भयानक वाट I
दऱ्या खोऱ्याची अवघड घाट I
अशा या दिणावर कृपेने पावा I
आत्म्यातला ब्रम्हानंद मला दावा II०३II
छान ताई
उत्तर द्याहटवाछान रचना...
उत्तर द्याहटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाखूपच अप्रतिम जय गुरुदेव
उत्तर द्याहटवा